https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-9617618308777656 Kiran Barde new tricks and update: खैरलांझी हत्याकांड 29 सप्टेंबर काळा दिवस 🙏

सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५

खैरलांझी हत्याकांड 29 सप्टेंबर काळा दिवस 🙏


 २९ सप्टेंबर २००६

#खैरलांजी_हत्याकांड_काळा_दिवस

खैरलांजी हत्याकांड २९ सप्टेंबर २००६ रोजी महाराष्ट्रातल्या भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील खैरलांजी गावात घडले. या दिवशी गावातल्या एका कुटुंबातल्या चार जणांची सायंकाळच्या सुमारास गावातल्याच काही लोकांकडून अमानुष हत्या करण्यात आली. या हत्याकांडाचे पडसाद विधिमंडळा पासून संसदे पर्यंत उमटले. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनेची दखल घेण्यात आली. घटनेनंतर राज्यभर आंदोलनांचे लोण उसळले. घटने नंतर सुमारे सात महिन्यांनी दाखल झालेल्या आणि पंधरा महिने चाललेल्या खटल्याचा निकाल १५ सप्टेंबर २००८ रोजी लागला. न्यायालयाने आठ आरोपींना दोषी ठरवले. या हत्याकांडाचे एकमेव साक्षीदार भैयालाल भोतमांगे यांचे २० जानेवारी २०१७ रोजी हृदयविकाराने निधन झाले. या घटनेने राज्यातील कायदा व सुव्यवस्था, तपास यंत्रणा तसेच दलित अत्याचार प्रतिबंधक अधिनियमातील त्रुटी यांसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. या घटनेचा महत्त्वपूर्ण परिणाम म्हणजे राज्य शासनाने १६ सप्टेंबर २००८ रोजी दलित अत्याचार प्रतिबंधक अधिनियमातील त्रुटी दूर करण्यासाठी एक समिती स्थापन केली.


निकाल:

गुन्हेगारांनी हा गुन्हा करताना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे हे दलित हत्याकांड नसल्याचा निकाल न्यायालयाने दिला. १५ सप्टेंबर २००८ रोजी भंडारा न्यायालयाने दिलेल्या निकाला नुसार ११ पैकी ८ आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सिद्ध झाला आहे. न्यायालयाने पुढील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली - गोपाल सक्रू बिंजेवार, शिशुपाल धांडे. पुढील आरोपींना २५ वर्षाच्या जन्मपेठेची शिक्षा सुनावली - सक्रू बिंजेवार,शत्रुघ्न धांडे,विश्‍वनाथ धांडे,प्रभाकर मंडलेकर,जगदीश मंडलेकर,रामू धांडे. पुराव्या अभावी पुढील ३ आरोपींना सोडून दिले - महिपाल धांडे,धर्मपाल धांडे,पुरुषोत्तम तितीरमारे. सामाजिक वास्तव ढवळून काढणाऱ्या या घटनेमुळे अनेक जण मूलभूत चिंतन व त्यावर आधारित कविता, नाटक, प्रदीर्घ लेख लिहिण्यास प्रवृत्त झाले. 


 साप्ताहिक विवेक मधील संजय सोनवणी यांचा लेख.

‘दृश्यांचा ढोबळ समुद्र’ काव्यसंग्रहातील ‘लव्ह इन द टाइम ऑफ खैरलांजी’ ही प्रज्ञा पवार यांची कविता.

धादांत खैरलांजी - नाटक, लेखिका प्रज्ञा पवार 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

👉 कायद्यापुढे सगळे समान अखेर पीडित कुटुंबाला पंधरा वर्षांनी वासीम सत्र न्यायालयाने दिला न्याय

👉 वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने २ जुलै २०२६ रोजी एका ऐतिहासिक निकालात पोलीस कोठडीतील मृत्यू (Custodial Death) प्रकरणी तत्कालीन ठाणेदारासह ...