प्रेस नोट
पोलीस स्टेशन दिग्रस येथे फिर्यादी नामे गजानन बाबाराव गंडाळे राहणार बजरंग नगर,दिग्रस, पोलीस स्टेशन दिग्रस जिल्हा यवतमाळ यांनी पोलीस स्टेशन दिग्रस येथे येऊन जबानी रिपोर्ट दिला की, फिर्यादी हे दिनांक.18/09/25 रोजी त्यांची राहते घरी बजरंग नगर, दिग्रस येथे हजर असताना फिर्यादी हे त्यांच्या इंस्टाग्राम आयडीवरून मोबाईल मध्ये इंस्टाग्राम पाहत असताना सायंकाळी 07/00 वाजता चे दरम्यान अकाउंट धारक soham _99_pawar या नावाने अकाउंट असलेला अकाउंट धारक याने आदिवासी समाजाबद्दल त्याच्या अकाउंट वरून व्हिडिओ टाकून आदिवासी समाजाच्या महिला प्रति अश्लील भाषेत वक्तव्य करून आदिवासी समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याने तक्रारदार यांच्या जबानी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन दिग्रस येथे अपराध क्रमांक.699/25 कलम 196(1),296 भारतीय न्याय संहिता, सह कलम 3(1)(r),3(1)(s) अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदर गुन्ह्यातील इंस्टाग्राम आयडीचा आरोपी धारक याचा शोध घेणे कामी माननीय श्री कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ, तपास अधिकारी डॉक्टर श्री.सिद्धेश्वर भोरे उपविभागीय पोलीस अधिकारी, दारव्हा यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक श्री वैजनाथ मुंडे पोलीस स्टेशन दिग्रस यांनी पोलीस पथक तयार करून सदर पथकाने पोलीस स्टेशन दिग्रस परिसरात व विविध ठिकाणी गुप्त बातमीदार यांची नेमणूक करून कसोशीने तपास करून अवघ्या 48 तासाचे आत सदर गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न केले. सदर गुन्ह्यातील आरोपी नामे 1)सोहम गोविंद पवार वय 25 वर्षे राहणार मोख क्रमांक 01. तालुका दिग्रस 2) प्रफुल वसंत चव्हाण वय 19 वर्षे राहणार लोहरा तालुका पुसद पोलीस स्टेशन खंडाळा यांच्या शोध घेऊन आज रोजी दिनांक 21/09/2025 रोजी ताब्यात घेऊन त्यांना कायदेशीर रित्या अटक करण्यात आली.
सदरची अति महत्वपूर्ण कार्यवाही माननीय श्री कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ, यांच्या आदेशाने माननीय श्री अशोक थोरात अप्पर पोलीस अधीक्षक, यवतमाळ, सदर गुन्ह्याचे तपास अधिकारी माननीय डॉक्टर श्री सिद्धेश्वर भोरे उपविभागीय पोलीस अधिकारी दारव्हा, यांच्या आदेशाने व पोलीस निरीक्षक श्री वैजनाथ मुंडे साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.प्रेसंजीत जाधव , सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अमोल गुंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल/रवींद्र
मोरलेवार, गोपनीय शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल/अनिल मदने, पोलीस अमलदार/नरसिंग राठोड, पोलीस अमलदार/देवा फलटणकर यांनी सदरची कार्यवाही पार पाडली.
पोलीस निरीक्षक
पोलीस स्टेशन दिग्रस


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा