https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-9617618308777656 Kiran Barde new tricks and update: सप्टेंबर 2023

शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३

आदिवासी दफन भूमी स्मशानभूमी चोरीला गेली भाग ....11

नमस्कार मित्रांनो आपण 28/9/2023 रोजी आदिवासी दफन भूमी चोरीला गेली भाग 10 बघितलेला आहे आणि आज दिनांक 29 /9/ 2023 रोजी आदिवासी दफनभूमी स्मशानभूमी चोरीला गेली भाग 11 बघणार आहोत आज भाग 11 मध्ये आपण नवीन खुलासा करणार आहोत तत्पूर्वी भाग दहा मध्ये आपण बघितले होते की तलाठी आणि मंडळ अधिकारी यांचा पंचनामा कशा पद्धतीने झाला होता आणि सातबाराचे अवलोकन करून कशा पद्धतीचे पंचनामाचे स्वरूप तयार झाले होते त्या माध्यमातून एक अति महत्त्वाचा विषय तुमच्यासमोर मांडायचं विसरून गेलो दिनांक 7/11/2011 रोजी द्रोपदाबाई साहेबराव प्रधान यांनी पैठण न्यायालय ते दावा दाखल केला होता निरंतर मनाई हुकूमासाठी त्या दाव्याचे स्वरूप आज आपण भाग 11 मध्ये बघणार आहोत प्रतिवादी त्यांनी किती जणांना केले आहे हे देखील सविस्तर बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आता यामध्ये वादी म्हणजे दावा दाखल करणारे द्रोपदाबाई साहेबराव प्रधान हे आहेत आणि यांनी चार जणांविरुद्ध खटला दाखल केला होता चला तर मग त्याचे अर्ज जणांचा सविस्तर माहिती बघुयात प्रतिवादी क्रमांक एक लक्ष्मण पिता चंद्रभान मोरे वय 70 वर्ष धंदा मजुरी राहणार इमामपूर वाडी तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद प्रतिवादी क्रमांक दोन हरिश्चंद्र पिता शंकर दळवी वय 45 वर्ष धंदा व राहणार सदर प्रतिवादी क्रमांक तीन बबन पिता गोविंद मोरे वय ४५ वर्ष धंदा व राहणार सदर प्रतिवादी क्रमांक चार सखाराम पिता बंडू बर्डे वय 36 वर्ष धंदा मजुरी राहणार वाकी तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद आता इथे प्रतिवादी क्रमांक चार म्हणजे माझ्या वडिलांच्या पत्त्यामध्ये वाकी टाकण्यात आलेल्या आणि त्यांचा मुळात जन्मच इमामपूर या ठिकाणी झाला आहे चला तर मग वादीच्या दाव्याचे स्वरूप बघूया एक अति महत्त्वाचे मित्रांनो आज मी जो फोटो अपलोड केला आहे तुझा पण भूमीत काढलेला फोटो आहे पॅरेग्राफ क्रमांक दोन हे के दावा जमीन गट नंबर 44 पैकी 39 आर क्षेत्र वादीने जमिनीचे पूर्वीचे मालक बबन धनाजी कोकाटे राहणार पैठण खेडा तालुका पैठण यांच्याकडून कायम रजिस्टर खरेदीखत दिनांक 16 /8 /1991 रोजी विकत घेतली आहे त्या अन्वये वादी सदर मिळकतीची कायदेशीर मालक व कर्जदार झाली असून मिळकतीचा मालकी कब्जे हक्काने उपभोग घेत आली आहे त्यासंबंधीचा वादीच्या नावे सातबारा रेवेन्यू रेकॉर्डला फेर क्रमांक 114 मंजूर आहे तसेच गट नंबर 44 पैकी साहेबराव प्रधान यांच्या मालकी हक्कातील 39 आर पैकी दोन गुंठे क्षेत्रवादीने नंदकिशोर सिताराम लोखंडे ,शंकर दत्तात्रय आमले ,देवराव अंबादास गायकवाड, यांना खरेदी खतानुसार विहिरीसाठी विक्री केली त्यामुळे उर्वरित क्षेत्र 37 आर ही दावा मिळकत आहे सदर दावा मिळकतीची कायदेशीर मालक व कब्जेदार वादी आहेत पॅरेग्राफ क्रमांक चार वादी व तिचे कुटुंबीय गरीब असून कायद्याचा मान राखणाऱ्या आहेत त्यांना गावात कोणाची जात नाही उलट प्रतिवादी हे भिल्ल समाजाचे असून आड दांडवृत्तीचे आहेत व त्यांना गावातील लोकांची फुस व साथ आहे दावा मिळकतीशी प्रतिवादी किंवा त्यांच्या समाजाचा काही एक हक्क संबंध नसताना ते गावातील लोकांच्या सांगण्यावरून वरून आदिवासी समाजाची स्मशानभूमी दफनभूमी निर्माण करू पाहत आहेत त्यानुसार प्रतिवादी हे पुढाकार घेऊन दावा मिळकतीवरील वादीच्या मालकी कब्जे हक्कास व उपभोगास हरकत अडथळ्याचे कृत्य करत आले असून त्यानुसार ते वादीची मिळकत एन के एन प्रकारे हडप करून नुकसान करू पाहत आहेत प्रतिवादीचे सदरची कृत्य अनाधिकृत तसेच बेकायदेशीर स्वरूपाचे आहे पॅरेग्राफ क्रमांक पाच वादी व तिचे कुटुंबीय प्रतिवादी व त्यांच्या समाजातील लोकांना तसेच प्रतिवादींना चि थावनी देणाऱ्या लोकांना दावा मिळकतीशी तुमचा काही एक हक्क संबंध नसल्याचे व दावा मिळकतीमध्ये कोणतीही स्मशानभूमी दफन भूमी नसल्याची बाब समजावून सांगण्यात आले परंतु प्रतिवादी हे वादी व तिच्या कुटुंब यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करत आले आहेत प्रतिवादीचे दावा मिळकतीवरील वादीच्या मालकी कब्जा हक्कास व उपभोगास हरकत अडथळ्याचे कृत्य चालूच आहेत हे होते साहेबराव प्रधान यांचे स्टेटमेंट ज्यावेळेस त्यांनी वादी म्हणून 2011 ला न्यायालयात खटला दाखल केला होता एक विचार मनात येतोय जर एवढं सगळं असताना पंचनामा झाला मोजणीचा मार्ग काढण्यात आला मंग्या बाबांना मोजणीची इतकी का भीती वाटते कारण यांचा आता पितळ उघड व्हायची वेळ आली. चला तर मित्रांनो यानंतर सविस्तर बघुयात आदिवासी द फोन भूमी चोरीला गेली भाग-12 उद्या निश्चितच आपण सुरुवात करणार आहोत कारण प्रतिवादींनी या संदर्भात त्यांचे उत्तर काय सादर केले हे आपल्याला सर्वांना जाणून घ्यायचेच असेल त्यासाठी भेटूया उद्या दिनांक 30 /9 /2023 रोजी जय आदिवासी जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम........ धन्यवाद..🙏

गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३

आदिवासी दफनभूमी/स्मशानभूमी चोरीला गेली भाग... 10

नमस्कार मित्रांनो काल दिनांक 27 /9/ 2023 रोजी आदिवासी दफनभूमी स्मशानभूमी चोरीला गेली भाग 9.. बघितलेला आहे आणि आज दिनांक 28 9 2023 रोजी आदिवासी दफनभूमी स्मशानभूमी चोरीला गेली भाग 10 बघणार आहोत भाग नऊ मध्ये आपण बघितले होते की कशा पद्धतीने तहसीलदार साहेबांचे पत्र निघाले होते तसेच कशा पद्धतीने मोजणीसाठी तयार नसलेल्या साहेबराव प्रधान यांना ग्रामपंचायतीने लेखी व वारंवार तोंडी सूचना दिल्या होत्या तसं पत्र ग्रामपंचायत  आपल्याला दिलं होतं त्यानंतर महत्त्वाचा भाग म्हणजे आज आपण पंचनामा कशा पद्धतीने झाला व पंचकमिटी मध्ये कशा पद्धतीने निर्णय घेण्यात आले आज आपण सविस्तर विवरण बघणार आहोत चला तर मग पुढील लेखकाला सुरुवात करूया पंचनामा दिनांक 4/11/2020 आम्ही खाली सह्या करणार पंच लोक मौजे इमामपूर तालुका पैठण कारणे पंचनामा लिहून देतो की मंडळ अधिकारी विभाग बिडकीन व तलाठी सज्जा मारोळा यांनी बोलविल्यावरून मौजे इमामपूर येथील खाजगी जमीन गट नंबर 44 मध्ये हजर झालो त्यांनी आम्हाला माननीय तहसीलदार पैठण यांचे पत्र जावक क्रमांक 2020 जमाबंदी एक कावी 498 दिनांक 22 सप्टेंबर 2020 हे वाचून दाखवले त्यातील विषय आदिवासी भिल्ल समाजाची स्मशानभूमी दफन भूमीवरील अतिक्रमण हटवणे बाबत त्यानुसार प्रत्यक्ष स्थळ पाणी व चौकशी केली व सातबारा अवलोकन केले असता गट नंबर 44 चे एकूण क्षेत्र एक हेक्टर 59 आर असून त्यामध्ये गैर अर्जदार द्रोपदाबाई साहेबराव प्रधान यांचे क्षेत्र छत्तीस आर असल्याचे दिसून येते यापैकी गैर अर्जदाराने दोन वेगवेगळ्या व्यक्तींना विहिरीसाठी विकलेले दोन आर क्षेत्र इतर हक्कात नोंद आल्यामुळे मालकी हक्कातून कमी झालेले नाही गैर अर्जदार द्रोपदाबाई साहेबराव प्रधान यांच्या ताब्यात असलेल्या क्षेत्रांमध्ये पूर्वी पार वहिवाटीप्रमाणे मौजे इमामपूर येथील भिल्ल आदिवासी समाजाची दफनभूमी स्मशानभूमी असल्याचे उपस्थित पंचांनी सांगितले भिल्ल आदिवासी समाज हे त्यांच्या रीती रिवाजाप्रमाणे मयत व्यक्तींचे दफन करतात दफन करत असलेल्या जागेवर आज रोजी गैर अर्जदार यांनी उसाची लागवड केलेली आहे त्यामुळे भिल्ल समाजाचे दफन केलेल्या खुणा म्हणजेच त्यांच्या रीतीरीवाजाप्रमाणे दगड तांदळे आज पाहणे केले असता आढळून येत नाही आदिवासी भिल्ल समाज इमामपूर यांचे म्हणणे आहे की सदरील जागा गाळपऱ्याची आहे व त्या लगतचा पूर्व बाजूची शेतकरी द्रोपदाबाई साहेबराव प्रधान यांनी जागा ताब्यात घेऊन उसाची लागवड केली व गैर अर्जदार यांचे पती साहेबराव यादव प्रधान यांचे म्हणणे आहे की सातबारा प्रमाणे माझ्या नावे असलेली जमीन ही माझ्या कब्जात पूर्ण भरत नाही तसेच मी भिल्ल समाजाच्या लोकांना दफनविधी करण्यासाठी अडवणूक अथवा मज्जाव केलेला नाही परंतु गैरअर्जदार हे अंत्यविधी झालेल्या जागेवर दरवर्षी नांगरणी करून पिकाची लागवड करत असतात त्यामुळे या ठिकाणी दफन करण्यास अडचण तयार होते या ठिकाणी सर्व उपस्थित पंच व अर्जदार भिल्ल समाज व गैरअर्जदार यांच्या मतानुसार असे ठरले की अर्जदार व गैर अर्जदार यांनी सामायिक निम्म्या हिस्स्याने मोजणी फी भरून गट नंबर 44 मधील साहेबराव यादव प्रधान यांच्या जमिनीची मोजणी करायचे आणि मोजणी केल्यानंतर गैर अर्जदार यांच्या ताब्यात असलेली भिल्ल समाजाची दफनभूमीची गाळपेरा जमीन शिल्लक ताब्यात भरल्यास ते सौखुशीने ताबा सोडून देतील तोपर्यंत भिल्ल समाजाच्या दफन विधी अडथळा निर्माण करणार नाहीत असे पंचा समक्ष ठरले आहे गट नंबर 44 ची चतुर सीमा पूर्वेस गट नंबर एक खाजगी व पश्चिमेस खाम नदी उत्तरेस गट नंबर 43 मधील नाला याप्रमाणे आहे व भिल्ल समाजाच्या स्मशानभूमी गट नंबर 44 च्या पश्चिमेस असलेल्या खाम नदीच्या पूर्व बाजूस पूर्वपार वहिवाट आहे करिता पंचनामा केला आहे मित्रांनो हे होतं आदिवासी दफनभूमीच्या पंचनामाचा स्वरूप पंचनामा झाल्यानंतर पुढे काय घडलं हे बाकी मी तुम्हाला भाग आठ आणि नऊ मध्ये सांगितलं चला तर मग लवकरच घेऊन येतोय आदिवासी दफन भूमी चोरीला गेली भाग 11 तोपर्यंत परवानगी असावी जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी जय भिम........🙏 धन्यवाद 

बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३

आदिवासी दफनभूमी स्मशानभूमी चोरीला गेली भाग ...9

नमस्कार मित्रांनो काल दिनांक 26/ 9/ 2023 रोजी आपण आदिवासी दफन भूमी स्मशानभूमी चोरीला गेली भाग आठ बघितला होता आणि आज दिनांक 27 /9/ 2023 रोजी आपण आदिवासी दफन भूमी चोरला गेली भाग 9 बघणार आहोत भाग आठ मध्ये बघितले होते आपण की प्रतिवादी क्रमांक एक दोन यांनी कशा स्वरूपाचे यांचा जबाब न्यायालयामध्ये सादर केला होता आज आपण पंचनामेसाठी निघालेले तहसीलदार साहेबांचे जे पत्र होते ते पत्राचे स्वरूप बघणार आहोत तसेच ग्रामपंचायत ने दिलेल्या स्वरूपाचे पत्र त्या पत्राचे स्वरूप देखील बघणार आहोत त्यामुळे तुमच्या लक्षात येऊन जाईल की कुठला प्रकार खोटा आणि कुठला प्रकार खरा आहे तो चला तर मग यापुढील लेखाला सुरुवात करूया दिनांक 22 सप्टेंबर 2020 रोजी तहसील कार्यालय पैठण जिल्हा औरंगाबाद जावक क्रमांक 2020 जमाबंदी एक कावी 498 मंडळ अधिकारी विभाग बिडकीन तसेच तलाठी सज्जा मारोळा तालुका पैठण त्यानंतर विषय आदिवासी भिल्ल समाजाची स्मशानभूमी दफन भूमी वरील अतिक्रमण हटवणे बाबत त्यानंतर संदर्भ. श्री सखाराम बंडू बर्डे व इतर आदिवासी भिल्ल समाज मौजे इमामपूर वाडी तालुका पैठण यांचे निवेदन दिनांक 24 /2/2020 पुढे उपरोक्त विषयी कळविण्यात येते की श्री सखाराम बंडू बर्डे व इतर आदिवासी भिल्ल समाज मौजे इमामपूर तालुका पैठण यांनी या कार्यालयास निवेदन सादर करून मौजे इमामपूर वाडी येथील गट नंबर 44 च्या बाजूला असलेल्या आदिवासी भिल्ल समाजाची स्मशानभूमी दफन भूमीवरील अतिक्रमण हटविणे बाबत विनंती केली आहे करिता प्रकरणात मौजे इमामपूर वाडी येथील गट नंबर 44 चे बाजूला असलेल्या आदिवासी भिल्ल समाजाची दफन भूमी स्मशानभूमीची पाहणी करण्यात यावी सदर ठिकाणी वापरात असलेल्या स्मशानभूमीचे जागेवर अतिक्रमण असल्याचे निदर्शनास आल्यास सदरचे अतिक्रमण काढण्यात यावे तसा अहवाल पंच नाम्यासह या कार्यालयास सादर करण्यात यावा..... प्रतिलिपी श्री सखाराम बंडू बर्डे व इतर आदिवासी भिल्ल समाज मौजे इमामपूर वाडी तालुका पैठण यांना माहितीस्तव...... नंतर तहसीलदार साहेबांची स्वाक्षरी.... आता यानंतर ग्रामपंचायतीने दिलेल्या लेखी स्वरूपाच्या पत्रात त काय विवरण आहे ते आपण बघूयात दिनांक 5/3/2021 हे सर्व ग्रामपंचायतच्या लेटरहेड वरती आहे मित्रांनो विषय भिल्ल समाजाच्या स्मशानभूमी दफनभूमी बाबतची सध्याची परिस्थिती माननीय मंडळ अधिकारी तहसील कार्यालय पैठण यांचे मार्गदर्शनानुसार दिनांक 4/11/2020 रोजी मौजे इमामपूर येथे तलाठी व ग्रामसेवक तसेच गावकरी यांच्या उपस्थितीत भिल्ल समाजाच्या स्मशानभूमी दफनभूमी बाबत स्थळ ठिकाणी बैठक झाली त्यानुसार संबंधित जागेची मोजणी करून दफनभूमीची जागा गट नंबर 44 ची साहेबराव यादव प्रधान यांच्या जागेची मोजणी करून हद्द कायम करण्याचे ठरलेले होते दोन्ही पक्षांनी संयुक्तपणे मोजणी करण्याचे ठरले होते दोन्ही पक्षाकडून मोजणीसाठी तयारी दर्शवली होती परंतु सौद्रपदाबाई साहेबराव प्रधान यांनी मोजणीच तयारी दर्शवली नाही तेव्हा माननीय मंडळ अधिकारी तहसील कार्यालय पैठण यांनी याबाबत लक्ष देऊन पुढील कारवाही करावी व सदर प्रकरण सोडण्यात यावे अशी मागणी केलेली आहे तेव्हा पुढील कारवाईस्तव सविनय सादर त्यानंतर ग्रामसेवक आणि सरपंच यांचा सही आणि ग्रामपंचायत शिक्का.....हे होते ग्रामपंचायतचे लेखी स्वरूपाचे पत्र आणि त्या मधला मजकूर आता तुम्हीच विचार करा सविस्तर आता एवढे सगळे शासकीय कागदाचे पुरावे असल्यानंतर माझ्यासारखा बॅकवर्ड क्लास मधला व्यक्ती कोर्टात खोटा खटला दाखल करायची हिंमत करू शकतो का ? नकळतच तुमचे उत्तर असेल कसं शक्य आहे ? मग अशी सध्याची परिस्थिती तयार झालेली आहे कारण पुढे जे  ते होईलच आणि विचार करण्यासारखे आहे ना मग रात्रंदिवस देवाला भजनारी  माणसं किती सत्य परिस्थितीचा काटेकोरपणे पालन करतात हे आपल्या लक्षात येते आणि हो यांना कुठेतरी भीती तयार झाली आहे त्यामुळे सैरा वैरा काहीही बोंबलत आहेत...... चला तर मित्रांनो उद्या पुन्हा भेटूया भाग 10 मध्ये आदिवासी दफन भूमी चोरला गेली भाग 10 जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय आदिवासी.........

मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३

आदिवासी दफनभूमी स्मशानभूमी चोरीला गेली भाग....8

नमस्कार मित्रांनो काल दिनांक 25/ 9/ 2023 रोजी आपण आदिवासी दफनभूमी चोरीला गेली भाग 7 बघितलेला आहे आणि आज दिनांक 26 /9/ 2023 रोजी आदिवासी दफनभूमी चोरीला गेली भाग.8. बघणार आहोत मित्रांनो भाग सात मध्ये आपण बघितले की कशा पद्धतीचे उलट सुलट स्टेटमेंट हे दूषित विचारांचे लोक देतायेत तसेच न्यायालयात यांनी जे स्टेटमेंट दिलेले आहे ती स्टेटमेंट ची कॉपी मी आज सविस्तर भाग.8. मध्ये घेतोय ते स्टेटमेंट वाचल्यानंतर तुमच्या देखील लक्षात येईल किती मूर्ख प्रवृत्तीचे लोक आहेत कितीतरी प्रश्न तुमच्या मनामध्ये माझ्या मनामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये येऊ शकतात चला तर मग जास्त वेळ न गमावता मी पुढील लेखाला सुरुवात करतो आता स्टेटमेंट यांच्या म्हणण्यानुसार कसे आहे ते बघा सर्वप्रथम तुम्हाला देखील कळाले पाहिजे की प्रकरण चालू कुठे आहे व कुठल्या स्तरावर आहे माननीय .दिवाणी न्यायाधीश साहेब , क. स्तर, पैठण यांचे न्यायालय आणि खटला क्रमांक. दी. मु. नंबर 136/2021आणि आता प्रतिवादी नंबर एक आणि दोन यांचे लेखी म्हणणे बघा सविस्तर मुद्दा क्र.  1)....असे की प्रतिवादी विरुद्ध प्रस्तुत चा दावा व अर्ज निष्कर्ष क्रमांक 5 देण्याचे कायदेशीर असे काही कारण नव्हते व नाही तसा त्याला हक्क अधिकार व locus stand नाही आणि वादीचा दावा व अर्ज निष्कर्ष क्रमांक पाच कायद्याने चालू शकत नाही सबब ते खर्चासह खारीज होणे न्याय व योग्य होईल . मुद्दा क्रमांक 2). हे की डावा कलम नंबर एक व त्या अनुषंगाने अर्ज निष्कर्ष क्रमांक 5. मधील मिळकत वर्णन मौजे इमामपूर तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद येथील जमीन गट नंबर 44 एकूण क्षेत्र एक हेक्टर 59 आर ह्या हद्दीपर्यंतचे कथन खरे आहे परंतु वादी आदिवासी भिल समाजाची पूर्वापारपासून चालत आलेली गट नंबर 44 च्या पश्चिमेस लागून असलेली 25 आर म्हणजे 25 गुंठे स्मशानभूमी दफन भूमीचे क्षेत्र व त्याच्या दर्शविलेल्या चतुर सीमा व नमो चतुर्थी मे आतील दावा मिळकत वगैरे हे संपूर्ण कथन चूक खोटे व बनावटीचे असून मोघमपणे स्वरूपाचे आहे करिता व मान्य आहे स्पष्टीकरण विशिष्ट विवरणात दिले आहे.. मुद्दा क्रमांक 3).. हे की दावा कलम नंबर २ व त्या अनुषंगाने अर्ज निष्कर्ष क्रमांक 5. मधील कथन मजकूर की दावा मिळकत ही पूर्वापार असून आदिवासी भिल समाजाची स्मशानभूमी दफनभूमी असून वादी तसेच इमामपूर येथील आदिवासी भिल समाज तसेच त्यांचे पूर्वज पूर्वपारपासून आदिवासी समाजाच्या मृत व्यक्तीचे दफनविधी अंतविधी सदरील दावा मिळकतीमध्ये करत आलेले आहेत आजही सदरील दावा मिळकतीमध्ये आदिवासी भिल समाज मृत व्यक्तीचे दफन विधी करत आहेत वगैरे हा संपूर्ण कथन मजकूर व दाखल फोटो चूक खोटे बनावटीचे असून दिशाभूल करणारे आहे करिता अमान्य आहे स्पष्टीकरण विशिष्ट विवरणात दिले आहे. मुद्दा क्रमांक 4.) दावा कलम नंबर 3. क्रमांक एक यांची गट नंबर 44 मध्ये एक हेक्टर 59 आर पैकी 39 आर एवढे क्षेत्र आहे इतर प्रतिवादी क्रमांक तीन ते बारा यांना यांनी गट नंबर 44 ऐवजी दावा मिळकत स्मशानभूमी दफनभूमी येथे सदरील विहीर खोदून पेरणी करून अंत्यविधीनंतर केलेल्या दगड तांदळाच्या खुणा नष्ट करून दावा मिळकतीमध्ये हरकत अडथळा करत आहेत प्रत्यक्ष दावा मिळकत ही प्रतिवादी क्रमांक 1 च्या गट नंबर 44 मधील मालकी व ताब्यातील क्षेत्राच्या पश्चिमेस आहे परंतु प्रतिवादी हे गट नंबर 44 मधील एक हेक्टर 59 आर क्षेत्राच्या व्यतिरिक्त आदिवासी समाजाच्या स्मशानभूमी दफनभूमीत दावा मिळकतीमध्ये हरकत अडथळा करत आहेत वगैरे हा संपूर्ण कथन मजकूर चूक खोटा व बनावटीचा असून दिशाभूल करणारा आहे तसेच चार गुंठे क्षेत्राचा दाखल फेरफार याबाबतची शहानिशा पुराव्या वेळी होईल करिता अमान्य आहे स्पष्टीकरण विशिष्ट विवरणात दिले आहे आता पॅरेग्राफ क्रमांक सहा मध्ये प्रतिवादी क्रमांक एक आणि दोन हे काय म्हणतात बघा..👉.. आदिवासी भिल समाजाच्या वतीने वादी चे वडील म्हणजे.मी किरण सखाराम बर्डे यांचे वडील सखाराम बंडू बर्डे व इतर आदिवासी भिल समाज मौजे इमामपूर वाडी तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद यांनी दिनांक 24 /2/ 2020 रोजी दावा मिळकत आदिवासी भिल समाजाची स्मशानभूमी दफनभूमीवरील अतिक्रमण हटवणे बाबत तहसीलदार साहेब तहसील कार्यालय पैठण यांना अर्ज केला होता सदरील अर्जाच्या अनुषंगाने तहसीलदार साहेब पैठण यांनी मौजे इमामपूर वाडी येथील गट नंबर 44 च्या बाजूला असलेल्या आदिवासी भिल्ल समाजाची स्मशानभूमी दफनभूमीची पाहणी करण्यात येऊन सदर ठिकाणी वापरात असलेल्या स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण असल्याचे निदर्शनास आल्यास सदरचे अतिक्रमण काढून तसा अहवाल पंचनामा सादर करण्याचे आदेश मंडळ अधिकारी व तलाठी सजा मारोळा तालुका पैठण यांना दिनांक 22/9/2020 नऊ रोजी आदेशित केले होते वगैरे या संपूर्ण कथन मजकुराबाबत या प्रतिवादींना माहिती नाही सबब नमूद मजकूर बाबी वादिने पुराव्यासह सिद्ध करणे गरजेचे आहे स्पष्टीकरण विशिष्ट विवरणात दिले आहे. आता पॅरेग्राफ क्रमांक 7.. तहसीलदार साहेब तहसील कार्यालय पैठण यांच्या २२/९/२०२० आदेशानुसार प्रत्यक्ष स्थळ पाणी चौकशी तसेच गट नंबर 44 च्या सात बारा उताऱ्याचे अवलोकन करून प्रतिवादी क्रमांक एक यांची गट नंबर 44 मध्ये 36 आर जमीन असून सदरील जमिनीच्या पश्चिमेस पूर्वी पार वहिवाटीप्रमाणे इमामपूर येथील आदिवासी भिल समाजाचे लोक दफन विधी करतात असे दिनांक 4/ 11/ 2020 रोजी च्या पंचनाम्यात नोंदवले आहे मात्र आदिवासी बिल समाजाची स्मशानभूमी दफनभूमी व प्रतिवादी यांच्या मालकी ताब्यातील क्षेत्र यांच्यामधील हद्दीच्या खुणा नष्ट करून प्रतिवादी हे दावा मिळकतीमध्ये हरकत अडथळा करत आहेत असे पंचनाम्यात असलेले वर्णन वगैरे हा संपूर्ण कथन व मजकूर या महाशयांना खोटा वाटतोय चला तर मित्रांनो या पुढील भाग क्रमांक 9.उद्या लवकरच घेऊन येईल आदिवासी द फन भूमी स्मशानभूमी चोरीला गेली भाग 9..जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी जय भिम🙏 जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आदिवासी दफन भूमी चोरीला गेली भाग.......8......

सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३

आदिवासी दफनभूमी// स्मशानभूमी चोरला गेली भाग 7.......

🙏नमस्कार मित्रांनो काल दिनांक 24/ 9 /2023 रोजी आपण आदिवासी दफन भूमी चोरीला गेली भाग सहा बघितला होता आज दिनांक 25 /9/ 2023 रोजी आदिवासी दफन भुमी चोरीला गेली भाग 7 बघणार आहोत भाग सहा मध्ये आपण बघितले होते की साहेबराव प्रधान यांचे कशा पद्धतीने दुखद निधन झाले होते कोर्टात हजर झाल्याच्या नंतर आता डोक्यात असा प्रश्न पडला की जो प्रतिवादी होता की तोच एक्सपायर झाल्यानंतर हा खटला चालवायचा कसा परंतु यामध्ये देखील कायदेशीर पद्धती आहेत प्रतिवादी जर मयत झाले तर प्रतिवादींची पत्नी आणि त्यांचे वारस यांना देखील कायद्याच्या चौकटीत उभा करता येऊ शकते आणि आपण देखील तेच केले मी ज्यावेळेस आदिवासी दफन भूमीच्या संदर्भात खटला न्यायालयात दाखल केला होता त्याच वेळेस साहेबराव यादव प्रधान यांची पत्नी द्रोपदाबाई साहेबराव प्रधान व मुलगा राजू  साहेबराव प्रधान यांचे  आधीच नाव टाकले होते त्यामुळे यांना देखील साहेबराव प्रधान यांना ज्यावेळेस न्यायालयाचे नोटीस गेले त्याच वेळेस यांना देखील नोटीस निघाले होते परंतु मित्रांनो या सर्व प्रकरणांमध्ये अति महत्त्वाची भूमिका बजावलेलं कॅरेक्टर त्यांच्या संदर्भात तुम्हाला थोडेसे दोन शब्द सांगायचं विसरून गेलो  ते म्हणजे माझे आदरणीय पुज्य आणि गुरू मानलेले शिवानंद टाकसाळे साहेब साहेबांनी मला वारंवार कशा पद्धतीने कार्यप्रणाली करायची व कशा पद्धतीने पाठपुरावा करायचा आहे वारंवार साहेबांनी मला सांगितले व सुचवले या प्रकरणांमध्ये जर गरिबांचे कैवारी म्हणून माझ्या सोबत अडचणीत उभा राहिले ते म्हणजे आपले माननीय शिवानंद टाकसाळ साहेब त्यावेळेस ते औरंगाबादला विभागीय आयुक्त या पदावर होते आणि त्यांचं काम देखील खूप स्टेट फॉरवर्ड असायचं त्यांच्याकडे जर गरिबांच्या संदर्भात कुठले प्रकरण जर गेले कधी तरी तात्काळ त्यावर ॲक्शन घेत असत साहेबांची ओळखच त्यांच्या कामामुळे ते अतिशय प्रेमळ स्वभाव तसेच कायद्याच्या दृष्टिकोनातून खूप चतुर आणि हुशार देखील परंतु दुर्दैव असं झालं की साहेबांनी या प्रकरणांमध्ये स्टेट फॉरवर्ड ॲक्शन घेते वेळेसच साहेबांची बदली दुसऱ्या स्टेट ला बदली झाली नाही तर आपल्याला न्यायालयात देखील येण्याची गरज पडली नसते असो ते आपलंच दुर्दैव समजावे लागेल साहेबराव प्रधान आणि त्यांच्या वारसांना नोटीस निघाल्यानंतर ते हजर झाले त्यांचे लेखी स्वरूपाचे जबाब देखील न्यायालयात नोंदवले गेले मी त्यांच्या छायांकित प्रती काढून त्यांच्या जबाब मधे त्यांनी मला कशा पद्धतीने रेती माफियामध्ये उल्लेख केला होता आणि कशा पद्धतीने माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले व कशा पद्धतीने मला मानसिक तणावातून जावं लागलं अशा बऱ्याचशा गोष्टी माझ्यासोबत घडल्या मित्रांनो तरी देखील आपण माघार घ्यायची नाही प्रयत्न आपल्या सतत चालू असणार कारण आपली दफनभूमी हक्काची नाही कुणाच्या बापाची 1968 पासून जातीवाचक इमांपूर गावात पद्धतीचा स्वभाव दिसून येत आहे कारण त्यावेळेस आदिवासी भील समाजाला शिक्षण नव्हतं आणि शिक्षण नसल्याकारणाने आपला समाज भित्र्या स्वरूपाची वागणूक होती परंतु आता सध्याच्या काळामध्ये खूप काही मुलं शिकलेले आहेत आणि घेका .दे .करणाऱ्या स्वभावाचे आहेत त्यामुळे बऱ्यापैकी फरक या दूषित विचारसरणीच्या लोकांना पडलेला आहे आणि यांना चोप देखील बस लेला आहे कायद्याच्या दृष्टिकोनातून त्यानंतर जे उर्वरित मंडळी होती विहिरींची रजिस्ट्री करून घेणारे विहिरीसाठी जागा विकत घेणारे हे देखील हळूहळू न्यायालयात हजर होऊ लागले व त्यांचे लेखी स्वरूपाचे स्टेटमेंट देऊ लागले त्यांच्या स्टेटमेंट मध्ये त्यांनी विशेष असं काही दिलं नव्हतं त्यांचं म्हणणं फक्त एकच पडलं की आम्हाला माहीत नव्हतं की सदरील गटामध्ये आदिवासी समाजाची दफनभूमी आहे म्हणून आम्ही फक्त विहिरीसाठी जागा घेतलेली आहे आणि ती जागा आम्ही साहेबराव यादव प्रधान यांच्याकडून घेतलेली आहे तसेच त्यांनी रजिस्ट्रेशन नकला देखील न्यायालयाकडे सादर केल्या आता आपल्यापुढे फक्त प्रश्न एकच आहे मित्रांनो की आपण एवढी सगळी खटाटोप करून न्यायालय पर्यंत धाव घेतली तर आपलं फक्त म्हणणं एवढंच आहे की गट नंबर 44 च्या लगत असलेले आपली आदिवासी समाजाची दफन भूमी तिचे अतिक्रमण हटवण्यात यावे न्यायालयाने साहेबराव यादव प्रधान यांच्या मालकीची असलेली जमीन 39 गुंठे याची तात्काळ मोजण्याचे आदेश व्हावे यासाठी आपण वारंवार प्रयत्न करत आहोत अशा बऱ्याचश्या मोठमोठाल्या प्रसंगातून अजून आपल्याला निघायचं आहे माझ्या गावापासून पैठण सुमारे 35 ते 40 किलोमीटर अंतरावर आहे दर महिन्याला तारीख येणार हेरिंगला हजर होणे कारण आपला संघर्ष तर चालूच राहणार आणि आपण दफनभूमीसाठी खूप तर प्रयत्न करतच आहोत अजूनही देखील प्रयत्न करणार आहोत न्यायालयामध्ये आल्यानंतर समोरील प्रतिवादी व्यक्ती हजर झाल्याच्या नंतर खुन्नस देणे खुन्नस देऊन बघणे दबावात घेणे मानसिकता तणावात घेणे राजकारणी लोकांच्या माध्यमातून माझ्यावर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करणे असे बरेच प्रकार त्यांनी चालू केले परंतु आपण माघार घेतली नाही आपले प्रयत्न आपण सदैव तत्पर पद्धतीने चालू ठेवले बाकी जो काही निर्णय देन तो न्यायालयाचे कामं आहेत आपण आपले प्रयत्न वारंवार चालू ठेवणार त्यानंतर उर्वरित लोकांच्या स्टेटमेंट मध्ये कशा पद्धतीने यांच्या यांच्या स्टेटमेंट खालीवर झाले आणि यांच्या यांच्यात गोंधळ निर्माण झाला यावर देखील आपण सविस्तर चर्चा करणार आहोत कारण विहिरीसाठी रजिस्ट्रीला जागा विकत घेणारी लोक जी होती ती ईतर गावातली होती आता यांच्यात गोंधळ असा झाला की दुसऱ्या गावातील व्यक्तींचे म्हणणे पडले व तुम्ही प्रॉपर गावातील माणसं असून तुम्हाला माहीत नव्हतं का की ती आदिवासी समाजाची दफन भूमी आहे म्हणून मग तुम्ही कसं काय त्यांच्या दफन भूमीमध्ये विहिरी खोदल्या आणि आम्हाला  देखील जागा घ्यायला लावली आणि विहिरी खांदायला लावल्या असे बरेचसे प्रसंग तिथे घडू लागले कारण इमामपूर मधील दूषित विचारांच्या लोकांना कळू लागलं की आता आपलं इथं पितळ उघड पडत चाललेलं आहे म्हणून वाट फक्त आपण एकच बघायची ज्यावेळेस न्यायालयाच्या निदर्शनास ही गोष्ट येईल त्यावेळेस या लोकांवर सरळ अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 च्या कायद्यानुसार आपण यांच्यावर गुन्हा दाखल करायची मागणी करणार यांना देखील कळायला पाहिजे की आदिवासी समाजाला त्रास दिल्यानंतर कायघडतं म्हणून त्यासाठी मी माझे जे काही प्रयत्न असेल माझ्या सहकारांची जी काही मदत लागेल ती घेईलच आणि प्रयत्न देखील चालू ठेवू वेळ पडली सेवा विधी प्राधिकरणामध्ये देखील हे प्रकरण दाखल करू पण त्यामध्ये स्टेप आहे आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचं आहे  आणि  आपण सत्र न्यायालयात देखील जाऊ चला तर मित्रांनो तुमचे वारंवार असेच या लेखाच्या माध्यमातून मिळत असलेले प्रेम भावना माझ्यापर्यंत पोहोचत आहेत असेच आपले प्रेम सदैव माझ्यावर राहू द्या अशी मी प्रत्येकाकडून अपेक्षा करतो जय आदिवासी जय भीम जय महाराष्ट्र जय हिंद भेटूया नंतर पुढील भाग 8. मध्ये लवकरच.......

रविवार, २४ सप्टेंबर, २०२३

आदिवासी दफनभूमी / स्मशानभूमी चोरीला गेली भाग 6.......

🙏नमस्कार मित्रांनो काल दिनांक 23/9/2023 रोजी आपण आदिवासी दफन भूमी चोरीला गेले भाग पाच बघितला आज दिनांक 24/9/2023 रोजी आदिवासी दफन  भूमी चोरीला गेली भाग 6....बघणार आहोत कालच्या भागात आपण बघितले की कशा 🖊🖋🙏पद्धतीने आपण यांना नोटीस काढल्या त्यापूर्वी सांगू इच्छितो की दिनांक 6 मार्च 2021 रोजी मी आणि माझे चुलत बंधू भाऊसाहेब बर्डे पैठण येथे एडवोकेट संदीप शेषराव शिंदे साहेबांना भेटण्यासाठी गेलो आणि त्यांना दफण भूमी संदर्भात पूर्ण कागदपत्रे सुपूर्त केली त्यानंतर त्यांनी 15 ते 20 दिवसाच्या कालावधीमध्ये अतिक्रमण धारक साहेबराव यादव प्रधान यांना व त्यांच्या कुटुंबातील पत्नी व मुलाला आणि साहेबराव प्रधान यांनी ज्यांना विहिरीसाठी जागा रजिस्ट्री करून दिली होती या सर्वांना नोटीस काढले यांच्या हातात नोटीस पडल्यानंतर या लोकांच्या बुडाखाली सुतळी बॉम्ब लावल्यासारखा भास यांना होऊ लागला मग काय न्यायालयाची कार्यप्रणाली सुरू झाली नोटीस पोहोच करणे पुढील तारीख येणे त्यामध्ये काहींना नोटीस हातात पडल्यानंतर पुढच्या हेरिंगला ते हजर व्हायचे व त्यांचा लेखी स्वरूपाचा जबाब मांडायचे तसेच रजिस्ट्रीमध्ये काहींचे आडनाव चुकीचे केलेले होते त्यामुळे काहींनी नोटीस स्वीकारल्या नाहीत परंतु त्यांचे आडनाव चुकले होते ते करेक्शन करण्यासाठी एक दीड महिना कालावधी गेला असं करत करत स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप न्यायालयाची कार्यप्रणाली चालू आहे यामध्ये काही राजकारणी स्वतःच्या राजकारणाचा पावर दाखवण्यासाठी देखील मैदानात उतरलेले होते मग मला मानसिक तणावात देण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला परंतु शेवटी न्याय तो न्यायचा असतो सत्यमेव जयते कारण न्यायालयाच्या पायरीवर गेल्यानंतर भले  उशीर होऊ शकतो उशिरा न्याय मिळू शकतो पण न्याय हा तुम्हाला निश्चितच मिळणार फक्त विश्वास ठेवा तसेच आपल्या आणि वकिलांचे नाते हे पारदर्शक स्वरूपाचे असले पाहिजे हे देखील खूप महत्त्वाचे आहे त्यासाठी आपण कुठल्याही चुका करता कामा नये मग काय काहीजण हजर झाले तारखेत पण मित्रांनो तारखेला हजर झाल्यानंतरही यांची दूषित मानसिकता दिसून येण्यास तयार झाली कारण खुद माझा माझ्या  डोळ्यावरती विश्वास बसत नव्हता की देवाच्या नावानं रात्रंदिवस भजणारी हे लोक इतकं खोटं कसं बोलू शकतात कसं शक्य आहे एवढं आणि कसं जमतंय या लोकांना मी त्यांच्या जबाबाची  छायांकित प्रत न्यायालयातून काढली त्यावेळेस डोकं अक्षरशा चक्रावून गेल्यासारखे विषय निदर्शनास आले कारण यांनी तर मला पक्क रेती माफियाच बनवलं त्यांचं म्हणणं असं आहे की मी सदरील जागेवरती दावा यासाठी टाकला की मी खूप मोठा रेती माफीया  आहे परंतु तुम्हाला सांगू इच्छितो रेती माफीया याचा आणि माझा कसलाही एक संबंध नाही कारण ते माझं क्षेत्र नाही आणि हो मी जर रे ती माफीया असतो तर माझ्या नावावर खूप मोठ मोठ्या गाड्या असतात या विषयावरूनच लक्षात यायला पाहिजे होते यांच्या कारण मी इमामपूर वाडी गावापासून वाकी साधारणता एक किलोमीटर अंतरापर्यंत माझं घर आहे तिथून कालपर्यंत जी लोक आदिवासी भिल समाजाचा व्यक्ती मयत झाल्यावर अंत्यविधी करण्यासाठी आमच्या पूर्वी पार दफन भूमीमध्ये उभा राहत होते आज तेच म्हणू लागले की यांची दफन भूमी  ही नाही म्हणून .....वारे दुनिया अजबच प्रसंग आहे ना कारण यावरूनच दिसून येते की हे लोक सत्याचा किती स्वीकार करतात यांच्या ओठात एक आणि पोटात एक आणि नीतिमत्ता मात्र गढूळ पाण्याची जागा विकायचा शॉक तर आहे साहेबराव प्रधान यांना परंतु विहिरी मात्र दफनभुमित . किती मूर्ख पद्धतीचा कारभार आहे हा आपण म्हणतो की ताजमहल आग्र्याला आहे तो वस्तुस्थिती आहे तिथेच परंतु इथे परिस्थिती अशी झाली की प्लॉट घ्यायचा औरंगाबादला आणि घर मात्र बांधायचं पैठणला यांना तर  पुरस्कार द्यायला हवा वर तोंड करून पुन्हा माझ्यावर आरोप करू लागले सांगायचे तात्पर्य एवढेच की न्यायालयापर्यंत गेल्यानंतर या लोकांची वस्तुस्थिती आणि विचारधारा माझ्या लक्षात येऊ लागले आणि कालपर्यंत त्यांच्यापैकीच एक दोघेजण जे तलाठी मंडळ अधिकारी आणि ग्रामसेवक यांना सांगत होती की नाही आदिवासी दफनभूमीवर अतिक्रमण साहेबराव प्रधान यांनी केलेला आहे ज्यावेळेस त्यांचे देखील नाव रजिस्ट्रीमध्ये आले त्यामुळे त्यांच्यावर देखील खटला हा भरावा लागला आज ते देखील न्यायालयासमोर म्हणू लागले की यांची दफन भूमी इकडे नाहीये म्हणून प्रश्न कीती सरळ आहे ना हा कारण सरळ सोपा विषय होता पंचकमिटीने ज्यावेळेस असं ठरवले होते की निम्म्यानिमी फी भरून मोजणी करायची मग या भाऊंना भीती कसली वाटत होती मोजणी करायला का माघार घेतली पुन्हा न्यायालयापर्यंत आले नोटीस पाठवल्यानंतर नोटीस पाठवली हजर झाले त्यानंतर साहेबराव प्रधान यांचा दुःखत निधन झाले  कारण ते बिमार होते परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो कारण त्यांनी आल्या जीवनात खूप काही पुण्याचे काम केले चला तर मित्रांनो यानंतर उर्वरित पुढील भाग 7 हा आपण उद्या बघू यात धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी जय भिम.       जास्तीत जास्त शेअर करा भावांनो 

शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३

आदिवासी दफनभूमी/स्मशानभूमी चोरीला गेली भाग 5.....

नमस्कार मित्रांनो काल दिनांक 22 /9/2023 रोजी आदिवासी दफनभूमी चोरीला गेली भाग चार बघितला होता आज दिनांक 23/9/2023 रोजी भाग पाच बघणार आहोत भाग चार मध्ये झालेला पंचनामा पंचकमिटीने काढलेला तोडगा त्या संदर्भात ठरलेले नियोजन त्यामध्ये कशा पद्धतीने पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये भूमी अभिलेख कार्यालयाला मोजणीची निर्मिती प्रतिवादी आणि वादी दोन्ही समूहाने भरायचे हे ठरले होते त्यानंतर आम्ही पंधरा दिवसाची वाट बघितल्यानंतर ग्रामपंचायतला5/3/2020 तारखेला लेखी स्वरूपाचे पत्र देण्यात आले की आम्ही की आम्ही पंधरा दिवसांनी भूमी अभिलेख कार्यालय पैठण येथे निम्मी मोजणी फी भरण्यास तयार आहे तुम्ही साहेबराव प्रधान यांना लेखी स्वरूपाचे पत्र काढावे तसेच ग्रामपंचायत ने आम्ही दिलेले पत्र बाहेर नोटीस बोर्ड लावले देखील आणि साहेबराव प्रधान यांना वारंवार सूचित करून देखील सांगण्यात आले की तुम्ही तुमच्या वाट्याची मोजणी फी भरण्यास तयार राहा आदिवासी भील समाज त्यांच्या वाटेची फी भरणार असून तुम्ही पंधरा दिवसांनी मोजणी फी भरायची आहे मग यानंतर पुढे काय झालं ती म्हण आहे ना बाप दाखव तर श्राद्ध कर साहेबराव प्रधान पंचनामा करतानी भले मोठमोठे हाकून मोकळे झाले मी पंचनामेस तयार आहे मी मोजणी भरण्यास तयार आहे मी मोजणी करण्यास तयार आहे नंतर भाऊंची बत्ती गुल झाली उत्तर ग्रामपंचायतला देऊ लागले म्हणून लागले की माझी जमीन नाहीये माझा तिथं काही एक संबंध नाही मग ताबा करण्यासाठी कसला संबंध आला मग अतिक्रमण करण्यासाठी यांना कोणी नारळ दिले का ते दफन भूमीत  निघू लागलेले पीक पाणी या पैशाच्या धुंदी त त्यांना त्या दफन भूमीच अतिक्रमण सोडू वाटत नव्हतं मंग झालं तसंच भाऊ पळकुट्यावानी पळू लागले मोजणी फी भरण्याचे नावाने त्यांच्या अंगाला काटे येऊ लागले बिचारी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक साहेब त्यांना वारंवार सूचित करू लागले सांगू लागले ग्रामसेवकांना म्हणायला लागले की मला घेणेदेणे नाही त्यांना सांगा की तुम्हीच मोजणी करा आता प्रश्न असा उभा राहिला की आमची दफनभूमीचीभिल् समाजाची आहे ती आहे एक गाळपेरा त्याला गट नंबर नाही आणि गट नंबर 44 मध्ये साहेबराव यादव प्रधान यांची जमीन होती 39 गुंठे त्यापैकी त्यांनी विहिरी वाल्यांना विकलेली आहे सात गुंठे त्यांनी रजिस्ट्री केली त्यांच्या 39 गुंठे मधून आणि विहिरी मात्र खांद कामं आदिवासी समाजाच्या  दफन भूमीमध्ये नंतर त्यांना भीती वाटू लागली मोजणी जर आपण केली तर आपलं पितळ उघड पडेल म्हणून त्यांनी स्वप्नात देखील विचार केला नव्हता कीआदिवासी दफन भूमीचा मुद्दा इतका कोणीतरी तापवेल पंधरा दिवसांनी वारंवार त्यांना सांगण्यात आलं एक महिना झाला दोन महिने झाले वारंवार सूचित करण्यात आले तरी देखील भाऊंच्या डोक्यात कुठल्याही प्रकारचा प्रकाश पडत नव्हता मग झालं काय ज्या ज्या लोकांना त्यांनी विहिरीसाठी रजिस्ट्री करून दिली होती जागा त्यांच्या त्यांच्या तापवा तापीचा वातावरण तयार झालं मी वैयक्तिक स्वरूपात पैठण भूमी अभिलेख कार्यालयाला जाऊन पूर्ण संदर्भ अधिकाऱ्यांना सांगून त्या संदर्भात मोजणीचा अर्ज देखील भरला परंतु मोजणीचा नियम असा आहे की एक तर मालकच त्या जमिनीची मोजणी करू शकतो आणि गट नंबर 44 मधला आपला कुठल्याही एक इंचभर जागा देखील नको आपल्याला हवाय फक्त आपला गाळपेरा दफनभूमी शेवटी ग्रामसेवक देखील थकून गेले त्या बाबाच्या मागे पळून पळून त्यांना सूचित करू करू मग मी पुन्हा तहसीलदार साहेब यांना जाऊन भेटलो त्यांच्याशी चर्चा केली त्यांना सांगितलं सविस्तर असा असा विषय झालेला आहे म्हणून मग यावरती पर्याय देखील काय काढणार आता बऱ्याचशा लोकांना वाटत असेल की यांनी कलेक्टरपर्यंत जायला पाहिजे होतं आयुक्तांपर्यंत जायला पाहिजे होतं मित्रांनो सांगायचं एवढं की मी सर्वांपर्यंत पळालो पण कसं असतं ना अशा दूषित विचार वृत्तीचे लोक एखाद्या मंत्र्याच्या संत्र्याच्या बगलात उभा राहिले की जणू त्यांना असं वाटू लागतं की मंत्र्यांनी आपल्याला दत्तकच घेतलेले आहे मग काय वरच्या लेव्हलचे अधिकाऱ्यांवरती प्रेशर येऊ लागला त्यांना सांगण्यात आलं की त्या प्रकरणापासून दूर राहा मी आणि माझे सहकारी मित्र वारंवार चक्रा मारून परेशान झालो मग शेवटी मात्र पर्याय एकच उरला तो म्हणजे न्यायालय न्यायालयात जाण्यापूर्वी भाऊ मोजणीसाठी तयार नव्हते आता इथून पुढची जी गोष्ट घडली ती खूपच मनोरंजक आणि हास्यास्पद आहे विशेष म्हणजे रात्रंदिवस देवाला भज णारी ही लोक रात्रंदिवस टाळ पखात कीर्तन अभंग गाणारे लोक यात दफन भूमी प्रकरणांमध्ये रजिस्ट्रीत त्यांचे नाव येऊ लागले मंग काय मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव अशी परिस्थिती तयार झाली मग न्यायालयात जाण्यासाठी एक वकील  आवश्यक आहे त्यासाठी आर्थिक बाजू मजबूत असणे गरजेचे आहे त्यातच आदिवासी भील समाज दिन दुबळा यावर कसा पर्याय शोधेल परंतु मित्रांनो इथपर्यंत थांबायचं नाही अस आम्ही ठरवलं होतं खूप जीवाची काटकसर करून पळ पळ करून खवदाव करून शेवटी हे प्रकरण पैठण माननीय न्यायालय यांच्या दालनात नेण्यात आलं मग काय चक्रीवादळ फिरल्यासारखी गंमत झाली विहिरी वाले त्यामध्ये आले दहा अकरा जण आणि स्वतः प्रतिवादी मध्ये साहेबराव प्रधान त्यांचा मुलगा त्यांची पत्नी कारण साहेबराव प्रधान यांची जमीन त्यांच्या पत्नीच्या नावावर होती आता प्रत्येक गावामध्ये झाकाडाला करणारे डोमकावळे बऱ्याच पद्धतीने असतात त्यामुळे जो तो ज्याच्या त्याच्या परीने प्रयत्न करू लागला आम्ही ठरवलं असं की आम्ही काही प्रकरणांमध्ये माघार घेणार नाही समाजासाठी जीव गेला तर चालेल परंतु अशा परिस्थितीत माघार घेणे योग्य नाही मग आम्ही एक वकील लावला आणि यांचे तीन-तीन वकील मी ज्यावेळेस न्यायालयात प्रकरण दाखल केले त्यावेळेस प्रत्येकाला नोटीस इशू झाल्या नोटीस निघाल्यानंतर यांची गंमत अशी झाली की जणू काही यांच्या बुडाखाली कोणीतरी सुतळी बॉम्ब ठेवला की काय चला तर मित्रांनो या पुढील सविस्तर गम्मत आपण आदिवासी द फन भूमी भाग सहा मध्ये बघूया..... जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम.......

शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३

आदिवासी दफनभूमी /मशानभु चोरीला गेली भाग 4..

नमस्कार मित्रांनो आज दिनांक 22/9/2023 रोजी आदिवासी दफनभूमी   चोरीला गेली भाग 4.. आज आपण बघणार आहोत भाग 3 मध्ये आपण बघितले होते की तलाठी जाधव मॅडम मंडळ अधिकारी ठेंगे साहेब तसेच ग्रामपंचायतचे ग्रामसेवक  मेश्राम साहेब हे सर्वजण आणि आदिवासी भील समाज गट नंबर 44 च्या पश्चिमेला आणि खांब नदीच्या पूर्वेला आदिवासी समाजाची 25 गुंठे एवढी दफनभूमी आहे वस्तुस्थिती ज्यावेळेस पूर्ण समूह पंचनामा करण्यासाठी स्पॉटवर गेला त्यावेळेस प्रतिवादी साहेबराव यादव प्रधान यांनी बेकायदेशीर रित्या आदिवासी भिल समाजाच्या दफनभूमीवर अतिक्रमण केल्याचे आढळून आले अत्यंत दुर्दैव अशी परिस्थिती या भारत देशामध्ये आपणास बघण्यास मिळते खरंच किती कायदा आणि सुव्यवस्था मजबूत असून देखील पाखंडी विचाराचे लोक जे स्वतःला खूप महान समजतात पण त्याची नीतिमत्ता ही अतिशय दूषित आणि घाणेरड्या स्वरूपाचे आहे कारण 1968 पूर्वीपासून जर आदिवासी समाज तिथं त्यांच्या मेलेल्या भील समाजाच्या व्यक्तीचे अंत्यविधी करत आहे पूर्ण गाव एखादा भील व्यक्ती मयत झाल्यानंतर गावकरी मयती साठी जमा होतात त्याच ठिकाणी आदिवासी समाजातील व्यक्तीने अंत्यविधी झालेल्या जागेवर दगडाच्या खानाखुणा दगड तांदळे उभा करण्याची संस्कृती ही आदिवासी समाजाची आहे त्या स्पॉटवर कायद्याला न जुमानता भाडखाउ वृत्ती ठेवून बिनधास्तपणे आदिवासी समाजाच्या अंत्यविधी झालेल्या व्यक्तीचे दगड तांदळे उचलून फेकून बिनधास्तपणे आदिवासींच्या छातीवर नांगर घालण्यासाठी देखील या लोकांना लाज वाटत नाही असे तिथे दिसून आले त्या ठिकाणी त्यांनी उसाची लागवड केली होती परिस्थिती बघता मंडळ अधिकारी आणि तलाठी जाधव मॅडम यांनी सातबाराचे अवलोकन केले असता साहेबराव यादव प्रधान यांचे म्हणणे होते की माझ्या ताब्यातील जमीन ही कमी भरत आहे मग मंडळाधिकारी यांनी त्यांना विचारले असता की आदिवासी समाज हा अंत्यविधी कुठे करतो त्यांनी विचारलं की यांचा अंत्यविधी हा इथच होतो आणि मी कधी यांना अडचणही तयार केली नाही किंवा अडथळाही आणला नाही मग म्हणायचं तात्पर्य असं की प्रतिवादी दानवीर कर्ण आहेत का जे की स्वतःच्या वावरात आदिवासी भील समाजाला अंतविधी करू देतात यासारखे बरेच प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले आणि  मग पूर्ण स्पॉट बघता पंचनामा करण्यात आला पंचनाम्यात पंच कमिटी आणि ग्रामपंचायतचे ग्रामसेवक तलाठी मंडळ अधिकारी आणि गावातील काही प्रतिष्ठित व्यक्ती यांनी चर्चा करून यावर तोडगा काढण्याचे ठरवले मध्यस्थी करून यावर एक मार्ग काढण्यात आला कारण त्यांना वातावरण शांत करण्याचे खूप गरजेचे वाटू लागले त्यामुळे पंच कमिटीने असं ठरवले की सामूहिक पद्धतीने प्रतिवादी साहेबराव प्रधान आणि आदिवासी भिल समाज यांनी गट नंबर 44 पैकी साहेबराव प्रधान यांच्या जमिनीची मोजणी करून घ्यायची यासाठी आदिवासी बिल समाजातील काही मान्यवर व यस्क व्यक्ती यांनी देखील होकार दर्शवला कारण यांच्या विरोधात जाऊन मला कुठलाही इशू तयार करायचा नव्हता त्यानंतर पंच कमिटीने असे ठरवले की पंधरा दिवसांनी भूमी अभिलेख कार्यालय पैठण या ठिकाणी निम्मी निम्मी मोजणीची फी दोन्ही गटाने भरायचे यासाठी साहेबराव प्रधान यांनी देखील तयारी दर्शवली आणि आदिवासी समाजातील वयस्कर प्रतिष्ठित व्यक्तींनी देखील त्यानंतर पंचनामा करून आमचे सहकारी पत्रकार बंधू सतीस श्री सुंदर सर यांनी एमसीएन न्यूज लाच नव्हे तर बऱ्याचशा ठिकाणी या प्रकरणाची बातमी लावण्यात आली पेपरला बातमी देण्यात आली यापुढील पाठपुराव्याला गती देण्यासाठी आम्ही येणाऱ्या पंधरा दिवसाची वाट बघू लागलो आणि शासनाला विनंती करू लागलो की आमची दफनभूमी आमच्या ताब्यात द्या कारण तिथे आमचे आजोबा पणजोबा यांचे अंत्यविधी झालेले आहे कारण तीथ आमचे अस्तित्व आहे त्यानंतर पूर्ण आदिवासी भिल समाज आणि ग्रामपंचायत कर्मचारी तलाठी मंडळ अधिकारी माझे पत्रकार सहकारी बंधू सतीश श्री सुंदर सर आपापल्या कामासाठी परतले सर्व आतुरतेने पंधरा दिवसाची वाट बघत होते की पंधरा दिवसांनी साहेबराव प्रधान आणि आम्ही मोजणीची निम्मी फी भूमी अभिलेख कार्यालयात जमा करू चला तर मग आदिवासी दफन भूमी चोरीला गेली भाग चार हा इथपर्यंत समाप्त करतो . नमस्कार गुड मॉर्निंग जय आदिवासी जय हिंद जय महाराष्ट्र....... या लेखाला जास्तीत जास्त शेअर करा भावांनो की ज्या अधिकाऱ्याचे टेबलवर या प्रकरणाचा न्याय निर्णय आहे त्या अधिकाऱ्याला देखील हा आर्टिकल वाचून स्वतःची शासकीय ड्युटी प्रामाणिकपणाने करण्याची हिम्मत तयार झाली पाहिजे........

गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३

आदिवासी दफनभूमी स्मशानभूमी चोरीला गेली भाग 3.

नमस्कार मित्रांनो आज 21/9/2023 रोजी आदिवासी दफन भूमी चोरीला गेली भाग 3 बघणार आहोत भाग दोन मध्ये आपण बघितले होते की माननीय तहसीलदार साहेब पैठण चंद्रकांत शेळके साहेब यांनी दिनांक 22/ 9/ 2020 रोजी पत्र काढले होते त्यानंतर उर्वरित पुढच्या भागात म्हणजे भाग तीन मध्ये पंचनामा कधी झाला हे आज आपण सविस्तर बघणार आहोत दिनांक 4/ 11/ 2020  रोजी मंडळ अधिकारी ठेंगे साहेब बिडकीन श्रीमती तलाठी जाधव मॅडम मारोळा यांचा सकाळी मला फोन आला की आम्ही इमामपूर येथील आदिवासी भील समाजाच्या दफनभूमीच्या पंचनामे संदर्भात येणार आहोत त्यानंतर मी व माझे सहकारी मित्र या विषय संदर्भात संपूर्ण आदिवासी भील समाज यांच्याशी चर्चा केली व त्यांना सांगितले की आज आपल्या दफनभूमीचा पंचनामा करण्यासाठी मंडळ अधिकारी व तलाठी हे येणार आहेत तसेच यासाठी आम्ही एमसीएन न्यूज चे आमचे पत्रकार बंधू सतीश श्री सुंदर सर यांना तात्काळ फोन लावून त्यांच्याशी चर्चा केली व त्यांना सांगितले की आज आपल्या इमामपूर येथील दफन भूमी संदर्भात पंचनामा आहे तुम्ही तात्काळ बातमी बनवण्यासाठी सहकार्य करा अवघ्या एक तासांमध्ये आमचे पत्रकार सहकारी मित्र सतीश श्री सुंदर सर आमच्या सेवेत हजर झाले त्यानंतर आम्ही त्या विषयावर बारकाईने चर्चा करून या विषय संदर्भात कशा पद्धतीने कार्यप्रणाली करायची यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर सर्व आदिवासी समाजाच्या माता बंधू भगिनी एकत्र जमा झाल्या तरी साधारणतः सकाळी साडेदहा ते साडेअकरा वाजेच्या दरम्यान श्रीमती जाधव मॅडम आणि मंडळ अधिकारी साहेब यांचे इमामपूर मध्ये आगमन झाले आल्यानंतर त्यांनी मला फोन केला तसेच त्यांनी समोरच्या जो प्रतिवादी व्यक्ती होता ज्या व्यक्तीच्या ताब्यात आपली दफन भूमी आहे त्या व्यक्तीला देखील स्पॉटवर बोलवले त्यावेळेस गावातील काही मंडळी   हे गावाच्या बाहेर निघून गेले या गोष्टीवरून एक मात्र लक्षात आलं की आदिवासी समाजा जवळ असलेल्या गायरान जमिनी दफन भूमी त्यांच्या ताब्यात असलेल्या सहान जागा या फक्त बिगर आदिवासींना त्यांच्या फायद्यासाठी वापर करण्यासाठी लागतात याचं कारण एकीकडे आदिवासी समाज जागा नाहीये शिक्षण नाही जोपर्यंत सुशिक्षित होत नाही तोपर्यंत असे लोक आपला फायदाच घेत राहणार असो तो पुढचा विषय आहे त्यावर आपण नंतर सविस्तर बोलूया समोरील प्रतिवादी व्यक्ती गट नंबर 44 च्या लगत असलेल्या आपल्या दफनभूमीच्या स्पॉटवर हजर झाले तिथे पूर्ण आदिवासी समाजाला घेऊन मी एकत्र जमा झालो त्यानंतर आमचे पत्रकार बंधू सतीश श्री सुंदर सर आले त्यानंतर आमचे ग्रामपंचायतचे माननीय ग्रामसेवक साहेब मेश्राम सर देखील तिथे हजर झाले आणि दोन-चार प्रतिष्ठित व्यक्ती देखील हजर होता झाल्या होत्या चला तर मग आपण यापुढील सुरुवात करूया भाग 4 मध्ये धन्यवाद......

मंगळवार, १९ सप्टेंबर, २०२३

आदिवासी दफनभूमी/स्मशानभूमी चोरीला गेली भाग 2

नमस्कार मित्रांनो दिनांक 16/ 9/ 2023 रोजी मी दफन भूमी चोरीला गेली यासंदर्भात भाग एक जाहीर केला होता आणि आज दिनांक 19/9/2023 रोजी आदिवासी द फोन भूमी मशानभूमीला गेली भाग 2 मी जाहीर करतोय मागच्या भागांमध्ये आपण बघितले की माझ्या आजोबाच्या काळापासून ते वडिलांच्या कालावधीपर्यंत त्यांनी कशा पद्धतीने आदिवासी दफनभूमीसाठी लढा उभारला होता त्यानंतर परिस्थिती अभावी त्यांच्याकडून थांबलेला लढा नंतर मी व माझे सहकारी मित्र भाऊसाहेब गोपीचंद दळवे नागेश दळवे साईनाथ मोरे अशोक दळवे सोमनाथ दळवे या सर्वांनी मिळून असा एक विचार केला की आपले आजोबा वडील आपल्या दफनभूमीच्या अस्तित्वासाठी लढाई लढत आहे मग आपण का नाही लढू शकत त्यानंतर माझे माझ्या सहकारी मित्रांचे बऱ्यापैकी शिक्षण झालेले आहे त्यामुळे महसूल खात्यातील कार्यप्रणाली मला आणि माझ्या मित्रांना माहीत होती मग त्यानंतर दिनांक 24 /2/ 2019 रोजी मी तहसीलदार साहेब कार्यालय पैठण यांना सर्व आदिवासी भील समाज राहणार इमांम पूर वाडी तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद सर्व आदिवासी बिल समाज बांधव यांच्या वतीने आम्ही लेखी स्वरुपात तक्रार अर्ज दाखल केला त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी साहेब औरंगाबाद यांना देखील लेखी स्वरुपात तक्रार अर्ज दाखल केला त्यानंतर माननीय उपविभागीय अधिकारी साहेब पैठण फुलंब्री यांना देखील अर्ज दाखल केला हा अर्ज दाखल केल्यानंतर पुढील पाठपुराव्याला मी व माझे सहकारी मित्र आणि मिळून सर्व पाठपुरावा केला अखेर दिनांक 22सप्टेंबर 2020 रोजी तो दिवस उगवला माननीय तहसीलदार चंद्रकांत शेळके साहेब यांनी मंडळ अधिकारी विभाग बिडकीन आणि तलाठी सज्जा मारोळा तालुका पैठण यांना लेखी स्वरूपाचे एक पत्र काढले त्या पत्रामध्ये इमामपूर वाडी येथील आदिवासी भिल समाजाच्या दफनभूमी ची चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितले चला तर मित्रांनो आजच्या दफनभूमी भाग दोन मध्ये एवढेच यानंतर या पुढील उर्वरित भागांमध्ये पुन्हा भेटूया.......

शनिवार, १६ सप्टेंबर, २०२३

दफन भूमी /स्मशान भूमी चोरीला गेली

नमस्कार मित्रांनो आज आपण आदिवासी समाजाच्या एका खूप मोठ्या समस्या विषयी चर्चा करणार आहोत ही काही मनानं बनवलेली स्टोरी किंवा काल्पनिक गोष्ट किंवा घटना नाही १९६८ च्या आधीपासून आदिवासी समाजाचे अशीच एक समस्या निर्माण झालेली आहे ती म्हणजे इमामपूर या गावात असलेला भील समाज त्यांच्यासोबत घडलेली एक घटना इमामपूर गावामध्ये आज भी आदिवासी भील बांधवांच्या दफनभूमीवर काही धन दांडगे डोळा टपून बसलेले आहेत आदिवासी समाजाच्या अज्ञान पणाचा साधे भोळेपणाचा फायदा गावातील काही लोकांनी घेतलेला असून आज देखील या समाजाला गावात जर कुणाची मयत झाली तर अंत्यविधीसाठी असलेली पूर्वी पार द फन भूमीवर काही लोकांनी बेकायदेशीर होते अतिक्रमण केले आहे एकदा फोन भूमीचा इतिहास खूप जुना असून सुमारे 1968 या काळापासून माझे आजोबा बंडू बर्डे आणि त्यांचे काही सहकारी मित्र कायद्याच्या चौकटीपर्यंत हे भांडण घेऊन गेले परंतु विषय असा झाला की यांना शिक्षणाचा अनुभव आणि महसूल खात्यातील कार्यप्रणाली माहीत नसून यांचा हा लढा अर्धवट राहिला त्यानंतर 2011- 12 च्या दरम्यान माझे वडील सखाराम बंडू बर्डे यांनी आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी हरिचंद्र शंकर दळवी दत्तात्रय शंकर दळवी आशा चार-पाच जणांनी मिळून पुन्हा हा अर्धवट राहिलेला लढा उचलून धरणाचा प्रयत्न केला पुन्हा या आदिवासी समाजाच्या दफन भूमी प्रकरण न्यायालयात सादर करण्यात आला परंतु यांचा देखील तोच प्रश्न होता शिक्षणाचा अभाव महसूल खात्याची कार्यप्रणाली माहीत नसणे तसेच परिस्थिती बिकट साधे भोळेपणा पैशाची कमी आर्थिक अडचण असे बरेच अडचणींना सामना करत या चार-पाच जणांनी इमामपूर वाडी येथील आदिवासी भिल समाजाच्या दफनभूमीसाठी लढवण्याचा ठरवलं समोरच्या ज्या व्यक्तीवर खटला भरला होता तो व्यक्ती देखील स्वतःला खूप काही कायदे पंडित समजायचा त्यामध्ये तलाठ्यासोबत त्याचं उठणं बसणं तहसील मध्ये जाने अधिकारी यांच्यासोबत सदरील व्यक्तीचे नातेसंबंध चांगल्या पद्धतीचे होते त्यामुळे माझे वडील आणि त्यांचे सहकारी मित्रांना हे दफनभूमीच्या लढ्यासाठी खूप संघर्ष सोसावा लागला आणि एक दिवस अखेर त्यांनी देखील आर्थिक अडचणीमुळे माघार घेऊन टाकली कारण यामध्ये काही राजकारणी लोक आणि काही स्वतःला कायदे पंडित समजणारे देखील होते विशेष म्हणजे हा सर्व खटाटोप कशासाठी चालू आहे तो केवळ या आदिवासी भिल समाजाच्या दफन भूमीमध्ये बिगर आदिवासी समाजाच्या व्यक्तींनी बेकायदेशीर रित्या पाण्याच्या विहिरी खांदून ठेवल्यात परंतु हसण्यासारखी गोष्ट त्यांनी अशी करून ठेवली की समोरच्या एका व्यक्तीकडे 39 गुंठे एवढे जमीन आहे त्यापैकी सात गुंठे जमीन या व्यक्तीने विहिरीसाठी विक्री केली मग त्याच्यापाशी असलेली 39 गुंठे पैकी सात गुंठे कमी व्हायला पाहिजे आणि त्याच्याजवळ फक्त 32 गुंठे एवढी जमीन उरायला पाहिजे होती परंतु ज्यांना विहिरीसाठी जागा दिली त्यांना रजिस्ट्री या व्यक्तीने याच्या सातबारातील जमिनीतून करून दिली आणि प्रत्यक्ष मात्र यावेळी जेव्हा वावरातून विहिरींना जागा विकली त्या हद्दीत बांधले गेलेच नाही असा खूप काही महत्त्वाचा विषय आणि खूप गंभीर प्रकरण आज मी संपूर्ण जगासमोर ठेवण्यास तयार झाला कारण मला माहित नाही की मी योग्य करतोय की अयोग्य पण मनात एक इच्छा तयार झाली की आपण हा चालू असलेला पूर्ण प्रकार जगासमोर मांडूया त्यामुळे आज इथपर्यंत थांबतो आणि उद्या पुन्हा या उर्वरित प्रकरणाचा पुढचा भाग म्हणजे पुढची कथा या प्रकरणाची तुमच्यासमोर मांडण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आणि या प्रकरणाचे संदर्भात असलेले सर्व व्यक्तींचे नावे जमिनीचा गट नंबर झालेले पंचनामे सर्व हळूहळू तुमच्यासमोर सादर करण्याचा मी प्रयत्न करेन चला तर मग भेटूया उद्या नक्कीच...........👍

शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३

तहसीलदार यांना तक्रार अर्ज कसा करायचा

प्रति ,                                 मा. तहसीलदार साहेब कार्यालय पैठण ता. पैठण जिल्हा ऑरंगाबाद.                                                                                 विषय : इमामपूर येथील सार्वजनिक रस्ता चालू करणे बाबत .        अर्जदार : इमांपूर येथील गावकरी                       मोहदय ,                                           वरील विषयी आपणास विनंती पूर्वक अर्ज सादर करण्यात येतो की इमांपुर येथील सार्वजनिक रस्ता हा अतिक्रणामुळे बंद झालेला आहे आणि या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे आणि गावकर्यांना  येण्या जाण्यास अडथळा. निर्माण झाला असून आम्ही खूप दिवसापासून ग्रामपंचातींमध्ये तक्रार अर्ज करून देखील ही समस्या सुटत नाही आणि ग्रामपंचायत या कडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे आम्ही गावकरी आपणास हा रस्ता चालू करण्याची विनंती करत आहोत                               तरी मा. साहेबांनी आमची समस्याची गांभीर्याने  दखल घेऊन लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी ही नम्र विनंती .                                                 आपले विश्वासू                     सर्व गावकरी इमाम्पुर ..           

👉 👉 पोलीस स्टेशनच्या बाबतीत सर्वांच्या जीवनात उपयोगि पडणारे अतिशय मोलाची माहिती 👍

👉👉 नमस्कार आज आपण पुन्हा ब्लॉगिंग चालू केलेले आहे या ब्लॉगिंग मध्ये आज अतिशय छान असा लेख घेऊन आलो आहे या लेखात असलेली माहिती सर्वांसाठीच ख...