भारतीय आदिवासींचे आणि झारखंड आंदोलनाचे एक सर्वोच्च नेता आणि एक राजनीति तज्ञ पत्रकार, लेखक, संपादक, आणि मे 1925 मध्ये ऑक्सफोर्ड ब्लू किताब मिळवलेले आणि हॉकीचे एक मात्र आंतरराष्ट्रीय खिलाडी होते त्यांच्या कॅप्टनी च्या काळात मे 1928 चे ऑलिंपिक मध्ये भारताने पहिले सुवर्णपदक मिळवले होते आणि विशेष म्हणजे भारतामध्ये जयपाल सिंह मुंडा सर्वोच्च सरकारी पदावरती होते जयपाल सिंह मुंडा छोटे नागपूर ( आताचे झारखंड राज्य ) मुंडा जनजातीचे होते मिशनरीज यांच्या मदतीने ते ऑक्सफर्ड सेंट जॉन्स कॉलेजमध्ये शिकण्यासाठी गेले होते ते असामान्य रूपाने खूप प्रतिभाषा आली होती त्यांना शिक्षणाच्या व्यतिरिक्त खेळकुद खूप आवड होती त्यामध्ये हॉकी त्यांचा प्रमुख खेळ होता त्याशिवाय त्यांनी वाद विवादात नाव खूप अलौकिक केले होते त्यांची निवड भारतीय सिविल सेवा (i.c. s ) मध्ये निवड झाली होती आयसीएस चे प्रशिक्षण त्यांना खूप प्रभावीत करण्यासारखे होते कारण ते मे 1928 साली एम्सट रडम मध्ये ऑलम्पिक हॉकी मध्ये पहिले सुवर्णपदक मिळवणारी भारतीय टीमचे कॅप्टन च्या रूपात नेदरलँडला गेले आणि नेदरलँड वरून वापस येत असताना त्यांना आयसीएस चे एक वर्षाचे प्रशिक्षण पुन्हा घेण्यास सांगितले गेले, अशातच त्यांनी आयसीएस चे पुन्हा प्रशिक्षण घेण्यास नकार दिला त्यांनी बिहारच्या शिक्षा जगात योगदान देण्यासाठी त्या वेळचे तात्कालीन बिहार काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना या संबंधात पत्र लिहिले. परंतु त्यांना कुठले ही सकारात्मक उत्तर मिळाले नाही 1938 साली जयपाल सिंह मुंडा यांनी पटना आणि रांची हा दौरा केला त्या दौऱ्यादरम्यान आदिवासींची खराब परिस्थिती बघून त्यांनी राजनीतीत यायचा विचार केला. जानेवारी 1938 मध्ये त्यांनी आदिवासी महासभेचे अध्यक्षपद ग्रहण केले त्यावेळी बिहार पासून एक वेगळे झारखंड स्थापन करण्याची मागणी ठेवण्यात आली त्यानंतर जयपाल सिंह मुंडा देशात आदिवासींची बुलंद आवाज म्हणून नावारूपाला आले 🙏 जय आदिवासी मित्रांनो या लेखा तितकाच जेवढी काही माहिती आपल्या समाजकार्य मधून आणि क्रांतिकारकांची मिळेल त्या अनुषंगाने एक नवीन नवीन ब्लॉग तयार करून पोस्ट करतोय कारण आपल्या आदिवासी समाजाला आपल्या आदिवासी क्रांतिकारक समाजसुधारक यांच्याबाबत माहिती असणे खूप गरजेचे आहे आदिवासी समाजाला जनजागृतीसाठी असणारा हा छोटा खाणी प्रयत्न🙏 जय आदिवासी🙏 जय बिरसा 🙏जय भीम 🙏
नवीन योजना, नविन महिती, ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी कसे काम करावे आणि लेखी तक्रार अर्ज. आदिवासी क्रांतिकारक यांची महिती, समाज जनजागृती, ग्रामपंचायत मधील महिती घरकुल विभागातील कागद पत्रे, महिती आणि खेळ तसेच कायद्याची अमलबजावणीसाठी कसे काम करावे सर्व अर्ज प्रक्रिया, निवेदन तयार करणे संदर्भ आणि बरेच काही
मंगळवार, ३० सप्टेंबर, २०२५
सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५
खैरलांझी हत्याकांड 29 सप्टेंबर काळा दिवस 🙏
२९ सप्टेंबर २००६
#खैरलांजी_हत्याकांड_काळा_दिवस
खैरलांजी हत्याकांड २९ सप्टेंबर २००६ रोजी महाराष्ट्रातल्या भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील खैरलांजी गावात घडले. या दिवशी गावातल्या एका कुटुंबातल्या चार जणांची सायंकाळच्या सुमारास गावातल्याच काही लोकांकडून अमानुष हत्या करण्यात आली. या हत्याकांडाचे पडसाद विधिमंडळा पासून संसदे पर्यंत उमटले. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनेची दखल घेण्यात आली. घटनेनंतर राज्यभर आंदोलनांचे लोण उसळले. घटने नंतर सुमारे सात महिन्यांनी दाखल झालेल्या आणि पंधरा महिने चाललेल्या खटल्याचा निकाल १५ सप्टेंबर २००८ रोजी लागला. न्यायालयाने आठ आरोपींना दोषी ठरवले. या हत्याकांडाचे एकमेव साक्षीदार भैयालाल भोतमांगे यांचे २० जानेवारी २०१७ रोजी हृदयविकाराने निधन झाले. या घटनेने राज्यातील कायदा व सुव्यवस्था, तपास यंत्रणा तसेच दलित अत्याचार प्रतिबंधक अधिनियमातील त्रुटी यांसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. या घटनेचा महत्त्वपूर्ण परिणाम म्हणजे राज्य शासनाने १६ सप्टेंबर २००८ रोजी दलित अत्याचार प्रतिबंधक अधिनियमातील त्रुटी दूर करण्यासाठी एक समिती स्थापन केली.
निकाल:
गुन्हेगारांनी हा गुन्हा करताना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे हे दलित हत्याकांड नसल्याचा निकाल न्यायालयाने दिला. १५ सप्टेंबर २००८ रोजी भंडारा न्यायालयाने दिलेल्या निकाला नुसार ११ पैकी ८ आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सिद्ध झाला आहे. न्यायालयाने पुढील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली - गोपाल सक्रू बिंजेवार, शिशुपाल धांडे. पुढील आरोपींना २५ वर्षाच्या जन्मपेठेची शिक्षा सुनावली - सक्रू बिंजेवार,शत्रुघ्न धांडे,विश्वनाथ धांडे,प्रभाकर मंडलेकर,जगदीश मंडलेकर,रामू धांडे. पुराव्या अभावी पुढील ३ आरोपींना सोडून दिले - महिपाल धांडे,धर्मपाल धांडे,पुरुषोत्तम तितीरमारे. सामाजिक वास्तव ढवळून काढणाऱ्या या घटनेमुळे अनेक जण मूलभूत चिंतन व त्यावर आधारित कविता, नाटक, प्रदीर्घ लेख लिहिण्यास प्रवृत्त झाले.
साप्ताहिक विवेक मधील संजय सोनवणी यांचा लेख.
‘दृश्यांचा ढोबळ समुद्र’ काव्यसंग्रहातील ‘लव्ह इन द टाइम ऑफ खैरलांजी’ ही प्रज्ञा पवार यांची कविता.
धादांत खैरलांजी - नाटक, लेखिका प्रज्ञा पवार
रविवार, २८ सप्टेंबर, २०२५
फुलंब्री येथील घटना 🙏👌
सर्वांना जय आदिवासी मित्रांनो आज दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी फुलंब्री पोलीस स्टेशन येथे तसेच पोखरी गावातील एक घटना घडली होती अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडता घडता या ठिकाणी वाचलेला आहे कारण आपल्या आदिवासी समाजाने सतत सावधानी बाळगली पाहिजे कारण की गाव पातळीवर काही बांडगुळ माजलेल्या पद्धतीने वर्तवणूक करतात अशा बांडगुळांना वेळीच धडा शिकवला नाहीत तर भविष्यात आपल्या समाजाला खूप मोठ्या प्रकरणाला तोंड द्यावे लागू शकते असेच एक प्रकरण पोखरी या गावातील होते तिथे आदिवासी समाजाची अल्पवयीन मुलगी नामे रेणुका सोपान हटकर गेल्या 20 ते 18 वर्षांपूर्वीपासून तिचं कुटुंब प्रक्रिया गावात वास्तव्यास आहे कालच्या पावसाचा आणि वातावरणाचा फायदा घेत तेथील आरोपी इसम व त्याचा भाऊ यांनी त्या मुलीला किडनॅप केलं अक्षरशः एक ते दीड तास पूर्ण गावभर शोधून देखील ती मुलगी मिळाली नाही परंतु त्यांच्या शेजारीच राहत असलेल्या एका घरी तिच्या भावाला आणि मेव्हण्याला तिची चाहूल लागता त्यांनी त्या मुलीला सुखरूप बाहेर काढले या प्रकरणादरम्यान आदिवासी जमात विकास संस्थेचे धडाकेचे कार्यकर्ते संतोष भाऊ गायकवाड यांनी आज सकाळी पोलीस स्टेशनला धाव घेतली व त्या अनुषंगाने आम्हाला सकाळी आठ वाजता फोन करण्यात आला होता फोन आल्यानंतर आम्ही एक ते दीड तासात आमचं काम आवरून त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला आणि पोहोचलो देखील परंतु त्या दरम्यानच काल रात्री झालेल्या पावसामुळे खूप काही ठिकाणी रस्ता रहदारी विस्कळीत झालेली होती त्यामुळे कालांतराने आम्हाला थोडा उशीर झाला परंतु आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो त्या प्रकरणाची चौकशी केली चौकशी दरम्यान असे निदर्शनास आले की आपल्या आदिवासी समाजाच्या माणसांनी देखील आपल्या लेकरा बाळावर लक्ष दिलं पाहिजे कारण की आपले दैनंदिन काम आयुष्यभर आपल्या पुढे पडलेले असतात त्यात आपल्या समाजाच्या वाटेला आलेली दारिद्र्य यातून पर्याय काढत आपण आपल्या लेकरा बाळांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे चला तर मुद्द्यावर येतो फुलंब्री पोलीस स्टेशनला गेल्यानंतर राठोड साहेब यांच्याशी भेट घेऊन त्यांच्या सोबत चर्चा करण्यात आली व संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्याचं प्रोसिजर चालू करण्यात आला पोखरी गावातील सरपंच यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आदिवासी समाजाला सहकार्य देखील केलं अवघ्या अर्ध्या ते एक तासात आरोपीला त्या ठिकाणी हजर करण्यात आला आरोपी व त्याच्या भावाला त्या ठिकाणी आणल्याच्या नंतर पोलिसांनी चांगल्या पद्धतीने त्याला चोप देऊन त्याचे स्वागत केले परंतु सांगायचं तात्पर्य इतकच की आपल्या आदिवासी समाजाने जागृत व्हावं कुणाच्याही रिकाम्या भूलथापाला बळी पडून आपल्या आयुष्याचं वाटोळं करून घेऊ नये त्या दरम्यान गावातील खूप मंडळी देखील तिथे जमा झाली त्या अनुषंगाने गाव पातळीवर तो प्रश्न तसेच आदिवासी जमात विकास संस्थेच्या माध्यमातून वेळीच त्या घटनेची दखल घेतल्या गेल्यामुळे त्या मुलीचे प्राण सुखरूप वाचले त्यामुळे मी माझ्या सर्व आदिवासी बांधवांनी भगिनींना विनंती करतो की रात्र ही वैऱ्याची आहे त्यामुळे आपण समाजात वावरताना आपले कान डोळे सदैव उघडे ठेवावेत आपल्या मुलांकडे विशेष लक्ष द्यावे ही नम्र विनंती 🙏... जय आदिवासी 🙏... जय भीम 🙏... जय शिवराय 🙏... जय लहुजी 🙏... यावेळी पोलीस स्टेशनला उपस्थित आदिवासी जमात विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किरण सखाराम बर्डे. 🙏 आदिवासी जमात विकास संस्थेचे सचिव 🙏. भाऊसाहेब सुखदेव बर्डे. 🙏 तसेच आदिवासी जमात विकास संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष भाऊ गायकवाड 🙏. तसेच आदिवासी जमात विकास संस्थेचे जिल्हा सचिव किसन भाऊ गायकवाड. तसेच आदिवासी समाजाचे सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते व गावातील ग्रामपंचायत चे सरपंच देखील उपस्थित होते 🙏...
शनिवार, २७ सप्टेंबर, २०२५
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर 🙏
जुलै 1942 मध्ये राष्ट्रीय सभा अर्थात काँग्रेसने भारत छोडोचा नारा दिला आणि आंदोलन पेटले. तत्कालीन ब्रिटिश प्राईम मिनिस्टर सर विस्टन चर्चिल हे त्यांच्या बेदरकार वृत्तीसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी तत्काल भारताच्या व्हाईसरॉयला टेलिग्राम केला आणि सांगितले काँग्रेस नेते गांधी, नेहरू ,पटेल, राजेंद्रप्रसाद सर्वांना अंदमान किंवा सेशेल्सच्या कारागृहात तात्काळ उचलून टाका....
बाबासाहेब त्यावेळेस व्हाईसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलचे सदस्य होते आणि त्यांच्यासोबत लोकमान्य टिळकांचे पट्टशिष्य आणि तत्कालीन काँग्रेसचे मोठे नेते लोकनायक डॉक्टर माधव श्रीधर अणे हे देखील कौन्सिल सदस्य होते... दिल्लीमधील कौन्सिल मीटिंगमध्ये जेव्हा व्हाईसरॉयने घोषणा केली की महात्मा गांधी, पंडित नेहरू ,सरदार पटेल ,बाबू राजेंद्र प्रसाद या सर्वांना अंदमान किंवा सेशेल्स जेलमध्ये पाठवण्यात येणार आणि हा निर्णय प्राईम मिनिस्टर चर्चिल यांचा आहे. तेव्हा या निर्णयाला विरोध करण्याची हिम्मत तिथे असणाऱ्या उच्चवर्णीय हिंदू , मुस्लिम, पारसी, ख्रिश्चन कुठल्याही सदस्यांची झाली नाही. आपल्या धैर्य आणि स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असणारे लोकनायक डॉक्टर माधव श्रीधर अणे यांनी देखील विरोध केला नाही, त्यांनी प्रस्तावाला संमती दर्शवली. या प्रस्तावाला फक्त आणि फक्त विरोध केला बाबासाहेबांनी आणि त्यांनी विरोध करताना सांगितले गांधी, नेहरू, सरदार पटेल, राजेंद्र प्रसाद हे काही कुणी खुनी नाहीत, गुन्हेगार नाही, ते जनतेचे नेते आहेत त्यामुळे त्यांना अंदमान किंवा सेशेल्स कारागृहात पाठवू नये. बाबासाहेबांच्या प्रखर विरोधामुळे ब्रिटिश सरकारने काँग्रेसच्या सर्व नेत्यांना अंदमानला न पाठवता अहमदनगर कारागृहात ठेवले
प्राईम मिनिस्टर विस्टन चर्चिल म्हणजे काय साधारण पंतप्रधान नव्हते. स्टॅलिन - रुझवेल्ट -चर्चिल या सर्व शक्तिमान जागतिक नेत्यांपैकी ते एक होते. दुसऱ्या महायुद्धाचे हिरो म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला होता आणि ब्रिटिश वसाहती मधील दडपशाहीसाठी ते प्रसिद्ध होते. स्वतःच्या देश बांधवांवर अडीच हजार वर्षे अन्याय अत्याचार करणारे इथले धार्मिक- राजकीय सामाजिक सत्ताधारी इंग्रज-तुर्क यांच्यासमोर मात्र नांगी टाकत
( यानंतर देखील भारतीय नेत्यांनी बाबासाहेबा विरुद्ध कारस्थान करणे काही थांबवले नाही )
एवढी उघड आणि स्पष्ट घटना ज्याची प्रत्येक ठिकाणी नोंद होणे गरजेचे आहे त्याची नोंद इथल्या कलम कसाई राजकीय तज्ज्ञांनी आणि इतिहासकाराने मुद्दाम घेतली नाही.
म्हणूनच .....Let's Write Our Own History
🙏 स्व.विलासराव देशमुख साहेब 🙏
“मुख्यमंत्री झाल्यावर रोज सकाळी त्यांची गाडी मंत्रालयात शिरायची तेव्हा काही दिवस त्यांना एक गरीब महिला मुख्य दरवाज्याशी ताटकळताना दिसायची. पोलीस तिला मागे ढकलायचे. संध्याकाळी गाडी बाहेर पडताना हाच प्रकार. एक दिवस गाडी पोर्चमध्ये शिरताच त्यांनी फर्मान सोडले “ त्या पिवळ्या लुगड्यातल्या बाईना माझ्याकडे घेवून या.” मुख्यमंत्राच्या दालनात तिला आणताच त्यांनी विचारले
“ बाई, तुम्ही रोज का उभ्या असता? तुमचे काय काम आहे ?”
थरथरत्या हाताने फाईल पुढे करत त्या बाईने एका दमात आपली कथा त्यांना ऐकवली. एका सरकारी चत्तुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची ती विधवा पत्नी होती. पतीच्या निधनानंतर वरळी सी फेस जवळच्या कर्मचारी वसाहतीमधील कंपाउंड जवळ तिने कपड्यांना इस्त्री करण्याचा व्यवसाय सुरु केला. त्या मिळकतीवर तिच्या कुटुंबाची गुजराण चालू होती पण त्यावर कुणा अधिकाऱ्याची नजर गेली आणि “हप्ता” मागण्यास सुरुवात झाली. ती महिला मुकाट्याने हप्ता देत राहिली पण पुढे पुढे ही रक्कम इतकी फुगत चालली की तिला ते देणे परवडेनासे झाले. तिने वाढीव हप्त्याला नकार देताच तिची टपरी “अनधिकृत बांधकाम” म्हणून पाडून टाकण्यात आली आणि तिची इस्त्रीही जप्त झाली. फी भरायला पैसे नाहीत, म्हणून मुलांचे शिक्षण थांबले. दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत झाली.
तिची कथा ऐकून विलासराव स्तब्ध झाले, त्यांचे डोळे पाणावले. त्यांनी त्या महिलेला बसवून घेतले. तिच्या चहाची व्यवस्था केली आणि थेट सार्वजनिक बांधकाम सचिवांना निरोप धाडला “असाल तसे निघून या. तुमच्या खात्याची कर्तबगारी आणि कार्यक्षमता दाखवायची आहे.” निरोपाचे गांभीर्य लक्षात येताच बावचळलेले सचिव आले. संतापलेले विलासराव अद्वातद्वा बोलले. तिथल्या तिथे त्यांनी आदेश दिला, “ या महिलेची टपरी जिथे होती, तिथे उभारून द्या, तिची इस्त्री परत करा. हे सारे आज संध्याकाळी मी घरी जायच्या आत व्हायला हवे आणि उद्या तिथल्या “त्या” कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला माझ्या समोर उभे करा, माझी कर्तव्यदक्षता त्यांना दाखवून द्यायची आहे. येताना त्यांना घराचे सामान आवरूनच यायला सांगा. त्यांना कुठे पाठवायचे ते मी ठरवले आहे.” सचिवांची गाळण उडाली. विलासरावांच्याच गाडीतून तिला वरळी सी फेस ला नेण्यात आले.
संध्याकाळी मंत्रालयातून निघण्यापूर्वी विलासरावांनी त्या सचिवाला पुन्हा बोलावून घेतले आणि त्यांच्या समवेतच ते वरळी सी फेस ला शासकीय वसाहतीत गेले. टपरी पुन्हा उभी राहिली होती. तिच्यात एका स्टूल वर बसून विलासरावांनी चहा घेतला. आता तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. स्वत:च्या रुमालाने विलासरावांनी ते पुसले आणि घरी निघून गेले. आपण जे केले त्यांची चार ओळीची बातमी यावी, अशीही त्यांची अपेक्षा नव्हती. उलट काही छापू नका, असा प्रेमाचा सल्लाच त्यांनी दिला.
स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी सरपंच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा प्रदीर्घ राजकीय प्रवास करत, राज्याच्या जनतेच्या मनात आदरपूर्ण स्नेहाचं नातं निर्माण केलं. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाच्या ध्येय-धोरणांमध्ये कायम पायाभूत सुविधा आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य दिलं. तसंच कृषी व सहकार क्षेत्राच्या माध्यमातून राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी प्रदान केली.
संविधानिक अधिकार ✌️
👍सामान्य लोकांना “संविधान” (Constitution) आणि “आयपीसी” (Indian Penal Code) यातील फरक स्पष्ट समजला पाहिजे, कारण हे दोन वेगवेगळे पण महत्त्वाचे कायदे आहेत. चला सोप्या भाषेत पाहूया:
---
१) संविधान (Constitution of India)
मुळ अर्थ: देश चालविण्याचा "नकाशा" किंवा "मार्गदर्शक पुस्तक".
उद्दिष्ट: प्रत्येक नागरिकाचे हक्क, कर्तव्ये आणि शासनाची रचना ठरवणे.
मुख्य मुद्दे:
लोकशाही, समानता, स्वातंत्र्य, बंधुता यांची हमी देते.
नागरिकांना मूलभूत हक्क (Fundamental Rights) देते.
शासन कसे चालेल, पंतप्रधान, मुख्यमंत्री, न्यायपालिका यांचे अधिकार काय हे ठरवते.
उदाहरण:
शिक्षणाचा हक्क (कलम 21A)
समानतेचा हक्क (कलम 14)
अभिव्यक्ती स्वातंत्र्य (कलम 19)
---
२) आयपीसी (Indian Penal Code - 1860)
मुळ अर्थ: "फौजदारी कायदा" – गुन्हा काय आणि शिक्षा काय हे सांगणारा कायदा.
उद्दिष्ट: समाजात शिस्त ठेवणे आणि गुन्ह्यांना आळा घालणे.
मुख्य मुद्दे:
चोरी, खून, मारहाण, फसवणूक, भ्रष्टाचार असे गुन्हे कायद्याने परिभाषित करते.
प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा (जेल, दंड किंवा दोन्ही) ठरवते.
उदाहरण:
कलम 302 – खून (शिक्षा: जन्मठेप किंवा मृत्युदंड)
कलम 376 – बलात्कार (शिक्षा: किमान 10 वर्षे तुरुंगवास, पुढे वाढू शकते)
कलम 420 – फसवणूक (शिक्षा: 7 वर्षे तुरुंगवास व दंड,)
---
३) साधा फरक (Comparison Table):
मुद्दा संविधान (Constitution) 🏛 आयपीसी (IPC) ⚖️
काय आहे? देश चालवण्याचा मार्गदर्शक दस्तऐवज गुन्हे व शिक्षा सांगणारा कायदा
कधी लागू झाला? २६ जानेवारी १९५० १८६० पासून
उद्दिष्ट नागरिकांचे हक्क, शासनाची रचना समाजात शिस्त, गुन्ह्यांना शिक्षा
लोकांना काय देते? हक्क व स्वातंत्र्य शिक्षा व कायदेशीर संरक्षण
उदाहरण शिक्
आदिवासी जमात विकास संस्था महाराष्ट्र राज्य
संस्थापक अध्यक्ष👉 किरण सखाराम बर्डे 👉मो. 9309767692
शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०२५
👉 आदिवासी जमात विकास परिषदेच्या एक वर्ष पूर्वीच्या कामाला घवघवीत यश ✌️✌️✌️
आज दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी आदिवासी जमात विकास संस्थेच्या सर्व कमिटीचे व सर्व पदाधिकारी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो कारण की मागच्या वर्षी दिनांक 15 मे 2024 रोजी आदिवासी जमात विकास संस्थेकडे जोगेश्वरी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथील ग्रामस्थांचा अतिशय गंभीर प्रश्न समस्या आली होती एकलव्य नगर मध्ये रस्ता आणि दिनेश ची कुठल्याही पद्धतीने व्यवस्था होती तेथील ग्रामस्थ अतिशय त्रासलेले होते कारण पावसाळ्यामध्ये त्यांच्या लेकरा बाळांच्या व त्यांच्या स्वतःच्या आरोग्यावर परिणाम होईल अशा पद्धतीने एकलव्य नगर मध्ये पावसाचे व सांडपाणी त्या गल्लीमध्ये जमा व्हायचे व बाथरूम चे पाणी देखील हा अतिशय गंभीर प्रश्न जेव्हा आदिवासी जमात विकास संस्थेकडे आला तेव्हा आदिवासी जमात विकास संस्थेने सदरील ग्रामपंचायत व तेथील संबंधित गटविकास अधिकारी यांना वेठीस धरून ते काम मार्गी लावण्यास भाग पाडले लेख बनवताना अतिशय आनंद होतो की आज प्रत्यक्ष जोगेश्वरी गावातील काम यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या असून त्या ठिकाणी दिनेश लाईन पूर्णपणे कंप्लेंट झालेली आहे आणि त्यांचा सांडपाण्याचा प्रश्न आणि रस्त्याचा प्रश्न मार्गी लागलेला आहे या समस्येचा पाठपुरावा करण्यासाठी तेथील ग्रामस्थांचे व आदिवासी जमात विकास संस्थेच्या पूर्ण टीमचे आणि पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो 🙏. त्या ठिकाणी आदिवासी जमात विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष 👉. किरण बर्डे. सचिव 👉. भाऊसाहेब बर्डे. आदिवासी जमात विकास संस्थेचे उपाध्यक्ष.👉 संतोष दळे. आदिवासी जमात विकास संस्थेचे चिटणीस 👉.सुनील भाऊ जोगदंड . आदिवासी जमात विकास संस्थेचे 👉 जिल्हाध्यक्ष विलास भाऊ गायकवाड. आदिवासी जमात विकास संस्थेचे👉 जिल्हा उपाध्यक्ष. 👉 सचिन भाऊ गांगुर्डे. आदिवासी जमात विकास संस्थेचे कोषाध्यक्ष👉. संतोष भाऊ पवार. आदिवासी जमात विकास संस्थेचे गंगापूर तालुका 👉 अध्यक्ष किशोर भाऊ पवार, 👉 तसेच जोगेश्वरी गाव येथील ग्रामस्थ राजू मनोरे अंगणवाडी शिक्षिका मॅडम उपस्थित होते 🙏 आदिवासी जमात विकास संस्थेच्या कामाची पावती देताना अत्यंत आनंद होतो त्यासाठी हा अनुभविक एक क्षण सर्वांसमोर मांडण्यात आला असून पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो🙏👉 जय आदिवासी 🙏🙏जय शिवराय🙏 जय भिम 🙏जय बिरसा 🙏जय लहुजी 🙏 आदिवासी जमात विकास संस्था महाराष्ट्र राज्य 🙏👉
गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५
क्या पोलीस आपकी कॉल डिटेल रेकॉर्ड सीडीआर ले सकती है?
क्या पुलिस आपके Call Detail Record (CDR) ले सकती है ?
वर्तमान क्रांति
वडोदरा, 23 अगस्त 2025। डिजिटल युग में कॉल डिटेल रिकॉर्ड (CDR) को लेकर लोगों में अक्सर भ्रम और डर रहता है कि कहीं पुलिस बिना अनुमति उनके कॉल की जानकारी न निकाल ले।
लेकिन हकीकत यह है कि कानून इसके लिए स्पष्ट दिशा निर्देश देता है।
उफ्फ क्या है ?
-उउफ यानी Call Detail Record इसमें यह पूरी जानकारी होती है कि आपने किस नंबर पर कॉल किया, कब किया, कितनी देर बात हुई और किस लोकेशन से कॉल की गई।
कानून की नजर में CDR CrPC धारा 91 - पुलिस को
उउफलेने के लिए कोर्ट का आदेश (Court Order) आवश्यक है। Indinf Telegraph Act धारा 5(2) केवल राष्ट्रीय सुरक्षा या गंभीर अपराध की स्थिति में सरकार या पुलिस को उफ्रलेने की अनुमति दी जा सकती है। सुप्रीम कोर्ट का पुट्टास्वामी केस -निजता (Privacy) को मौलिक अधिकार माना गया है। बिना वैध प्रक्रिया किसी का CDR लेना अवैध है।
BNS धारा 237
यदि कोई पुलिसकर्मी या अन्य व्यक्ति बिना अनुमति किसी का उउफ्रनिकालता है, तो यह अपराध है और इसके लिए सजा का प्रावधान है।
निष्कर्ष
पुलिस बिना कोर्ट आदेश आपका उउफ्रनहीं निकाल सकती। आपकी निजता और गोपनीयता भारतीय कानून के तहत पूरी तरह सुरक्षित है।
Police on CDR?
तुकाराम मुंडे साहेब ॲक्शन मोडवर ✌️
✅🔥 तुकाराम मुंढे ॲक्शन मोडवर!
🚨 राज्यातील बोगस दिव्यांगांवर मोठी कारवाई सुरू होणार आहे.
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून धडाकेबाज पावलं उचलली आहेत.
📝 आदेश :
➡️ राज्यातील सर्व ३४ जिल्हा परिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी सूचना
➡️ १८ सप्टेंबर रोजी अधिकृत पत्र जारी
➡️ जिल्हा परिषदेतील शिक्षण, आरोग्य, बांधकाम, प्रशासन अशा सर्व विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची पडताळणी
➡️ दिव्यांग प्रमाणपत्रांची काटेकोर तपासणी सुरू
➡️ बनावट प्रमाणपत्र आढळल्यास सवलती तत्काळ रद्द
⚖️ कायद्याचे तरतुदी :
➡️ दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६, कलम ९१ नुसार कारवाई
➡️ दोषी व्यक्तीला २ वर्षांपर्यंत तुरुंगवास
➡️ किंवा १ लाख रुपयांपर्यंत दंड
➡️ किंवा दोन्ही शिक्षा लागू होऊ शकतात
📊 वास्तव :
➡️ राज्यभरात बोगस दिव्यांगांचा आकडा वाढत चालला आहे
➡️ अनेक अधिकारी-कर्मचारी खोट्या प्रमाणपत्रांवर सवलती घेत आहेत
➡️ खरी दिव्यांग मंडळी मात्र हक्कांपासून वंचित राहत आहेत
🙏 तुकाराम मुंढेंचं स्पष्ट मत :
➡️ “प्रत्येक दिव्यांगजनाला सन्मानाने व समाधानाने जगण्याचा हक्क आहे”
➡️ “बोगस लाभ घेणाऱ्यांमुळे खरी गरज असलेले दिव्यांग वंचित राहू नयेत”
➡️ “समाजातील प्रत्येक दिव्यांग सक्षम झाला तरच समाज खऱ्या अर्थाने सक्षम होईल”
📅 पुढील कार्यवाही :
➡️ जिल्हा परिषदा १ महिन्याच्या आत अहवाल सादर करणार
➡️ पडताळणीनंतर फक्त लक्षणीय दिव्यांगत्व असलेल्यांनाच लाभ
➡️ ४०% पेक्षा कमी अपंगत्व असल्यास कुठलाही लाभ नाही
➡️ आधी घेतलेले लाभ परत वसूल करण्याची तयारी
💪 आता बोगसगिरीला चाप बसणार
👉 खरी मदत फक्त खरी हक्कदार दिव्यांगांना!
---
#TukaramMundhe #Maharashtra #Divyang #ActionMode #IAS #SocialJustice #ZP #FakeCertificate #BreakingNews #MaharashtraNews #SeasonalEvents
#mondaymotivation
#SeasonalActivities
#FaithInspiration
#motivationalspeech
#positivevibes
#SpiritualGrowth
#motivation
#motivationmonday
बुधवार, २४ सप्टेंबर, २०२५
शहीद सोमनाथ सूर्यवंशी केस अपडेट 👉
शहिद सोमनाथ सूर्यवंशी केस अपडेट ―
दि. 24 सप्टेंबर1932 पुणे करार
१ , स्वतंत्र मतदार संघ
विरांगणा राणी दुर्गावती समाज क्रांतीकारक ✌️
विरांगणा राणी दुर्गावती यांचा जन्म दिनांक 5 ऑक्टोंबर 1524 मध्ये प्रसिद्ध राजपूत राजा चंडेल सम्राट किरत राय यांचे कुटुंबात झाला कालन जर किल्ला (बांदा, उत्तर प्रदेश भारत) हे त्यांचे जन्मस्थान होय मोहम्मद गजनी याला पळता भुई थोडी करणाऱ्या राणा विद्याधर यांचा बचाव करण्यामुळे चंदेल राजघराणे इतिहासात प्रसिद्ध झाले. राणा विद्याधर यांच्या शिल्पकलेवरील प्रेमाची प्रचिती जगप्रसिद्ध खजुराहो मंदिर व कालन जर किल्ल्याकडे पाहून येते. राणी दुर्गावती यांच्या पराक्रमामुळे त्यांच्या वंश परंपरागात धैर्य व कला भक्तीच्या परंपरेला आणखीन प्रतिष्ठा लाभली 1542 साली, राणी दुर्गावती यांचा विवाह गुंड राजघराण्यातील राजा संग्राम शहा यांचे सुपुत्र दलपत शहा यांच्याशी बऱ्याच संघर्षानंतर झाला. या विवाह मुळे चंडाल व गोंड राजघराणे एकत्र आले याच कारणामुळे शेरशः सुरीचा पाढाव करते समय राणा किरत सिंग यांना आपले जावई दलपत शहा यांच्याकडून मदत मिळाली नंतर राणीने आपली राजधानी सिंगर गडावरून हलवून चौरंग गडावर नेली सातपुडा पर्वतरांगा मधील या किल्ल्याला राजकीय महत्त्व होते 🙏 तसेच विरांगणा राणी दुर्गावती यांचा मृत्यू दिनांक 24 जून 1564 मध्ये झाला 🙏 जय आदिवासी जय बिरसा🙏 जय भीम🙏 जय शिवराय 🙏 नमस्कार प्रयत्न फक्त एवढेच मित्र नको आपल्या आदिवासी समाजाला आपल्या समाज क्रांतीकाराविषयी थोडीबोध माहिती असणे गरजेचे आहे कारण आपणच आपला इतिहास विसरत आहोत आणि आपल्याला जर आपला इतिहास माहिती नसला तर आपण कोणाला काय संदर्भ सांगणार. 🙏 तसेच दोन शब्द बोलून आपली रजा घेतो 🙏आदिवासी जमात विकास संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक. अध्यक्ष किरण सखाराम बर्डे 🙏
मंगळवार, २३ सप्टेंबर, २०२५
आदिवासी समाजाने स्वतःच्या रक्ताने माननीय सुप्रीम कोर्ट जज भूषण गवई साहेबांना लिहले पत्र👉
नवरात्राच्या पार्श्वभूमीवर पारधी बांधवांचे रक्ताने लिहिलेले पत्र : गायरान जमिनीच्या मागणीसाठी सरन्यायाधीशांना आवाहन
क्रांतिवीर राघोजी भांगरे ✌️
क्रांतिवीर राघोजी भांगरे जन्म दिनांक 8 नोव्हेंबर 1805 राघोजींचा जन्म महादेव कोळी जमातीत झाला मराठा सैन्यास हरवल्यानंतर ब्रिटिशांनी महादेव कोळ्यांच्या परंपरागत अधिकारात गणल्या जाणाऱ्या सह्याद्रीतील किल्ल्यांच्या शिलेदाऱ्या, वतनदाऱ्या काढल्या परंपरागत अधिकार काढून घेतल्याने महादेव कोळ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. इ. स. 1828 साली. शेत सारा वाढवण्यात आला सारा वसुलीमुळे गोरगरिबांना रोख पैशाची गरज भासू लागली त्यामुळे गोरगरीब सावकार, वाण्याकडून भ रमसाठ दराने कर्ज घेऊ लागले कर्जाच्या मोबदल्यात सावकार जमिनी बळकवू लागले त्यामुळे राघोजींनी सावकार आणि ब्रिटिश यांच्या विरोधात बंडाला सुरुवात केली इसवी सन १८३० साली अकोले तालुक्यातील रामा किंवा पकडून अहमदनगर येथील तुरुंगात फाशी देण्यात आली यामुळे महादेव कोळी जमातीच्या बंडखोरात दहशत पसरेल असे ब्रिटिशांना वाटत होते. रामाचा जोडीदार राघोजी भांगरे याने सरकार विरोधी बंडात सामील होऊ नये, यासाठी त्याला मोठ्या नोकरीवर घेतले. परंतु नोकरीत पदोपदी होणारा अपमान आणि पगारातील काटछाट यामुळे राघोजी चिडले आणि नोकरी सोडून त्यांनी बंडात उडी घेतली. पुणे जिल्ह्यात व नगर जिल्ह्यात राघोजी आणि बापू भांगरे यांच्या नेतृत्वाखाली उठाव सुरू झाला. इ. स. 1838 साली रतनगड आणि सनगर किल्ल्यांच्या परिसरात त्याने बंड उभारले कॅप्टन मंकिटोश याने हे बंड मोडण्यासाठी सर्व अवघड खिंडी, दर्या,घाट रस्ते जंगले यांची बारीकसारीक माहिती मिळवली. बंडखोरांची गुपिते बाहेर काढली परंतु बंडखोर वरमले नाही. उलट बंडाने व्यापक रूप धारण केले ब्रिटिशांनी कुमक वाढवले मार्ग रोखून धरले 80 लोकांना कैद केले दहशतीमुळे काही लोक उलटले फंद फितुरीमुळे राघोजींचा उजवा हात समजला जाणारा बापूजी मारला गेला. राघोजींना पकडण्यासाठी इंग्रज सरकारने पाच हजारांचे बक्षीस जाहीर केले. ठाणे गॅजेटी यरच्या जुन्या आवृत्तीत लिहिल्याप्रमाणे ऑक्टोंबर 1843 मध्ये राघोजी भांगरे मोठी टोळी घेऊन घाटावरून खाली उतरले आणि त्यांनी अनेक दरोडे घातले असा उल्लेख आहे राघू जिने मारवाड्यांवर छापे घातले त्यांनी पोलिसात तक्रार केली ठाव ठिकाण विचारायला आलेल्या पोलिसांना माहिती न दिल्याने चिडलेल्या पोलिसांनी राघोजींच्या आईचे निर्दयीपणे हाल केले त्यामुळे चिडलेल्या राघवजीने टोळी उभारून नगर व नाशिक येथे हल्ले केले. हाती लागलेल्या प्रत्येक मारोड्यांचे नाक कापले राघोजींच्या भयाने मारवाडी गाव सोडून पळाले असा उल्लेख अहमदनगरच्या गॅजेट इयर मध्ये सापडतो. साताऱ्याच्या पदावून खाली झालेल्या छत्रपतींना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इंग्रजा विरुद्ध उठावाचे व्यापक प्रयत्न चालले होते त्यांच्याशी राघोजींचा संबंध असावा असे अभ्यासकांचे मत आहे 🙏🙏🙏 नमस्कार माझ्या सर्व आदिवासी बांधवांना व मित्रांना आपल्या ब्लॉगवर नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी लाईक शेअर आणि कमेंट करा 🙏
सोमवार, २२ सप्टेंबर, २०२५
ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल ✌️
प्रेस नोट
देशाचे मूळ मालक आदिवासी ✌️
माहिती कामाची ✌️
अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष.ऍड.धर्मपाल मेश्राम साहेब 🙏
#पारधी समाजाला न्याय मिळवण्यासाठी एकजुटीने पावले उचला : अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम साहेबांच्या मुदतवाढीची मागणी
रविवार, २१ सप्टेंबर, २०२५
आधुनिक काळात जुनी आठवण एक गाडी ✌️
अग्रेषित
ए.सी. च्या आधुनिक युगात काही वर्षानंतर कोणाला सांगीतले की एक अशी गाडी होती जीच्या पाच उघड्या गेटमधून भर्र हवा खात लोक प्रवास करायचे. कोणाला खरे वाटणार नाही.ख-या अर्थाने ग्रामिण भारत डोळ्यासमोर ठेऊन महींद्रा कंपनीने बनवीलेली कमांडर गाडी ग्रामिण भारताचा श्वास होती.2000 सी सी चे दमदार DI इंजीन 62 हॉर्सपॉवर ची शक्ती अशा आयुधांनी सज्ज हे वाहन ऑफरोडवर एखाद्या अजेय योद्ध्याप्रमाणे होते.नदी नाले असो डोंगर द-या असो , रस्ता असो की नसो कमांडरला कोणतीच अडचण रोखु शकत नसे. एखाद्या वेळी बंद पडली तरी इंजिन स्ट्रक्चर एवढे सोपे की कोणताही रोडसाईड मेकैनिक समस्या दुर करुन टाकायचा.अगोदर रीवर्स सहीत चार गीअरची कमांडर पुढे पाच गीअरची झाली. कमांडरच्या ड्रायव्हरची बैठक अशी होती की ड्रायव्हर तीरपा बसायचा. बाहेरुन पाहील्यावर स्टेअरींगच्या मागे ड्रायव्हर कधीच बसलेला दीसत नसे . उजव्या बाजूने थोडासा पेंदा बाहेर काढुन हात तीरपे करुन कमांडरच्या ड्रायव्हींग सीटवर माणुस एकदा बसला की साक्षात सारथी बनल्याची फीलिंग यायची. या तीरप्या बसण्याचा एक फायदा अजुन होता, ड्रायव्हरच्या बाजुच्या सीटवर कमितकमी चारजण अजुन बसवता यायचे. दुरुन पाहील्यावर समोर बसलेल्या पाच जणांपैकी गाडी नेमका कोण चालवतोय हे कमांडर बनवीणारा इंजिनीअरही ओळखु शकत नव्हता.गाडीची सीटिंग कैपिसिटी दहा सीट्सची असली तरी, फक्त दहा सीट्स बसविणे म्हणजे गाडीचा अवमान असायचा. मी सांगतो तुम्ही हीशोब लावा..समोरच्या सीटवर ड्रायव्हरसहित पाच, मधल्या सीटवर सहा, मागच्या डाल्यातल्या समोरासमोरच्या सीटवर तीन इकडुन तीन तीकडुन, त्याच सीटच्या ग्यापीत एखादी बारीक बुढी कींवा दोन बारकी खोसायची. समोरच्या भागात असलेल्या स्टेपनीवर एक.. हुश्श..!! कीती झाले ? टोटल एकोणवीस, मागे लटकणारे उत्साही पोरं सोडुन द्या.. कंडक्टर गाडीच्या खालुनच ड्रायव्हरला चलो.. अशी हाळी द्यायचा आणी चालत्या गाडीत असा काही शीताफीने गाडीला लटकायचा की अहाहा..!! सारे प्रवासी एकदम इम्प्रेस.लहान पोट्टे बाट्टे त आपण पुढे चालून कंडक्टरच बनायचं हे ठरवून घ्यायचे. जवान पोरगी सोरगी अशा कौतुकाने कंडक्टरकडे पहायची जणु काही सुपरमैन होय..खरी मजा तर इकडे कॉकपीटमध्ये यायची. ड्रावरसाहेब झोकात स्टेअरींग फीरवत आणी पैसेंजरच्या टांगीखालून हात घालून खपाखप गेर मारत साक्षात सुखोई 2000 चा आनंद घ्यायचे.एखादा पैसेंजर ड्रायव्हरशी सलगी दाखवत, आपलं गाडीच्या बा-यातलं ज्ञान पाजळत म्हणायचा, " क्यों ड्राव्हरसाब, गाडी भोत कन्हार रई ?"ड्रायव्हर त्याच्याकडे न पाहता उत्तर द्यायचा,हौ साला, पम का काम करना पडता."
पैसेंजर नोबेल जींकल्याच्या अविर्भावात आजुबाजुच्या पैसेंजरकडे तुच्छतेने पहायचा..
कमांडर अशी खरी लेकुरवाळी गाडी, ग्रामिण भारताचे हीमोग्लोबीन. काळाच्या ओघात आता गडप होत चाललेली कमांडर एखाद्या थकलेल्या जीवट व्रुद्धाप्रमाणे खेड्यापाड्यात आपले अस्तीत्व टीकवत तग धरुन आहे. भवीष्यात पुढच्या पीढीला एक दुर्मीळ वाहन म्हणुन संग्रहालयात कमांडर पहायला मीळेल..
आदिवासी योद्धा
*षडयंत्र* आणि आपले *उलगुलान*
माहिती अधिकार दणका
लाडकी बहीण योजना ekyc कशी करावी?
सोमवार, १५ सप्टेंबर, २०२५
महिलांसाठी अनुदानित योजना 2025
रविवार, १४ सप्टेंबर, २०२५
फासी पारधी इतिहास
👉 👉 पोलीस स्टेशनच्या बाबतीत सर्वांच्या जीवनात उपयोगि पडणारे अतिशय मोलाची माहिती 👍
👉👉 नमस्कार आज आपण पुन्हा ब्लॉगिंग चालू केलेले आहे या ब्लॉगिंग मध्ये आज अतिशय छान असा लेख घेऊन आलो आहे या लेखात असलेली माहिती सर्वांसाठीच ख...
-
नवरात्राच्या पार्श्वभूमीवर पारधी बांधवांचे रक्ताने लिहिलेले पत्र : गायरान जमिनीच्या मागणीसाठी सरन्यायाधीशांना आवाहन ✒️(समाज प्रतिनिधी :अनिल ...
-
👉 नमस्कार सर्व मित्रांना सर्वात प्रथम 🙏जय आदिवासी 🙏जय जोहार 🙏 क्रांतिकारी जय भिम🙏 जय लहुजी🙏 जय शिवराय🙏 चला तर मित्रांनो आज आपण घेऊन ...
-
खूप चांगला हा प्रश्न 🤔 “गावठाण”, “पांदण रस्ता”, “हद्द”, “रुंदी–लांबी” या संकल्पना सामान्य जनतेला समजावून सांगणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाल...



















