नवीन योजना, नविन महिती, ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी कसे काम करावे आणि लेखी तक्रार अर्ज. आदिवासी क्रांतिकारक यांची महिती, समाज जनजागृती, ग्रामपंचायत मधील महिती घरकुल विभागातील कागद पत्रे, महिती आणि खेळ तसेच कायद्याची अमलबजावणीसाठी कसे काम करावे सर्व अर्ज प्रक्रिया, निवेदन तयार करणे संदर्भ आणि बरेच काही
गुरुवार, २ ऑक्टोबर, २०२५
🙏🙏(TRTI )👉 पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 2025 26 करिता ऑनलाइन अर्ज सादर करण्याबाबत महत्त्वाच्या सूचना
बुधवार, १ ऑक्टोबर, २०२५
🙏 नंदुरबार 🙏जय दादा वळवी प्रकरणात माजी मंत्री के.सी. पाडवी साहेबांनी उचचली तातडीने सकारात्मक पावले🙏
🚩 माझ्या नंदुरबार जिल्ह्यातील तमाम आदिवासी बांधवांना, माता-भगिनींना आणि युवा शक्तीला माझा सस्नेह जय जोहार 🚩
आदिवासी संघटनेतील तरुण जय वळवीच्या अमानुष हत्येने आपणा सर्वांच्या मनावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या आत्म्यास शांती लाभो, ही प्रार्थना. या क्रूर कृत्याचा मी आधीच जाहीर निषेध करीत त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले आहेच त्यासोबत यातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी ठामपणे लढत आहे.
२४ तारखेला जय वळवीला न्याय मिळवून देण्यासाठी समाज मोठ्या संख्येने एकत्र आला आणि शांततेत मूक मोर्चा काढला. मात्र काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक गोंधळ घालून आपल्या शांततेच्या आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला. ही कृती दुर्दैवी असून त्यांचा आपल्या खऱ्या उद्देशाशी काहीही संबंध नाही.
या घटनेनंतर काही निरपराध तरुणांना पोलिसांनी अटक केली. कोणताही निरपराध तरुण भरडला जाऊ नये यासाठी मी आणि माजी मंत्री अँड के सी पाडवी साहेबानी तातडीने पाऊले आधीच उचलली आहेत, गृह खात्याला निवेदन दिले असून, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याशी सातत्याने संपर्कात आहेच आज पुन्हा नंदुरबार पोलिस अधीक्षक यांच्याशी भेटून अटक झालेल्या निर्दोष तरुणांची सुटका व्हावी या संबंधित भेट घेत सर्व माहिती घेतली आहे.
याशिवाय, अटक झालेल्या तरुणांच्या सुटकेसाठी कायदेशीर लढा सुरू केला आहे. वरिष्ठ वकील तसेच समाजातील वकिलांमार्फत माझी टीम यावर काम करत आहे. लवकरच आपल्या बांधवांची सुटका होईल असा विश्वास देतो.
बंधू-भगिनींनो,
या काळात काही लोक या दुर्दैवी घटनेचं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझं स्पष्ट आवाहन आहे – कुठल्याही राजकारणाचा बळी पडू नका. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि सोशल मीडियावर समाजाला हानी होईल अशा गोष्टी टाकू नका.
आजची वेळ आहे एकजुटीने, शांततेने आणि कायद्याच्या मार्गाने उभे राहण्याची. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या न्याय आणि संविधानाच्या शक्तीवर आपला विश्वास ठेवा.
जय वळवीला न्याय मिळवण्यासाठी, दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आपण सारे एकत्र आहोत.
मी आणि के सी पाडवी साहेब माझ्या समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.
🙏जय जोहार! जय संविधान! धन्यवाद. 🙏
रेल्वेने दिक्षा भूमीला जाणाऱ्या अनुयायांना रोखू नका 👉
✅दरवर्षी लाखो बौद्ध अनुयायी रेल्वेने दीक्षाभूमीला जातात. याही वर्षी प्रवासाची सुरुवात झालेली आहे. परंतु आजच आमच्याकडे अत्यंत गंभीर तक्रार आली की औरंगाबाद रेल्वे स्टेशन परिसरात काही तरुणांना रेल्वे पोलिसांकडून मारहाण करण्यात आली असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे तरुण अतिशय भयभीत होऊन सांगत होते की — “आम्ही दीक्षाभूमीला निघालो होतो, मात्र आम्हाला अन्यायाने अडवण्यात आले आणि ताब्यात घेण्यात आलं.”
राज्य सरकारला माहीत आहे की दरवर्षी पाच दिवस रेल्वेने बौद्ध अनुयायी मोफत प्रवास करतात. मग अशा परिस्थितीत रेल्वे पोलिसांकडून त्रास दिला जाणं, मारहाण केली जाणं आणि अडवणूक करणं हा एक उघड उघड छळ आहे. याचा निषेध आम्ही तीव्र शब्दांत करतो.
सरकारने तातडीने रेल्वे विभागाला स्पष्ट आदेश द्यावेत की दीक्षाभूमीकडे जाणाऱ्या कोणत्याही बौद्ध अनुयायाला कुठेही अडवले जाणार नाही, मारहाण केली जाणार नाही, त्रास दिला जाणार नाही. जर यापुढे एकाही अनुयायाला रेल्वे पोलिसांकडून वा रेल्वे प्रशासनाकडून छळ झाला, तर त्याचे देशभरात तीव्र पडसाद उमटतील याची जबाबदारी राज्य सरकार व केंद्र सरकारवर असेल.
दीक्षाभूमीकडे जाणाऱ्या लाखो अनुयायांना सन्मानपूर्वक, चांगल्या पद्धतीने वागणूक देणे ही सरकारची जबाबदारी आहे. याकडे आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. कुणालाही त्रास होऊ नये म्हणून तातडीने रेल्वे विभागाला आदेश द्यावेत, अशी आमची ठाम मागणी आहे.
#AllindiaPantherSena
मंगळवार, ३० सप्टेंबर, २०२५
🙏👉 भारतीय आदिवासींचे सर्वोच्च नेता जयपाल सिंह मुंडा🙏
भारतीय आदिवासींचे आणि झारखंड आंदोलनाचे एक सर्वोच्च नेता आणि एक राजनीति तज्ञ पत्रकार, लेखक, संपादक, आणि मे 1925 मध्ये ऑक्सफोर्ड ब्लू किताब मिळवलेले आणि हॉकीचे एक मात्र आंतरराष्ट्रीय खिलाडी होते त्यांच्या कॅप्टनी च्या काळात मे 1928 चे ऑलिंपिक मध्ये भारताने पहिले सुवर्णपदक मिळवले होते आणि विशेष म्हणजे भारतामध्ये जयपाल सिंह मुंडा सर्वोच्च सरकारी पदावरती होते जयपाल सिंह मुंडा छोटे नागपूर ( आताचे झारखंड राज्य ) मुंडा जनजातीचे होते मिशनरीज यांच्या मदतीने ते ऑक्सफर्ड सेंट जॉन्स कॉलेजमध्ये शिकण्यासाठी गेले होते ते असामान्य रूपाने खूप प्रतिभाषा आली होती त्यांना शिक्षणाच्या व्यतिरिक्त खेळकुद खूप आवड होती त्यामध्ये हॉकी त्यांचा प्रमुख खेळ होता त्याशिवाय त्यांनी वाद विवादात नाव खूप अलौकिक केले होते त्यांची निवड भारतीय सिविल सेवा (i.c. s ) मध्ये निवड झाली होती आयसीएस चे प्रशिक्षण त्यांना खूप प्रभावीत करण्यासारखे होते कारण ते मे 1928 साली एम्सट रडम मध्ये ऑलम्पिक हॉकी मध्ये पहिले सुवर्णपदक मिळवणारी भारतीय टीमचे कॅप्टन च्या रूपात नेदरलँडला गेले आणि नेदरलँड वरून वापस येत असताना त्यांना आयसीएस चे एक वर्षाचे प्रशिक्षण पुन्हा घेण्यास सांगितले गेले, अशातच त्यांनी आयसीएस चे पुन्हा प्रशिक्षण घेण्यास नकार दिला त्यांनी बिहारच्या शिक्षा जगात योगदान देण्यासाठी त्या वेळचे तात्कालीन बिहार काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना या संबंधात पत्र लिहिले. परंतु त्यांना कुठले ही सकारात्मक उत्तर मिळाले नाही 1938 साली जयपाल सिंह मुंडा यांनी पटना आणि रांची हा दौरा केला त्या दौऱ्यादरम्यान आदिवासींची खराब परिस्थिती बघून त्यांनी राजनीतीत यायचा विचार केला. जानेवारी 1938 मध्ये त्यांनी आदिवासी महासभेचे अध्यक्षपद ग्रहण केले त्यावेळी बिहार पासून एक वेगळे झारखंड स्थापन करण्याची मागणी ठेवण्यात आली त्यानंतर जयपाल सिंह मुंडा देशात आदिवासींची बुलंद आवाज म्हणून नावारूपाला आले 🙏 जय आदिवासी मित्रांनो या लेखा तितकाच जेवढी काही माहिती आपल्या समाजकार्य मधून आणि क्रांतिकारकांची मिळेल त्या अनुषंगाने एक नवीन नवीन ब्लॉग तयार करून पोस्ट करतोय कारण आपल्या आदिवासी समाजाला आपल्या आदिवासी क्रांतिकारक समाजसुधारक यांच्याबाबत माहिती असणे खूप गरजेचे आहे आदिवासी समाजाला जनजागृतीसाठी असणारा हा छोटा खाणी प्रयत्न🙏 जय आदिवासी🙏 जय बिरसा 🙏जय भीम 🙏
सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५
खैरलांझी हत्याकांड 29 सप्टेंबर काळा दिवस 🙏
२९ सप्टेंबर २००६
#खैरलांजी_हत्याकांड_काळा_दिवस
खैरलांजी हत्याकांड २९ सप्टेंबर २००६ रोजी महाराष्ट्रातल्या भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील खैरलांजी गावात घडले. या दिवशी गावातल्या एका कुटुंबातल्या चार जणांची सायंकाळच्या सुमारास गावातल्याच काही लोकांकडून अमानुष हत्या करण्यात आली. या हत्याकांडाचे पडसाद विधिमंडळा पासून संसदे पर्यंत उमटले. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनेची दखल घेण्यात आली. घटनेनंतर राज्यभर आंदोलनांचे लोण उसळले. घटने नंतर सुमारे सात महिन्यांनी दाखल झालेल्या आणि पंधरा महिने चाललेल्या खटल्याचा निकाल १५ सप्टेंबर २००८ रोजी लागला. न्यायालयाने आठ आरोपींना दोषी ठरवले. या हत्याकांडाचे एकमेव साक्षीदार भैयालाल भोतमांगे यांचे २० जानेवारी २०१७ रोजी हृदयविकाराने निधन झाले. या घटनेने राज्यातील कायदा व सुव्यवस्था, तपास यंत्रणा तसेच दलित अत्याचार प्रतिबंधक अधिनियमातील त्रुटी यांसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. या घटनेचा महत्त्वपूर्ण परिणाम म्हणजे राज्य शासनाने १६ सप्टेंबर २००८ रोजी दलित अत्याचार प्रतिबंधक अधिनियमातील त्रुटी दूर करण्यासाठी एक समिती स्थापन केली.
निकाल:
गुन्हेगारांनी हा गुन्हा करताना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे हे दलित हत्याकांड नसल्याचा निकाल न्यायालयाने दिला. १५ सप्टेंबर २००८ रोजी भंडारा न्यायालयाने दिलेल्या निकाला नुसार ११ पैकी ८ आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सिद्ध झाला आहे. न्यायालयाने पुढील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली - गोपाल सक्रू बिंजेवार, शिशुपाल धांडे. पुढील आरोपींना २५ वर्षाच्या जन्मपेठेची शिक्षा सुनावली - सक्रू बिंजेवार,शत्रुघ्न धांडे,विश्वनाथ धांडे,प्रभाकर मंडलेकर,जगदीश मंडलेकर,रामू धांडे. पुराव्या अभावी पुढील ३ आरोपींना सोडून दिले - महिपाल धांडे,धर्मपाल धांडे,पुरुषोत्तम तितीरमारे. सामाजिक वास्तव ढवळून काढणाऱ्या या घटनेमुळे अनेक जण मूलभूत चिंतन व त्यावर आधारित कविता, नाटक, प्रदीर्घ लेख लिहिण्यास प्रवृत्त झाले.
साप्ताहिक विवेक मधील संजय सोनवणी यांचा लेख.
‘दृश्यांचा ढोबळ समुद्र’ काव्यसंग्रहातील ‘लव्ह इन द टाइम ऑफ खैरलांजी’ ही प्रज्ञा पवार यांची कविता.
धादांत खैरलांजी - नाटक, लेखिका प्रज्ञा पवार
रविवार, २८ सप्टेंबर, २०२५
फुलंब्री येथील घटना 🙏👌
सर्वांना जय आदिवासी मित्रांनो आज दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी फुलंब्री पोलीस स्टेशन येथे तसेच पोखरी गावातील एक घटना घडली होती अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडता घडता या ठिकाणी वाचलेला आहे कारण आपल्या आदिवासी समाजाने सतत सावधानी बाळगली पाहिजे कारण की गाव पातळीवर काही बांडगुळ माजलेल्या पद्धतीने वर्तवणूक करतात अशा बांडगुळांना वेळीच धडा शिकवला नाहीत तर भविष्यात आपल्या समाजाला खूप मोठ्या प्रकरणाला तोंड द्यावे लागू शकते असेच एक प्रकरण पोखरी या गावातील होते तिथे आदिवासी समाजाची अल्पवयीन मुलगी नामे रेणुका सोपान हटकर गेल्या 20 ते 18 वर्षांपूर्वीपासून तिचं कुटुंब प्रक्रिया गावात वास्तव्यास आहे कालच्या पावसाचा आणि वातावरणाचा फायदा घेत तेथील आरोपी इसम व त्याचा भाऊ यांनी त्या मुलीला किडनॅप केलं अक्षरशः एक ते दीड तास पूर्ण गावभर शोधून देखील ती मुलगी मिळाली नाही परंतु त्यांच्या शेजारीच राहत असलेल्या एका घरी तिच्या भावाला आणि मेव्हण्याला तिची चाहूल लागता त्यांनी त्या मुलीला सुखरूप बाहेर काढले या प्रकरणादरम्यान आदिवासी जमात विकास संस्थेचे धडाकेचे कार्यकर्ते संतोष भाऊ गायकवाड यांनी आज सकाळी पोलीस स्टेशनला धाव घेतली व त्या अनुषंगाने आम्हाला सकाळी आठ वाजता फोन करण्यात आला होता फोन आल्यानंतर आम्ही एक ते दीड तासात आमचं काम आवरून त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला आणि पोहोचलो देखील परंतु त्या दरम्यानच काल रात्री झालेल्या पावसामुळे खूप काही ठिकाणी रस्ता रहदारी विस्कळीत झालेली होती त्यामुळे कालांतराने आम्हाला थोडा उशीर झाला परंतु आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो त्या प्रकरणाची चौकशी केली चौकशी दरम्यान असे निदर्शनास आले की आपल्या आदिवासी समाजाच्या माणसांनी देखील आपल्या लेकरा बाळावर लक्ष दिलं पाहिजे कारण की आपले दैनंदिन काम आयुष्यभर आपल्या पुढे पडलेले असतात त्यात आपल्या समाजाच्या वाटेला आलेली दारिद्र्य यातून पर्याय काढत आपण आपल्या लेकरा बाळांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे चला तर मुद्द्यावर येतो फुलंब्री पोलीस स्टेशनला गेल्यानंतर राठोड साहेब यांच्याशी भेट घेऊन त्यांच्या सोबत चर्चा करण्यात आली व संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्याचं प्रोसिजर चालू करण्यात आला पोखरी गावातील सरपंच यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आदिवासी समाजाला सहकार्य देखील केलं अवघ्या अर्ध्या ते एक तासात आरोपीला त्या ठिकाणी हजर करण्यात आला आरोपी व त्याच्या भावाला त्या ठिकाणी आणल्याच्या नंतर पोलिसांनी चांगल्या पद्धतीने त्याला चोप देऊन त्याचे स्वागत केले परंतु सांगायचं तात्पर्य इतकच की आपल्या आदिवासी समाजाने जागृत व्हावं कुणाच्याही रिकाम्या भूलथापाला बळी पडून आपल्या आयुष्याचं वाटोळं करून घेऊ नये त्या दरम्यान गावातील खूप मंडळी देखील तिथे जमा झाली त्या अनुषंगाने गाव पातळीवर तो प्रश्न तसेच आदिवासी जमात विकास संस्थेच्या माध्यमातून वेळीच त्या घटनेची दखल घेतल्या गेल्यामुळे त्या मुलीचे प्राण सुखरूप वाचले त्यामुळे मी माझ्या सर्व आदिवासी बांधवांनी भगिनींना विनंती करतो की रात्र ही वैऱ्याची आहे त्यामुळे आपण समाजात वावरताना आपले कान डोळे सदैव उघडे ठेवावेत आपल्या मुलांकडे विशेष लक्ष द्यावे ही नम्र विनंती 🙏... जय आदिवासी 🙏... जय भीम 🙏... जय शिवराय 🙏... जय लहुजी 🙏... यावेळी पोलीस स्टेशनला उपस्थित आदिवासी जमात विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किरण सखाराम बर्डे. 🙏 आदिवासी जमात विकास संस्थेचे सचिव 🙏. भाऊसाहेब सुखदेव बर्डे. 🙏 तसेच आदिवासी जमात विकास संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष भाऊ गायकवाड 🙏. तसेच आदिवासी जमात विकास संस्थेचे जिल्हा सचिव किसन भाऊ गायकवाड. तसेच आदिवासी समाजाचे सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते व गावातील ग्रामपंचायत चे सरपंच देखील उपस्थित होते 🙏...
शनिवार, २७ सप्टेंबर, २०२५
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर 🙏
जुलै 1942 मध्ये राष्ट्रीय सभा अर्थात काँग्रेसने भारत छोडोचा नारा दिला आणि आंदोलन पेटले. तत्कालीन ब्रिटिश प्राईम मिनिस्टर सर विस्टन चर्चिल हे त्यांच्या बेदरकार वृत्तीसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी तत्काल भारताच्या व्हाईसरॉयला टेलिग्राम केला आणि सांगितले काँग्रेस नेते गांधी, नेहरू ,पटेल, राजेंद्रप्रसाद सर्वांना अंदमान किंवा सेशेल्सच्या कारागृहात तात्काळ उचलून टाका....
बाबासाहेब त्यावेळेस व्हाईसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलचे सदस्य होते आणि त्यांच्यासोबत लोकमान्य टिळकांचे पट्टशिष्य आणि तत्कालीन काँग्रेसचे मोठे नेते लोकनायक डॉक्टर माधव श्रीधर अणे हे देखील कौन्सिल सदस्य होते... दिल्लीमधील कौन्सिल मीटिंगमध्ये जेव्हा व्हाईसरॉयने घोषणा केली की महात्मा गांधी, पंडित नेहरू ,सरदार पटेल ,बाबू राजेंद्र प्रसाद या सर्वांना अंदमान किंवा सेशेल्स जेलमध्ये पाठवण्यात येणार आणि हा निर्णय प्राईम मिनिस्टर चर्चिल यांचा आहे. तेव्हा या निर्णयाला विरोध करण्याची हिम्मत तिथे असणाऱ्या उच्चवर्णीय हिंदू , मुस्लिम, पारसी, ख्रिश्चन कुठल्याही सदस्यांची झाली नाही. आपल्या धैर्य आणि स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असणारे लोकनायक डॉक्टर माधव श्रीधर अणे यांनी देखील विरोध केला नाही, त्यांनी प्रस्तावाला संमती दर्शवली. या प्रस्तावाला फक्त आणि फक्त विरोध केला बाबासाहेबांनी आणि त्यांनी विरोध करताना सांगितले गांधी, नेहरू, सरदार पटेल, राजेंद्र प्रसाद हे काही कुणी खुनी नाहीत, गुन्हेगार नाही, ते जनतेचे नेते आहेत त्यामुळे त्यांना अंदमान किंवा सेशेल्स कारागृहात पाठवू नये. बाबासाहेबांच्या प्रखर विरोधामुळे ब्रिटिश सरकारने काँग्रेसच्या सर्व नेत्यांना अंदमानला न पाठवता अहमदनगर कारागृहात ठेवले
प्राईम मिनिस्टर विस्टन चर्चिल म्हणजे काय साधारण पंतप्रधान नव्हते. स्टॅलिन - रुझवेल्ट -चर्चिल या सर्व शक्तिमान जागतिक नेत्यांपैकी ते एक होते. दुसऱ्या महायुद्धाचे हिरो म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला होता आणि ब्रिटिश वसाहती मधील दडपशाहीसाठी ते प्रसिद्ध होते. स्वतःच्या देश बांधवांवर अडीच हजार वर्षे अन्याय अत्याचार करणारे इथले धार्मिक- राजकीय सामाजिक सत्ताधारी इंग्रज-तुर्क यांच्यासमोर मात्र नांगी टाकत
( यानंतर देखील भारतीय नेत्यांनी बाबासाहेबा विरुद्ध कारस्थान करणे काही थांबवले नाही )
एवढी उघड आणि स्पष्ट घटना ज्याची प्रत्येक ठिकाणी नोंद होणे गरजेचे आहे त्याची नोंद इथल्या कलम कसाई राजकीय तज्ज्ञांनी आणि इतिहासकाराने मुद्दाम घेतली नाही.
म्हणूनच .....Let's Write Our Own History
👉 👉 पोलीस स्टेशनच्या बाबतीत सर्वांच्या जीवनात उपयोगि पडणारे अतिशय मोलाची माहिती 👍
👉👉 नमस्कार आज आपण पुन्हा ब्लॉगिंग चालू केलेले आहे या ब्लॉगिंग मध्ये आज अतिशय छान असा लेख घेऊन आलो आहे या लेखात असलेली माहिती सर्वांसाठीच ख...
-
नवरात्राच्या पार्श्वभूमीवर पारधी बांधवांचे रक्ताने लिहिलेले पत्र : गायरान जमिनीच्या मागणीसाठी सरन्यायाधीशांना आवाहन ✒️(समाज प्रतिनिधी :अनिल ...
-
👉 नमस्कार सर्व मित्रांना सर्वात प्रथम 🙏जय आदिवासी 🙏जय जोहार 🙏 क्रांतिकारी जय भिम🙏 जय लहुजी🙏 जय शिवराय🙏 चला तर मित्रांनो आज आपण घेऊन ...
-
खूप चांगला हा प्रश्न 🤔 “गावठाण”, “पांदण रस्ता”, “हद्द”, “रुंदी–लांबी” या संकल्पना सामान्य जनतेला समजावून सांगणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाल...







