नवीन योजना, नविन महिती, ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी कसे काम करावे आणि लेखी तक्रार अर्ज. आदिवासी क्रांतिकारक यांची महिती, समाज जनजागृती, ग्रामपंचायत मधील महिती घरकुल विभागातील कागद पत्रे, महिती आणि खेळ तसेच कायद्याची अमलबजावणीसाठी कसे काम करावे सर्व अर्ज प्रक्रिया, निवेदन तयार करणे संदर्भ आणि बरेच काही
रविवार, ५ ऑक्टोबर, २०२५
आदिवासी जमात विकास संस्थेसाठी आनंदाची बातमी
आदिवासी जमात विकास संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे की आज दिनांक 5 ऑक्टोंबर 2025 रोजी आदिवासी जमात विकास संस्थेच्या बाबतीत हे खूप महत्त्वाची व मोठे अपडेट आले असून म्हणजे थोडक्यात असं म्हणण्यास काही अडचण नाही की गेल्या पाच वर्षांपूर्वीपासून आपण आपल्या आदिवासी जमात विकास संस्था डेव्हलप करण्यासाठी धडपडत होतो कुसात गाव पातळीवर पळत हिंडत होतो त्या आपल्या धडपडीला अत्यंत मोठे यश आले असून येणाऱ्या डिसेंबर महिन्यापासून आदिवासी जमात विकास संस्थेचे जे कार्यकर्ते माझ्या प्रत्येक ठिकाणी पावलाला पाऊल देऊन चालत होते त्यांना मी शब्द दिलेला होता की लवकरच आपण आपल्या माणसाला मानधन उपलब्ध करून देण्याचं नियोजन झालेला असून लवकरच त्या अनुषंगाने आपले काम चालू होणार आहे कारण मला हजार कार्यकर्ते सांभाळण्यापेक्षा शंभरच सांभाळायचे आहेत परंतु त्या शंभरांचे कुठेतरी फायदा व्हावा विकास व्हावा या अनुषंगाने आज सेंट्रल गव्हर्मेंट च्या अत्यंत चांगल्या व्यक्तिमत्त्वासोबत आज माझी बैठक पार पडली या बैठकीमध्ये आदिवासी जमात विकास संस्थेचे सचिव श्री भाऊसाहेब सुखदेव बर्डे सर आणि आदिवासी जमात विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किरण सखाराम बर्डे हे देखील उपस्थित होते तसेच आणखी ही व्यक्ती या बैठकीत उपस्थित होत्या परंतु माफ करा मित्रांनो काही गोपनीयतेचे विषय असल्यामुळे मी ते जगजाहीर करू शकत नाही कारण मी जर ते जग जाहीर करायला सुरुवात केली तर आपल्या काढायला चालू होतील त्यामुळे लवकरच आपण डिसेंबरच्या कालावधीमध्ये आपल्या माणसाच्या चेहऱ्यावर आनंद बघणार आहोत जय आदिवासी जय बिरसा 🙏 पुन्हा एकदा आदिवासी जमात विकास संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण प्रत्येक क्षणाला प्रत्येक दुःख सुखात माझ्यासोबत माझ्या भावाप्रमाणे कायमस्वरूपी सोबत राहिलात तुमच्या या कष्टाचा चीज नक्की होणार असा शब्द मी पूर्ण आदिवासी जमात विकास संस्थेच्या कार्यकर्त्यांना देतोय 🙏🙏🙏🙏🙏
शनिवार, ४ ऑक्टोबर, २०२५
🙏 आदिवासी समाजाला न्याय कधी मिळेल 🙏
नमस्कार मित्रांनो जय आदिवासी आज आपण खूप गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत म्हणजे रियल लाईफ मध्ये आलेला अनुभव आज मी तुमच्यासमोर शेअर करणार आहे आदिवासी समाजावर ठीक ठिकाणी खूप गंभीररित्या अशी बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण मी स्वतः आदिवासी जमात विकास संस्थेमार्फत गंगापूर तालुक्यामध्ये 50 ते 55 गावांचा सर्वे केलेला असून त्या पूर्ण गावाचं रेकॉर्ड पूर्ण माझ्याकडे उपलब्ध आहे आणि हो हा सर्वे कर्त्यावेळी आदिवासी भिल समाजाची जी परिस्थिती डोळ्यासमोर आली ती खूप चिंताजनक भावुक आणि चीड येण्यासारखे होते कारण की जर आदिवासी समाजासाठी खरंच इतक्या संघटना इतके समाज कार्यकर्ते काम करतायेत तरीपण आदिवासी भिल समाज हा शिक्षणाच्या मूळ प्रवाह पासून तसेच जीवनाच्या मूलभूत सुविधा पासून वंचित कसा? असा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाला काही ठिकाणी तर असा अनुभव आला की आपल्याला खरंच स्वातंत्र्य मिळाले का मग आपण जर स्वातंत्र्य झालो असेल तर मग आपला अशी परिस्थिती का असे बरेचसे प्रश्न माझ्या डोक्यात येत होते तसेच मी आणि माझे सहकारी मित्र तसेच संस्थेचे पदाधिकारी यावरती खूप गंभीर स्वरूपाची चर्चा केल्याच्या नंतर त्या पद्धतीचा एक रिपोर्ट तयार केल्याच्या नंतर एक अ सामान्य गोष्ट आढळून आली ती म्हणजे आदिवासी समाजाची दफन भूमी हा फक्त एका तालुक्याचा विषय नसून पूर्ण नऊ तालुक्यात मराठवाड्यात कितीतरी असे प्रकरण निघतील कारण जर गंगापूर सारख्या बावन गावात जर दफनभूमीची समस्या आहे तर विचार करा सारखा प्रश्न आहे इतर बाकीच्या आठ तालुक्यात काय परिस्थिती असेल कुणाला दपूनभूमीत जाण्यासाठी रस्ता नाही कुणाला अंत्यविधी करण्यासाठी जागा नाही कोणी ज्या ठिकाणी अंत्यविधी करते त्या ठिकाणी अतिक्रमण कोणाचा ज्या ठिकाणी अंत्यविधी झालाय त्या ठिकाणी नांगर रोट्या हान, अक्षरशः काही वेळेला प्रसंग असे आले की काही गाव पातळीवर अंत्यविधी झाल्याच्या नंतर अंत्यविधी करायला देखील खूप वेळ लागतो त्याचं कारण असे आहे की दफन भूमीचे संदर्भात असलेले वाद मग जर आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या ही जर गोष्ट लक्षात येत असेल तर मला कुठे असं वाटतं की ज्या पद्धतीने एसटी आरक्षण वाचवण्यासाठी आपला समाज एकत्र झालाय त्या पद्धतीने आपल्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत त्याचे संविधानिक अधिकार मूलभूत अधिकार हे त्याचे त्याला कळाले पाहिजे आणि ही गोष्ट कुठलीही एक संस्था किंवा एक संघटना मिळून करू शकत नाही आणि ते या जन्मात शक्य देखील नाही ज्या पद्धतीने माझ्या आदिवासी समाजांना एसटी आरक्षण बचाव समिती स्थापन करून प्रत्येक जिल्हा तालुका गाव पातळीवर मोर्चे आंदोलन काढलीत तशाच पद्धतीने कुठेतरी या प्रश्नाला देखील वाचा फुटल्या पाहिजे हात फक्त एकच प्रश्न आहे यावर्षी आलेल्या या महापुरात आपल्या आदिवासी बांधवांच्या घरातील संसार भांडे तर गेलेच परंतु गर्दीतला संसार देखील उध्वस्त झाला त्यामुळे आपल्या समाजाला जागृत करण्याच्या भावनेने हा लेख तयार करण्याची इच्छा निर्माण झाली आणि मनात जे विचार होते ते आपल्यासमोर व्यक्त केले कारण आपला समाज हा शंभर टक्के सुशिक्षित युवा तरुणांच्या हाती आहे कारण माझ्या आदिवासी युवा बांधवांना माझी विनंती आहे की आपण आदिवासी समाजाचा मनका हात तो कमजोर होता कामा नये 🙏 जय आदिवासी🙏 जय बिरसा 🙏
गुरुवार, २ ऑक्टोबर, २०२५
🙏🙏(TRTI )👉 पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 2025 26 करिता ऑनलाइन अर्ज सादर करण्याबाबत महत्त्वाच्या सूचना
बुधवार, १ ऑक्टोबर, २०२५
🙏 नंदुरबार 🙏जय दादा वळवी प्रकरणात माजी मंत्री के.सी. पाडवी साहेबांनी उचचली तातडीने सकारात्मक पावले🙏
🚩 माझ्या नंदुरबार जिल्ह्यातील तमाम आदिवासी बांधवांना, माता-भगिनींना आणि युवा शक्तीला माझा सस्नेह जय जोहार 🚩
आदिवासी संघटनेतील तरुण जय वळवीच्या अमानुष हत्येने आपणा सर्वांच्या मनावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या आत्म्यास शांती लाभो, ही प्रार्थना. या क्रूर कृत्याचा मी आधीच जाहीर निषेध करीत त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले आहेच त्यासोबत यातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी ठामपणे लढत आहे.
२४ तारखेला जय वळवीला न्याय मिळवून देण्यासाठी समाज मोठ्या संख्येने एकत्र आला आणि शांततेत मूक मोर्चा काढला. मात्र काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक गोंधळ घालून आपल्या शांततेच्या आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला. ही कृती दुर्दैवी असून त्यांचा आपल्या खऱ्या उद्देशाशी काहीही संबंध नाही.
या घटनेनंतर काही निरपराध तरुणांना पोलिसांनी अटक केली. कोणताही निरपराध तरुण भरडला जाऊ नये यासाठी मी आणि माजी मंत्री अँड के सी पाडवी साहेबानी तातडीने पाऊले आधीच उचलली आहेत, गृह खात्याला निवेदन दिले असून, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याशी सातत्याने संपर्कात आहेच आज पुन्हा नंदुरबार पोलिस अधीक्षक यांच्याशी भेटून अटक झालेल्या निर्दोष तरुणांची सुटका व्हावी या संबंधित भेट घेत सर्व माहिती घेतली आहे.
याशिवाय, अटक झालेल्या तरुणांच्या सुटकेसाठी कायदेशीर लढा सुरू केला आहे. वरिष्ठ वकील तसेच समाजातील वकिलांमार्फत माझी टीम यावर काम करत आहे. लवकरच आपल्या बांधवांची सुटका होईल असा विश्वास देतो.
बंधू-भगिनींनो,
या काळात काही लोक या दुर्दैवी घटनेचं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझं स्पष्ट आवाहन आहे – कुठल्याही राजकारणाचा बळी पडू नका. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि सोशल मीडियावर समाजाला हानी होईल अशा गोष्टी टाकू नका.
आजची वेळ आहे एकजुटीने, शांततेने आणि कायद्याच्या मार्गाने उभे राहण्याची. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या न्याय आणि संविधानाच्या शक्तीवर आपला विश्वास ठेवा.
जय वळवीला न्याय मिळवण्यासाठी, दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आपण सारे एकत्र आहोत.
मी आणि के सी पाडवी साहेब माझ्या समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.
🙏जय जोहार! जय संविधान! धन्यवाद. 🙏
रेल्वेने दिक्षा भूमीला जाणाऱ्या अनुयायांना रोखू नका 👉
✅दरवर्षी लाखो बौद्ध अनुयायी रेल्वेने दीक्षाभूमीला जातात. याही वर्षी प्रवासाची सुरुवात झालेली आहे. परंतु आजच आमच्याकडे अत्यंत गंभीर तक्रार आली की औरंगाबाद रेल्वे स्टेशन परिसरात काही तरुणांना रेल्वे पोलिसांकडून मारहाण करण्यात आली असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे तरुण अतिशय भयभीत होऊन सांगत होते की — “आम्ही दीक्षाभूमीला निघालो होतो, मात्र आम्हाला अन्यायाने अडवण्यात आले आणि ताब्यात घेण्यात आलं.”
राज्य सरकारला माहीत आहे की दरवर्षी पाच दिवस रेल्वेने बौद्ध अनुयायी मोफत प्रवास करतात. मग अशा परिस्थितीत रेल्वे पोलिसांकडून त्रास दिला जाणं, मारहाण केली जाणं आणि अडवणूक करणं हा एक उघड उघड छळ आहे. याचा निषेध आम्ही तीव्र शब्दांत करतो.
सरकारने तातडीने रेल्वे विभागाला स्पष्ट आदेश द्यावेत की दीक्षाभूमीकडे जाणाऱ्या कोणत्याही बौद्ध अनुयायाला कुठेही अडवले जाणार नाही, मारहाण केली जाणार नाही, त्रास दिला जाणार नाही. जर यापुढे एकाही अनुयायाला रेल्वे पोलिसांकडून वा रेल्वे प्रशासनाकडून छळ झाला, तर त्याचे देशभरात तीव्र पडसाद उमटतील याची जबाबदारी राज्य सरकार व केंद्र सरकारवर असेल.
दीक्षाभूमीकडे जाणाऱ्या लाखो अनुयायांना सन्मानपूर्वक, चांगल्या पद्धतीने वागणूक देणे ही सरकारची जबाबदारी आहे. याकडे आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. कुणालाही त्रास होऊ नये म्हणून तातडीने रेल्वे विभागाला आदेश द्यावेत, अशी आमची ठाम मागणी आहे.
#AllindiaPantherSena
मंगळवार, ३० सप्टेंबर, २०२५
🙏👉 भारतीय आदिवासींचे सर्वोच्च नेता जयपाल सिंह मुंडा🙏
भारतीय आदिवासींचे आणि झारखंड आंदोलनाचे एक सर्वोच्च नेता आणि एक राजनीति तज्ञ पत्रकार, लेखक, संपादक, आणि मे 1925 मध्ये ऑक्सफोर्ड ब्लू किताब मिळवलेले आणि हॉकीचे एक मात्र आंतरराष्ट्रीय खिलाडी होते त्यांच्या कॅप्टनी च्या काळात मे 1928 चे ऑलिंपिक मध्ये भारताने पहिले सुवर्णपदक मिळवले होते आणि विशेष म्हणजे भारतामध्ये जयपाल सिंह मुंडा सर्वोच्च सरकारी पदावरती होते जयपाल सिंह मुंडा छोटे नागपूर ( आताचे झारखंड राज्य ) मुंडा जनजातीचे होते मिशनरीज यांच्या मदतीने ते ऑक्सफर्ड सेंट जॉन्स कॉलेजमध्ये शिकण्यासाठी गेले होते ते असामान्य रूपाने खूप प्रतिभाषा आली होती त्यांना शिक्षणाच्या व्यतिरिक्त खेळकुद खूप आवड होती त्यामध्ये हॉकी त्यांचा प्रमुख खेळ होता त्याशिवाय त्यांनी वाद विवादात नाव खूप अलौकिक केले होते त्यांची निवड भारतीय सिविल सेवा (i.c. s ) मध्ये निवड झाली होती आयसीएस चे प्रशिक्षण त्यांना खूप प्रभावीत करण्यासारखे होते कारण ते मे 1928 साली एम्सट रडम मध्ये ऑलम्पिक हॉकी मध्ये पहिले सुवर्णपदक मिळवणारी भारतीय टीमचे कॅप्टन च्या रूपात नेदरलँडला गेले आणि नेदरलँड वरून वापस येत असताना त्यांना आयसीएस चे एक वर्षाचे प्रशिक्षण पुन्हा घेण्यास सांगितले गेले, अशातच त्यांनी आयसीएस चे पुन्हा प्रशिक्षण घेण्यास नकार दिला त्यांनी बिहारच्या शिक्षा जगात योगदान देण्यासाठी त्या वेळचे तात्कालीन बिहार काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना या संबंधात पत्र लिहिले. परंतु त्यांना कुठले ही सकारात्मक उत्तर मिळाले नाही 1938 साली जयपाल सिंह मुंडा यांनी पटना आणि रांची हा दौरा केला त्या दौऱ्यादरम्यान आदिवासींची खराब परिस्थिती बघून त्यांनी राजनीतीत यायचा विचार केला. जानेवारी 1938 मध्ये त्यांनी आदिवासी महासभेचे अध्यक्षपद ग्रहण केले त्यावेळी बिहार पासून एक वेगळे झारखंड स्थापन करण्याची मागणी ठेवण्यात आली त्यानंतर जयपाल सिंह मुंडा देशात आदिवासींची बुलंद आवाज म्हणून नावारूपाला आले 🙏 जय आदिवासी मित्रांनो या लेखा तितकाच जेवढी काही माहिती आपल्या समाजकार्य मधून आणि क्रांतिकारकांची मिळेल त्या अनुषंगाने एक नवीन नवीन ब्लॉग तयार करून पोस्ट करतोय कारण आपल्या आदिवासी समाजाला आपल्या आदिवासी क्रांतिकारक समाजसुधारक यांच्याबाबत माहिती असणे खूप गरजेचे आहे आदिवासी समाजाला जनजागृतीसाठी असणारा हा छोटा खाणी प्रयत्न🙏 जय आदिवासी🙏 जय बिरसा 🙏जय भीम 🙏
सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५
खैरलांझी हत्याकांड 29 सप्टेंबर काळा दिवस 🙏
२९ सप्टेंबर २००६
#खैरलांजी_हत्याकांड_काळा_दिवस
खैरलांजी हत्याकांड २९ सप्टेंबर २००६ रोजी महाराष्ट्रातल्या भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील खैरलांजी गावात घडले. या दिवशी गावातल्या एका कुटुंबातल्या चार जणांची सायंकाळच्या सुमारास गावातल्याच काही लोकांकडून अमानुष हत्या करण्यात आली. या हत्याकांडाचे पडसाद विधिमंडळा पासून संसदे पर्यंत उमटले. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनेची दखल घेण्यात आली. घटनेनंतर राज्यभर आंदोलनांचे लोण उसळले. घटने नंतर सुमारे सात महिन्यांनी दाखल झालेल्या आणि पंधरा महिने चाललेल्या खटल्याचा निकाल १५ सप्टेंबर २००८ रोजी लागला. न्यायालयाने आठ आरोपींना दोषी ठरवले. या हत्याकांडाचे एकमेव साक्षीदार भैयालाल भोतमांगे यांचे २० जानेवारी २०१७ रोजी हृदयविकाराने निधन झाले. या घटनेने राज्यातील कायदा व सुव्यवस्था, तपास यंत्रणा तसेच दलित अत्याचार प्रतिबंधक अधिनियमातील त्रुटी यांसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. या घटनेचा महत्त्वपूर्ण परिणाम म्हणजे राज्य शासनाने १६ सप्टेंबर २००८ रोजी दलित अत्याचार प्रतिबंधक अधिनियमातील त्रुटी दूर करण्यासाठी एक समिती स्थापन केली.
निकाल:
गुन्हेगारांनी हा गुन्हा करताना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे हे दलित हत्याकांड नसल्याचा निकाल न्यायालयाने दिला. १५ सप्टेंबर २००८ रोजी भंडारा न्यायालयाने दिलेल्या निकाला नुसार ११ पैकी ८ आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सिद्ध झाला आहे. न्यायालयाने पुढील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली - गोपाल सक्रू बिंजेवार, शिशुपाल धांडे. पुढील आरोपींना २५ वर्षाच्या जन्मपेठेची शिक्षा सुनावली - सक्रू बिंजेवार,शत्रुघ्न धांडे,विश्वनाथ धांडे,प्रभाकर मंडलेकर,जगदीश मंडलेकर,रामू धांडे. पुराव्या अभावी पुढील ३ आरोपींना सोडून दिले - महिपाल धांडे,धर्मपाल धांडे,पुरुषोत्तम तितीरमारे. सामाजिक वास्तव ढवळून काढणाऱ्या या घटनेमुळे अनेक जण मूलभूत चिंतन व त्यावर आधारित कविता, नाटक, प्रदीर्घ लेख लिहिण्यास प्रवृत्त झाले.
साप्ताहिक विवेक मधील संजय सोनवणी यांचा लेख.
‘दृश्यांचा ढोबळ समुद्र’ काव्यसंग्रहातील ‘लव्ह इन द टाइम ऑफ खैरलांजी’ ही प्रज्ञा पवार यांची कविता.
धादांत खैरलांजी - नाटक, लेखिका प्रज्ञा पवार
👉 👉 पोलीस स्टेशनच्या बाबतीत सर्वांच्या जीवनात उपयोगि पडणारे अतिशय मोलाची माहिती 👍
👉👉 नमस्कार आज आपण पुन्हा ब्लॉगिंग चालू केलेले आहे या ब्लॉगिंग मध्ये आज अतिशय छान असा लेख घेऊन आलो आहे या लेखात असलेली माहिती सर्वांसाठीच ख...
-
नवरात्राच्या पार्श्वभूमीवर पारधी बांधवांचे रक्ताने लिहिलेले पत्र : गायरान जमिनीच्या मागणीसाठी सरन्यायाधीशांना आवाहन ✒️(समाज प्रतिनिधी :अनिल ...
-
👉 नमस्कार सर्व मित्रांना सर्वात प्रथम 🙏जय आदिवासी 🙏जय जोहार 🙏 क्रांतिकारी जय भिम🙏 जय लहुजी🙏 जय शिवराय🙏 चला तर मित्रांनो आज आपण घेऊन ...
-
खूप चांगला हा प्रश्न 🤔 “गावठाण”, “पांदण रस्ता”, “हद्द”, “रुंदी–लांबी” या संकल्पना सामान्य जनतेला समजावून सांगणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाल...





