https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-9617618308777656 Kiran Barde new tricks and update

बुधवार, २४ सप्टेंबर, २०२५

शहीद सोमनाथ सूर्यवंशी केस अपडेट 👉


शहिद सोमनाथ सूर्यवंशी केस अपडेट ―

◆ राज्याच्या गृहसचिवांना ३ ऑक्टोबरपर्यंत अफिडेव्हिट दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश!

◆ शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणाची आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. या प्रकरणात न्यायालयाने राज्य शासनाला गंभीरपणे फटकारत स्पष्ट आदेश दिले आहेत.

◆ न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यानंतर न्यायालयाने चौकशी केल्यावर पुढे काय कारवाई करायची? याविषयी कायद्यात कोणतीही तरतूद नाहीये. त्यामुळे अशा घटनांसाठी स्पष्ट गाईडलाईन तयार करण्याची मागणी याचिकाकर्त्यांचे वकील ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. मात्र, शासनाने ही बाब “पॉलिसी मॅटर” असल्याचे सांगत पुन्हा चालढकल केली. सरकारकडून सांगण्यात आले की, पॉलिसी मॅटरवर जेव्हा चर्चा होईल तेव्हा न्यायालयाला कळविण्यात येईल.

◆ शासनाच्या या भूमिकेवर न्यायालयाने नाराजी व्यक्त करत हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे नमूद केले. तसेच राज्याच्या गृहखात्याच्या मुख्य सचिवांना स्वतःहून ३ ऑक्टोबरपर्यंत शपथपत्र (Affidavit) दाखल करण्याचे आदेश दिले. या शपथपत्रात शासनाचे धोरण आणि गाईडलाईन बाबतचे मत स्पष्टपणे मांडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

◆ दरम्यान, सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणातील एक चौकशी अहवाल शासनाने न्यायालयास सादर केला आहे. मात्र, सूर्यवंशींसोबत अटक असलेल्या अन्य लोकांची अद्याप साक्ष नोंदवण्यात आलेली नाही, अशी माहितीही न्यायालयासमोर आली.

◆ या प्रकरणाची पुढील सुनावणी १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. याचिकाकर्त्यां विजयाबाई सूर्यवंशी यांच्यावतीने ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयात बाजू मांडली.

#JusticeForSomanathSuryawanshi 
#prakashambedkar #parbhani #maharashtra 
#DevendraFadnavis

दि. 24 सप्टेंबर1932 पुणे करार


१ , स्वतंत्र मतदार संघ
(seprate electrate) sc,st,obc
आणि minority च्या उमेदवाराला मत देण्याचा आधिकार फक्त sc st obc 
आणि minority च्या लोकांनाच राहील.
2 ,दुहेरी मतदान (दोन वेळा) मत देण्याचा आधिकार ( dualvote system) sc st obc आणि minority च्या उमेद्वाराला त्यांच्या लोकांकडून आपला प्रतिनिधी निवडून आणण्याचा आधिकार
राहील.
उदा : एखाद्या विभागातुन sc चा उमेदवार उभा असेल तर त्याला sc कास्टचेच लोक मतदान करु शकतात
St, obc, minority, च्या उमेद्वाराला त्यांचेच लोक मतदान करतील.
३ , प्रोढ़ मताधिकार ( adult pranchise) २१ वर्षे पूर्ण असलेल्या व्यक्तिलाच
मतदानाचा आधिकार असेल. 
इंग्लंड च्या पार्लमेंट मध्ये मतदान कोणी करावे याच्यावर चर्चा सुरु होती या चर्चेचे डॉ, आंबेडकरांना ही निमंत्रण होते.
त्या चर्चेसाठी बाबासाहेबांना बोलावण्यात आले.
इंग्रजांनी मुद्दा मांडला की जे लोक income tax भरत असतील तेच वोट करतील. त्यांचा मुद्दा बाबासाहेबांनी मोठ्या शिताफीने खोडला.
ते म्हणाले की भारतीय लोक अशिक्षित आणि गरीब आहेत. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची संपत्ती नाही त्या मुळे incomtax भरण्याचा प्रश्नच येत नाही. आणि भारतात शिक्षण आणि संपत्ती साठविण्याचा आधिकार फक्त ब्राम्हन लोकांनाच आहे. त्या मुळे असा कायदा पास झाला तर सर्व आधिकार आणि निर्णय हे ब्राम्हनच घेतील.
आणि आमचे लोक आधिकारापासून वंचीत रहातील. त्या पेक्षा वोट देण्याचा आधिकार हा २१ वर्षे पूर्ण असलेल्या व्यक्तिलाच मिळावा.
४ , पर्याप्त प्रतिनिधित्व :
(adeguate representation) स्वतंत्र मतदार संघामध्ये sc, st, obc, आणि minority यांच्या मधून लोकसंखेच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व मिळणार
होते.
पण ह्याच पुणे करारा मुळे संयुक्त मतदार संघ लागू झाला. 
आणि आज पर्यंत लोकसंख्येच्या प्रमाणात
प्रतिनिधी मिळाले नाहीत. 
१९५२ च्या निवडनुकीत पंडीत जवाहरलाल नेहरुनी ६०% ब्राम्हनांना टिकिट देऊन ५६% ब्राम्हण निवडून आणले.
आणि स्वतंत्र भारतात पुन्हा एकदा ब्राम्हणशाही प्रस्थापित झाली.
आणि पुन्हा वर्चस्व ब्राम्हनांचेच स्थापन झाले
आणि जेंव्हा हे चार आधिकार इंग्रजांकडून
मिळवुन घेतले तेंव्हा गांधीनी बाबासाहेबां विरोधात अमरण उपोषनाचे हत्यार उपसले,
कारण की गांधीनी ओळखले होते की या आधिकारांमुळे संसदेत खरे प्रतिनिधी निवडून जातील. आणि असे झाले तर
ब्राम्हनाला देखील sc, st, obc, आणि minority च्या मतांवर आवलंबुन रहावे लागेल. भारतात obc ची संख्या सर्वात जास्त ५२% आहे, त्या खालोखाल minority १८% आणि sc ची १५% आणि st ची ८% व् त्या खालोखाल फक्त ३% ब्राम्हणाची असेल, त्यामुळे आपोआप बाकी समाजाचे प्रतिनिधी जास्त निवडून जातील व ब्राम्हनाचा पत्ता साफ होईल.
त्यामुळे गांधीनी ही खबरदारी घेतली.
व बाबासाहेबांनी हे आधिकार या सर्वांना मिळवुन देऊ नये .म्हणुन गांधीनी पुण्याच्या येरवडा जेल येथे आमरण उपोषण सुरु केले. 
गांधीजी चा PA देसाई ने त्याच्या डायरीत गांधीजी आणि सरदार पटेल यांचे संवाद लिहून ठेवले आहेत. गांधीजी म्हणतात की "
"सरदार तुम मेरी नजर से देखो, ये हरीजन गुंडे भविष्य में हमारे लोगो को पीट रहे है ।" 
आणि मग हिंदुत्ववाद्यांनी बाबासाहेबाना धमक्या देण्यास सुरु केल्या पण बाबासाहेब डगमगले नाहीत. परंतु गांधीजी जेंव्हा मरावयास टेकले तेंव्हा त्यांच्या अनुयायांनी आंबेडकरांना शेवटची धमकी दिली की जर गांधीजीना मरण आले तर आम्ही भारतात दंगली पेटवू आणि सर्व जाती नष्ट करु....
बाबासाहेब दचकले मी ज्यांच्या साठी हे सर्व करतो आहे तेच जिवंत राहिले नाहीत तर मग मी ह्या ह्क्काला मिळवून तरी काय करु. 
आणि बाबासाहेबांनी नाईलाजाने ज्या करारावर सही केली
तोच हा पुणे करार....   
आणि त्याचे परिणाम आज ही आपण पहात आहोत.
आज ही सत्ता कोणत्याही पक्षाची असो.
आधिकार आणि रिमोर्ट ब्राम्हनाच्याच हातात
आहे.आणि आज ही आमच्या लोकांच्या
कत्तली करत आहेत.         👉 आदिवासी जमात विकास परिषद महाराष्ट्र राज्य. 🙏 

विरांगणा राणी दुर्गावती समाज क्रांतीकारक ✌️


 विरांगणा राणी दुर्गावती यांचा जन्म दिनांक 5 ऑक्टोंबर 1524 मध्ये प्रसिद्ध राजपूत राजा चंडेल सम्राट किरत राय यांचे कुटुंबात झाला कालन जर किल्ला (बांदा, उत्तर प्रदेश भारत) हे त्यांचे जन्मस्थान होय मोहम्मद गजनी याला पळता भुई थोडी करणाऱ्या राणा विद्याधर यांचा बचाव करण्यामुळे चंदेल राजघराणे इतिहासात प्रसिद्ध झाले. राणा विद्याधर यांच्या शिल्पकलेवरील प्रेमाची प्रचिती जगप्रसिद्ध खजुराहो मंदिर व कालन जर किल्ल्याकडे पाहून येते. राणी दुर्गावती यांच्या पराक्रमामुळे त्यांच्या वंश परंपरागात धैर्य व कला भक्तीच्या परंपरेला आणखीन प्रतिष्ठा लाभली 1542 साली, राणी दुर्गावती यांचा विवाह गुंड राजघराण्यातील राजा संग्राम शहा यांचे सुपुत्र दलपत शहा यांच्याशी बऱ्याच संघर्षानंतर झाला. या विवाह मुळे चंडाल व गोंड राजघराणे एकत्र आले याच कारणामुळे शेरशः सुरीचा पाढाव करते समय राणा किरत सिंग यांना आपले जावई दलपत शहा यांच्याकडून मदत मिळाली नंतर राणीने आपली राजधानी सिंगर गडावरून हलवून चौरंग गडावर नेली सातपुडा पर्वतरांगा मधील या किल्ल्याला राजकीय महत्त्व होते  🙏 तसेच विरांगणा राणी दुर्गावती यांचा मृत्यू दिनांक 24 जून 1564 मध्ये झाला  🙏 जय आदिवासी जय बिरसा🙏 जय भीम🙏 जय शिवराय 🙏 नमस्कार प्रयत्न फक्त एवढेच मित्र नको आपल्या आदिवासी समाजाला आपल्या समाज क्रांतीकाराविषयी थोडीबोध माहिती असणे गरजेचे आहे कारण आपणच आपला इतिहास विसरत आहोत आणि आपल्याला जर आपला इतिहास माहिती नसला तर आपण कोणाला काय संदर्भ सांगणार. 🙏 तसेच दोन शब्द बोलून आपली रजा घेतो 🙏आदिवासी जमात विकास संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक. अध्यक्ष किरण सखाराम बर्डे 🙏

मंगळवार, २३ सप्टेंबर, २०२५

आदिवासी समाजाने स्वतःच्या रक्ताने माननीय सुप्रीम कोर्ट जज भूषण गवई साहेबांना लिहले पत्र👉


नवरात्राच्या पार्श्वभूमीवर पारधी बांधवांचे रक्ताने लिहिलेले पत्र : गायरान जमिनीच्या मागणीसाठी सरन्यायाधीशांना आवाहन

✒️(समाज प्रतिनिधी :अनिल पवार)
धाराशिव, २३ सप्टेंबर २०२५ : नवरात्राच्या शुभ मुहूर्तात साड्यांच्या रंगांची चर्चा जोरदार सुरू असताना, महाराष्ट्रातील वंचित आदिवासी पारधी बांधवांनी मात्र स्वतःच्या रक्ताच्या रंगाने न्यायाची मागणी केली आहे. धाराशिव जिल्ह्यातील गायरान जमिनीच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या या पारधी बांधवांनी स्वतःच्या हाताने रक्ताने लिहिलेले पत्र सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना पाठवले आहे. वर्षानुवर्षे गायरान जमिनींवर राहणाऱ्या या आदिवासी कुटुंबांना नावावर नसल्याने घर बांधता येत नसल्याची व्यथा त्यात मांडली आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व पारधी समाजातील कार्यकर्ते बजरंग ताठे करत आहेत. ते म्हणाले, "आमचे जगणे पणाला लागले आहे. गायरान जमिनींवर आम्ही दशकानुदशके वावरत आहोत, पण त्या आमच्या नावावर होतं नाहीत. जिथे राहतो तिथेही मालकी हक्क नसल्याने साधे घर बांधता येत नाही. नवरात्राच्या या पावित्र्य काळात आम्ही स्वतःच्या रक्ताने हे पत्र लिहून सरन्यायाधीशांकडे न्यायाची याचना करत आहोत. आम्हाला विश्वास आहे की, सर्वोच्च न्यायालय वंचितांच्या प्रश्नांना न्याय देईल."

धाराशिव जिल्ह्यातील आदिवासी पारधी बांधवांचे हे आंदोलन गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. गायरान जमिनींच्या नियमांमुळे आदिवासी समाजाला मिळणाऱ्या हक्कांवर बंधने येत असल्याचा आरोप करत ते न्यायालयीन मार्ग अवलंबत आहेत. बजरंग ताठे यांच्या नेतृत्वाखालील या संघर्षात सुमारे ५०० हून अधिक कुटुंबे सहभागी झाली आहेत. ते म्हणाले, "हे पत्र आमच्या रक्ताने लिहिलेले आहे, कारण आमची व्यथा तेवढ्याच रंगाची आहे. आम्ही फक्त हक्क मागत आहोत, जे घटनेने आम्हाला मिळणारे आहेत."

या घटनेने सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये आणि आदिवासी समाजात कुतूहल निर्माण झाले आहे. अनेक संघटना या आंदोलनाला पाठिंबा देत असून, सर्वोच्च न्यायालयाकडून लवकरच सकारात्मक प्रतिसाद येईल, अशी अपेक्षा आहे. नवरात्राच्या नऊ रंगांप्रमाणे या संघर्षाला न्यायाच्या रंगाने रंगवले जावे, अशी प्रार्थना पारधी बांधव करत आहेत.

क्रांतिवीर राघोजी भांगरे ✌️


 क्रांतिवीर राघोजी भांगरे जन्म दिनांक 8 नोव्हेंबर  1805 राघोजींचा जन्म महादेव कोळी जमातीत झाला मराठा सैन्यास हरवल्यानंतर ब्रिटिशांनी महादेव कोळ्यांच्या परंपरागत अधिकारात गणल्या जाणाऱ्या सह्याद्रीतील किल्ल्यांच्या शिलेदाऱ्या, वतनदाऱ्या काढल्या परंपरागत अधिकार काढून घेतल्याने महादेव कोळ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. इ. स. 1828 साली. शेत सारा वाढवण्यात आला सारा वसुलीमुळे गोरगरिबांना रोख पैशाची गरज भासू लागली त्यामुळे गोरगरीब सावकार, वाण्याकडून भ रमसाठ दराने कर्ज घेऊ लागले कर्जाच्या मोबदल्यात सावकार जमिनी बळकवू लागले त्यामुळे राघोजींनी सावकार आणि ब्रिटिश यांच्या विरोधात बंडाला सुरुवात केली इसवी सन १८३० साली अकोले तालुक्यातील रामा किंवा पकडून अहमदनगर येथील तुरुंगात फाशी देण्यात आली यामुळे महादेव कोळी जमातीच्या बंडखोरात दहशत पसरेल असे ब्रिटिशांना वाटत होते. रामाचा जोडीदार राघोजी भांगरे याने सरकार विरोधी बंडात सामील होऊ नये, यासाठी त्याला मोठ्या नोकरीवर घेतले. परंतु नोकरीत पदोपदी होणारा अपमान आणि पगारातील काटछाट यामुळे राघोजी चिडले आणि नोकरी सोडून त्यांनी बंडात उडी घेतली. पुणे जिल्ह्यात व नगर जिल्ह्यात राघोजी आणि बापू भांगरे यांच्या नेतृत्वाखाली उठाव सुरू झाला. इ. स. 1838 साली रतनगड आणि सनगर किल्ल्यांच्या परिसरात त्याने बंड उभारले कॅप्टन मंकिटोश याने हे बंड मोडण्यासाठी सर्व अवघड खिंडी, दर्या,घाट रस्ते जंगले यांची बारीकसारीक माहिती मिळवली. बंडखोरांची गुपिते बाहेर काढली परंतु बंडखोर वरमले नाही. उलट बंडाने व्यापक रूप धारण केले ब्रिटिशांनी कुमक वाढवले मार्ग रोखून धरले 80 लोकांना कैद केले दहशतीमुळे काही लोक उलटले फंद फितुरीमुळे राघोजींचा उजवा हात समजला जाणारा बापूजी मारला गेला. राघोजींना पकडण्यासाठी इंग्रज सरकारने पाच हजारांचे बक्षीस जाहीर केले. ठाणे गॅजेटी यरच्या जुन्या आवृत्तीत लिहिल्याप्रमाणे ऑक्टोंबर 1843 मध्ये राघोजी भांगरे मोठी टोळी घेऊन घाटावरून खाली उतरले आणि त्यांनी अनेक दरोडे घातले असा उल्लेख आहे राघू जिने मारवाड्यांवर छापे घातले त्यांनी पोलिसात तक्रार केली ठाव ठिकाण विचारायला आलेल्या पोलिसांना माहिती न दिल्याने चिडलेल्या पोलिसांनी राघोजींच्या आईचे निर्दयीपणे हाल केले त्यामुळे चिडलेल्या राघवजीने टोळी उभारून नगर व नाशिक येथे हल्ले केले. हाती लागलेल्या प्रत्येक मारोड्यांचे नाक कापले राघोजींच्या भयाने मारवाडी गाव सोडून पळाले असा उल्लेख अहमदनगरच्या गॅजेट इयर मध्ये सापडतो. साताऱ्याच्या पदावून खाली झालेल्या छत्रपतींना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इंग्रजा विरुद्ध उठावाचे व्यापक प्रयत्न चालले होते त्यांच्याशी राघोजींचा संबंध असावा असे अभ्यासकांचे मत आहे 🙏🙏🙏 नमस्कार माझ्या सर्व आदिवासी बांधवांना व मित्रांना आपल्या ब्लॉगवर नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी लाईक शेअर आणि कमेंट करा 🙏

सोमवार, २२ सप्टेंबर, २०२५

ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल ✌️



प्रेस नोट 
पोलीस स्टेशन दिग्रस येथे फिर्यादी नामे गजानन बाबाराव गंडाळे राहणार बजरंग नगर,दिग्रस, पोलीस स्टेशन दिग्रस जिल्हा यवतमाळ यांनी पोलीस स्टेशन दिग्रस येथे येऊन जबानी रिपोर्ट दिला की, फिर्यादी हे दिनांक.18/09/25 रोजी त्यांची राहते घरी बजरंग नगर, दिग्रस येथे हजर असताना फिर्यादी हे त्यांच्या इंस्टाग्राम आयडीवरून मोबाईल मध्ये इंस्टाग्राम पाहत असताना सायंकाळी 07/00 वाजता चे दरम्यान अकाउंट धारक soham _99_pawar या नावाने अकाउंट असलेला अकाउंट धारक याने आदिवासी समाजाबद्दल त्याच्या अकाउंट वरून व्हिडिओ टाकून आदिवासी समाजाच्या महिला प्रति अश्लील भाषेत वक्तव्य करून आदिवासी समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याने तक्रारदार यांच्या जबानी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन दिग्रस येथे अपराध क्रमांक.699/25 कलम 196(1),296 भारतीय न्याय संहिता, सह कलम 3(1)(r),3(1)(s) अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला. 
 सदर गुन्ह्यातील इंस्टाग्राम आयडीचा आरोपी धारक याचा शोध घेणे कामी माननीय श्री कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ, तपास अधिकारी डॉक्टर श्री.सिद्धेश्वर भोरे उपविभागीय पोलीस अधिकारी, दारव्हा यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक श्री वैजनाथ मुंडे पोलीस स्टेशन दिग्रस यांनी पोलीस पथक तयार करून सदर पथकाने पोलीस स्टेशन दिग्रस परिसरात व विविध ठिकाणी गुप्त बातमीदार यांची नेमणूक करून कसोशीने तपास करून अवघ्या 48 तासाचे आत सदर गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न केले. सदर गुन्ह्यातील आरोपी नामे 1)सोहम गोविंद पवार वय 25 वर्षे राहणार मोख क्रमांक 01. तालुका दिग्रस 2) प्रफुल वसंत चव्हाण वय 19 वर्षे राहणार लोहरा तालुका पुसद पोलीस स्टेशन खंडाळा यांच्या शोध घेऊन आज रोजी दिनांक 21/09/2025 रोजी ताब्यात घेऊन त्यांना कायदेशीर रित्या अटक करण्यात आली.
                 सदरची अति महत्वपूर्ण कार्यवाही माननीय श्री कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ, यांच्या आदेशाने माननीय श्री अशोक थोरात अप्पर पोलीस अधीक्षक, यवतमाळ, सदर गुन्ह्याचे तपास अधिकारी माननीय डॉक्टर श्री सिद्धेश्वर भोरे उपविभागीय पोलीस अधिकारी दारव्हा, यांच्या आदेशाने व पोलीस निरीक्षक श्री वैजनाथ मुंडे साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.प्रेसंजीत जाधव , सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अमोल गुंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल/रवींद्र 
मोरलेवार, गोपनीय शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल/अनिल मदने, पोलीस अमलदार/नरसिंग राठोड, पोलीस अमलदार/देवा फलटणकर यांनी सदरची कार्यवाही पार पाडली.

              पोलीस निरीक्षक 
          पोलीस स्टेशन दिग्रस

देशाचे मूळ मालक आदिवासी ✌️


साहब तुम हमारे साथ क्यू यह खिलवाड करना चाहते हो...🌎🙏🏽

तुम हमारा जीवन संघर्ष तो नही तो नही देखते नही जानते?
.............?.................
हम ईस प्रकृती के नियोंमो से ही चलते है.
🌎🌿
हम ईस धरती का आत्मा है!
हम ईस धरती का श्वास है!..
हम ईस धरती के सिद्धांत हैं!..
हम ईस धरती का लोकसंगीत है!..
हम ईस धरती का भाषा है!..
हम ईस धरती का सभ्यता है!..
हम ईस धरती का मानवता है!..
हम ईस धरती के रखवाले है!..
हम ईस धरती का आग है!..
हम ईस धरती का जल है!...
हम ईस धरती का हवा है!...
हम ईस धरती का इतिहास हूं...
हम ईस धरती का विचार हूं!...
हम ईस धरती के रंगमंच हूं!.
हम ईस धरती का कला है!..
हम ईस धरती का पान  है!..
हम ईस धरती का फूलं है!...
हम ईस धरती का मुल बीज है!...
हम ईस धरती का अनाज है!....
हम ईस धरती का लोकतंत्र है!...
हम ईस धरती के नियम है!....
*🌎यह जल, जंगल,जमीन,* 
यही हमारी पहचान है!
यही हमारा अस्तित्व है!
यही हमारी अस्मिता है!
यही हमारा सांसंस्कृती जीवन है!
 *और तुम...* 
हमारे साथ खिलवाड करना चाहते हो!.🌎
ऐसा करना छोड दो साहब तुम...🌏
ऐसी गलती भी तुम मत करना साहब ...🌎
नही तो तुम भीं नही *"बचोगे"* 
      *[ AVM ]* 
(आदिवासी चळवळ निरीक्षक.

👉 👉 पोलीस स्टेशनच्या बाबतीत सर्वांच्या जीवनात उपयोगि पडणारे अतिशय मोलाची माहिती 👍

👉👉 नमस्कार आज आपण पुन्हा ब्लॉगिंग चालू केलेले आहे या ब्लॉगिंग मध्ये आज अतिशय छान असा लेख घेऊन आलो आहे या लेखात असलेली माहिती सर्वांसाठीच ख...