https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-9617618308777656 Kiran Barde new tricks and update

रविवार, १३ एप्रिल, २०२५

आदिवासी भिल समाज अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित?

नमस्कार मित्रांनो मी आदिवासी जमात विकास परिषद महाराष्ट्र राज्य संस्थेचा संस्थापक अध्यक्ष किरण सखाराम बर्डे व माझ्यासोबत माझे शिष्ट मंडळ गंगापूर तालुक्यातील तसेच छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील बऱ्याचश्या गावात खेड्यापाड्यात वाडा वस्ती तांडा या ठिकाणी आदिवासी जमात विकास संस्थेच्या मार्फत व्हिजिट करण्यात आले त्या ठिकाणी अक्षरशा परिस्थिती बघता येईना इतकी बिकट अवस्था होती प्रत्येक गाव पातळीवर आदिवासी समाजाला मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले जातात काही ठिकाणी कागदपत्राचा अभाव आहे काही ठिकाणी जाणून-बुजून त्यांचे नैतिक अधिकार डावलेले आहेत तर काही ठिकाणी आदिवासी समाजाला पिण्याच्या पाण्याची घरकुलाची तसेच रस्ता शाळा अंगणवाडी अशा विविध सुविधांपासून वंचित ठेवण्यात आलेले आहे गेल्या चार-पाच महिन्यापूर्वी मी व माझे सहकारी मित्र व संस्थेचे पदाधिकारी गावागावात झाली असता 100% गावातून किमान 70 टक्के गावात आदिवासी समाजाच्या दफनभूमीवर अतिक्रमण झालेले आहे असा चौकशी अहवाल आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे त्यादरम्यान लवकरच एक मोठी मोहीम तयार करण्याचे नियोजन आदिवासी जमात विकास संस्थेच्या वतीने करण्यात येईल तसेच यानंतरचा पुढील भाग व पुढील व्हिडिओ गावातील लवकरच पोस्ट करण्यात येईल 🙏🙏🙏🙏जय भीम जय आदिवासी जय शिवराय जय लहुजी.....

धोकेबाज मैत्रीण

याच पार्श्वभूमीवर, पुण्यात घडलेला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्यात एका अल्पवयीन बांगलादेशी मुलीला फसवून बुधवार पेठेतील वेश्याव्यवसायात विकण्यात आले. या घटनेतून पुन्हा एकदा या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले जात आहे. बुधवार पेठेतून ती थेट पोलिस स्टेशनला गेली, अल्पवयीन मुलीने सांगितलेल्या गोष्टीने पोलिसांना देखील धक्का बसला आहे.

पोलिसांनी या प्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीच्या सोबत पुण्यात आली होती. मैत्रिणीने नोकरी आणि फिरण्याचे आमिष दाखवून तिला फसवून घात केला. बांगलादेशातून नदीमार्गे बेकायदेशीरपणे तिला भारतात आणलं गेलं. सुरुवातीला त्या दोघी भोसरी भागात काही दिवसांसाठी राहिल्या. त्यानंतर तिच्या मैत्रिणीने तिला बुधवार पेठ परिसरातील एका कोठेवालीकडे ३ लाख रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार तिला समजला तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली.

तिला विकल्यानंतर संबंधित महिलेनं पीडित मुलीला धमकी दिली की, “तू बांगलादेशी आहेस, तुझ्यावर पोलिस कारवाई करतील.” या भीतीपोटी तिला एका खोलीत कोंडून ठेवण्यात आलं, तिला वेश्या व्यवसाय करण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. तेथे संबंधित महिलेनं पीडित मुलीला धमकी दिली की, तू बांगलादेशी आहेस, तुझ्यावर पोलिस कारवाई करतील. या भीतीपोटी तिला एका खोलीत कोंडून ठेवण्यात आलं आणि वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलं गेलं.

पाच महिने अत्याचार सहन केले, त्यानंतर तिने योग्य संधी आणि वेळ मिळताच 7 एप्रिल रोजी तिथून पळ काढला. बस आणि रिक्षामार्गे ती हडपसरपर्यंत पोहोचली आणि तेथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हडपसर पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत ते फरासखाना पोलिसांकडे प्रकरण वर्ग केलं. या प्रकरणी पोलिसांनी पाच महिलांवर गुन्हा दाखल केला असून, एका महिलेला अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे करत   🙏     .,✍️✍️✍️✍️ आदिवासी जमात विकास परिषद महाराष्ट्र राज्य...📌 संस्थापक अध्यक्ष. किरण सखाराम बर्डे..

आदिवासी दफन भूमी चोरीला गेली भाग 14

नमस्कार मित्रांनो आज दिनांक 13/ 4/ 👉2025 रोजी आपण आदिवासी दफनभूमी चोरीला गेले भाग 14 बघणार आहोत बघणार आहोत आपल्या आदिवासी दफनभूमीच्या प्रकरणांमध्ये या महिन्यातील तारीख असून या महिन्याच्या तारखेला देखील आपल्याला पुढील तारीखच मिळणार आहे कारण ✍️✍️✍️✍️✍️न्यायालयाच्या कामाचा प्रोसेस सध्या फक्त साक्षीपुरावाअसलेले प्रकरण न्यायालयात चालू आहेत काही सुट्ट्या लागायचे चान्सेस असून आपल्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये मे मध्ये आपल्या प्रकरणाला गती येऊ शकते त्या अनुषंगाने आपण आपले सदैव प्रयत्न करतोय तरी दावा दुरुस्ती मध्ये जे काही करेक्शन आहे ते करेक्शन लवकरात लवकर दूर करून व कागदपत्र पडताळणी करून नवीन फ्रेश चांगल्या पद्धतीचा मजकूर तयार करण्यात येईल त्या अनुषंगाने न्यायालयीन कामकाजाला पुन्हा गती मिळू शकते त्यापूर्वी लेख टाकायला आज थोडा उशीर झाला मित्रांनो त्याबद्दल मनापासून माफी असावी चला तर आता आपण मुद्द्यावर खूप साडे तोड प्रयत्न चालू आहेत👫👫👬👬👭 आदिवासी समाजापासून तो दफनभूमीचा पट्टा हिसकावून घेण्यासाठी परंतु काही गोष्टी जमीन दूषित मेंदूच्या लोकांच्या बुडाखाली खूपच भयंकर आग लागलेली असून पोट दुखायचा  देखील चालू झालेले आहेत त्यामुळे आपण आपले प्रयत्न सदैव चालूच ठेवणार तसेच आदिवासी दफन भूमीच्या या मुद्द्यावर एक खूप मोठा परिवर्तन सर्वांना लवकरच बघण्यासाठी मिळणार आहे त्यावेळेस या काही 😡😡जातिवाचक समाजकंटकांचा नक्कीच बंदोबस्त करण्याची तयारी आपण करणार आहोत कारण यांना कायदा हा घरचा भाजीपाला वाटू लागलेला असून बिना यांच्या बुडाला चटका बसल्याशिवाय हे यांची🕵️ सरळ आई घालणार नाहीत त्यामुळे आपण कोणाला घाबरायचं कारण नसून मी व माझे सहकारी मित्र आमचे गोपनीय पद्धतीची कालच्या तारखेला एक मीटिंग झालेली असून महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली त्यावेळेस एक फायनल डिसिजन घेण्यात आले की जे कार्य गोपनीय पद्धतीने सुरू आहे ते असेच सुरू ठेवायचे आपलं नियोजन कुणालाही कधीही कळता कामा नये कारण खूप👉 डोम कावळेटपून आहेत आपल्या नियोजनावरती परंतु आपण देखील साडे तोड प्रमाणे प्रयत्न करणार आहोत की आपलं नियोजन कुणाला कळता कामा नये कारण ते मानतात नाकारता भेदी लंका डाहे त्यामुळे आपल्यापाशी असलेले सर्व कागदपत्र याची एक संचिका नीती आयोग तसेच🖊️🖊️ एक संचिका नालसा डिपार्टमेंटला लवकरच पोहोच करण्यात येणार असून सदरील लोकांवर 📚🖊️ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे प्रयत्न देखील चालू आहेत चला तर मित्रांनो आजच्या लेखात इतकच सर्वांना क्रांतिकारी 🙏जय भिम🙏 जय शिवराय 🙏जय आदिवासी 🙏जय एकलव्य 🙏🙏🙏

शनिवार, १२ एप्रिल, २०२५

माहिती कामाची


नमस्कार शेतकरी बांधवांनो ग्रामीण भागासाठी शेतकरी बंधूंना शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध उत्पन्नासाठी दुग्धजन्य जनावरांचा समावेश दैनंदिन जीवनात असणं खूप महत्त्वाचा आहे आणि ज्या शेतकरी बांधवांकडे दुग्धजन्य जाणारे आहेत त्यांच्यासाठी शासनाची गोठा योजना चालू झालेली आहे तरी शेतकरी बांधवांनी आपल्या ग्रामपंचायतला आपल्या ग्रामपंचायत अधिकारी यांच्या शेतात काळ संपर्क साधून नियमावलीनुसार कागदपत्र सादर करून आपला अर्ज लवकरात लवकर दाखल करावा

आदिवासी दफन भूमी चोरीला गेले भाग 13



🙏🙏नमस्कार मित्रांनो बऱ्याच खूप दिवसानंतर आपण पुन्हा 👉ब्लॉगिंग वर उपस्थित झालो आहे खूप दिवसांनी ही पोस्ट करतो त्याबद्दल मनापासून सर्वांचे माफी 🙏मागतो दिनांक 👉👉👉29/9/2023 रोजी आपण आदिवासी दफनभूमी चोरीला गेली भाग-12 बघितलेला होता त्यानंतर आदिवासी दफनभूमी चोरीला गेली भाग ✍️13 बघणार आहोत त्यापूर्वी पुन्हा एकदा सर्वांचे माफी मागतो की खूप दिवसानंतर भाग 13 आणण्यासाठी खूप वेळ लागला त्याबद्दल माफी असावी त्याचे कारण असं होतं की न्यायालयीन कामात येणारा अडथळा व काही🤷 कागदपत्राचे पडताळणी पूर्तता करण्यासाठी किंवा काही कागदपत्र जमा करण्यासाठी झालेला हा विलंब आहे आता सर्व काही सगळं व्यवस्थित करण्याचा व चालू करण्याचा प्रयत्न देखील चालू झालेला आहे त्यापूर्वी सर्व आदिवासी मित्रांना व मित्रांना एक गोष्ट आवर्जून सांगू वाटते की आपण सर्वांनी आपल्या गाव पातळीवर आपल्या समाजाने व इतर कुठलाही समाज असो त्यांनी सज्ज व सावधगिरी बाळगली पाहिजे कारण शक्यतो ज्या समाजामध्ये एक की नसते त्या समाजात गावात राजकारण खूप मोठ्या प्रमाणात चालतं व इतर काही समाजकंटक दूषित बुद्धीचे दूषित मेंदूचे जे लोक आहेत ते वारंवार गरिबांचा आदिवासींचा व गरीब कुटुंबाची आर्थिक पिळवणूक छळ करतात तर चला मित्रांनो आपण आदिवासी दफनभूमी चोरीला गेली भाग 13 सुरू करूयात न्यायालयीन कामकाजामध्ये आपल्या आदिवासी दफन भूमीच्या खटल्यामध्ये काही 🙅अमेंडमेंट होणं महत्त्वाचं होतं पण काही कालांतराने त्यामध्ये करेक्शन असल्यामुळे तो भाग पेंडिंग पडलेला आहे त्या पद्धतीने 🕵️🕵️🕵️वकील साहेबांची कार्यपद्धत चालू असून त्यामध्ये थोडा वेळ येत आहे तसेच आता दावा दुरुस्तीचे देखिल प्रोसिजर चालू करण्यात आलेला आहे त्या दरम्यान इमामपूर मध्ये आदिवासी समाजाची महिला लक्ष्मीबाई बाबुराव दळ वे यांचा अंत्यविधी दिनांक 😢😢1 ऑक्टोंबर 2024 रोजी पुन्हा त्या दफन भूमी मध्येच झालेला असून त्यांच्या दफन भूमी व अंतविधी झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी मातीसारखी एक घोर तयार करण्यात आली होती ती घोर तयार झाल्यानंतर दहा ते बारा दिवस सगळं सर्व व्यवस्थित होतं ज्या ठिकाणी आम्ही अंत्यविधी करण्यासाठी गेलो होतो त्या ठिकाणी कपाशी लावलेली होती मी व माझ्या सहकारी मित्रांनी आम्ही🥷🥷🥷🥷 👭👬👫पूर्ण दीड दोन गुंठा कपाशी तोडून त्या ठिकाणी अंत्यविधीसाठी जागा केली तसेच आम्हाला रस्त्याची देखील खूप मोठ्या प्रमाणावर अडचण येत होती त्यामुळे जुन्या रस्त्याच्या ठिकाणी नाली खांदून ठेवली होती जेसीबीच्या साह्याने आणि नवीन रस्ता आम्हाला लवकर काही सापडत नव्हता त्यामुळे खूप विचार करून आम्ही गावाच्या गावठाण रस्त्यातून रस्ता तयार करण्याचे ठरवले अक्षरशा मित्रांनो सांगायचा अनुभव असा की खूप वेड्याबाबळी गवत काटे काढून आम्ही पंधराशे ते सोळाशे मीटर रस्ता त्या ठिकाणी केला रस्ता झाल्याच्या नंतर काही दूषित मेंदूच्या लोक यामध्ये  अडथळा अडचण आणण्याचा प्रयत्न चालू होता ते म्हणू लागले की अंत्यविधी हा चुकीच्या पद्धतीने होत आहे आणि अंत्यविधीसाठी प्रेत हे तुम्ही चुकीच्या रस्त्याने नेत आहे काही समजदार चांगला सल्ला देत होते तर काहींना त्या गोष्टी कुठेतरी रुजू होत नव्हत्या काही समाजकंटकांच्या बुडाखाली तर मोकार आग लागली होती कारण त्यांना त्या ठिकाणी अंत्यविधी होऊन द्यायचा नव्हता परंतु आम्ही देखील पूर्ण निश्चय केला होता की अंत्यविधी होणार तर आपल्या जुन्या दफन भूमी मध्येच आणि आम्हाला तो तिथेच करायचा होता आमचं पूर्ण फिक्स फायनल झालेलं होतं त्यामुळे त्या ठिकाणी रस्ता करून आम्ही लक्ष्मीबाई बाबुराव दळवी यांचा अंत्यविधी त्या ठिकाणी नेण्यास सुरुवात केली संध्याकाळच्या मला साडेआठ ते पावणे नऊ वाजले असतील अक्षर शाह इत की बिकट परिस्थिती होती की अंगावर काटे येण्यासारखं अनुभव होता तो माझ्यासाठी व माझ्या सहकाऱ्यांसाठी परंतु राज्यघटनेने दिलेल्या लोकशाही अधिकाराचा वापर करूनच आम्ही तो अंत्यविधी सुखरूप करू शकलो तसेच गावातील काही पंचकमिटी व मंडळी देखील खूप समजदार होते यांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य देखील केलं होतं उदाहरणार्थ आमचे गावातील तंटामुक्त अध्यक्ष तसेच ग्रामपंचायत मधील काही पंच आणि आपल्या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांनी देखील खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केले परंतु काही नास काय बुडाच्या लोकांच्या पोटात कळ येत होती त्यांना वारंवार वाटत होतं की त्या ठिकाणी अंत्यविधी होऊच नये त्यांनी खूप अडथळे आणण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी भांडण होईल अशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु अंत्यविधी हा यशस्वीरित्या पार पाडला त्या अंत्यविधीचे मी फोटोग्राफ देखील काढले आहेत मित्रांनो त्यातलाच एक फोटो आज टायटल मध्ये घेऊन मी तुम्हाला त्याच्या पोस्टमध्ये रूपांतर करून टाकत आहे तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचारास प्रतिबंध 1889 कायद्याअंतर्गत(ॲट्रॉसिटी 1889) नुसार सदरील लोकांवर गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न आणि प्रोसिजर सुद्धा सुरू आहे त्यामुळेच वातावरण पूर्ण शांत आणि सायलेंट करून घेतलेला आहे तसेच राष्ट्रीय सेवा विधी प्राधिकरण म्हणजे Nalsa. च्या सवलतीचा देखील आपण येथे आधार घेणार आहोत त्या अनुषंगाने त्यांच्या कार्यालयाशी संपर्क देखील झालेला आहे लवकरच या प्रकरणाला गती येईल आणि आपले प्रयत्न तर सदैव चालूच आहेत तसेच या प्रयत्नावरती आपण कायम असून आपण या प्रकरणावर पैठण तालुक्याचे उपविभागीय अधिकारी श्रीमती नीलम बाफना मॅडम यांच्याशी देखील चर्चा केलेली असून प्रोसिजर त्या अनुषंगाने चालू असून आपल्याला लवकरच सकारात्मक बदल यामध्ये घडून येताना दिसे ल चला तर मित्रांनो आज भाग 13 या ठिकाणी समाप्त करूया उद्या पुन्हा भाग 14 मध्ये भेटू यानंतर असा विलंब होणार नाही पुन्हा मनापासून सर्वांचे माफी मागतो✍️ जय आदिवासी✍️ जय भिम जय✍️ लहुजी जय शिवराय,🙏🙏🙏🙏🙏

रविवार, २८ जुलै, २०२४

शबरी घरकुल योजनेची सविस्तर माहिती व लागणारे कागदपत्र.

 

  • शबरी घरकुल मंजूर कसे करावे ? याची सविस्तर माहिती.                     नमस्कार मी आदिवासी जमात विकास परिषदेचा संस्थापक अध्यक्ष किरण सखाराम बर्डे आज आपण बघणार आहोत की शबरी घरकुल कशा पद्धतीने मंजूर करता येते यावर सविस्तर माहिती आपण बघणार आहोत बऱ्याच नागरिकांना शबरी घरकुल योजनेचा लाभ कसा घ्यावा ते कसे मंजूर होईल त्यासाठी कागदपत्र काय लागतील असे बरेचसे प्रश्न निर्माण होतात परंतु या सर्व  पद्धतीचा पाठपुरावा करता करता काही लाभार्थ्यांचे घरकुल रद्द होतात.  चला तर मग यासाठी लागणारे कागदपत्राची माहिती बघू 1). आधार कार्ड झेरॉक्स  2). बँक पासबुक झेरॉक्स 3) जात प्रमाणपत्र झेरॉक्स  4). उत्पन्न प्रमाणपत्र झेरॉक्स .5) विहित नमुन्यातील अर्ज. 6) पासपोर्ट साईज फोटो .7) ग्रामपंचायत ठराव असे वरीलपैकी सर्व कागदपत्र तयार करून विहित नमुन्यातील अर्ज भरून ग्रामपंचायत ठराव मध्ये नाव घेऊन आपल्या ग्रामपंचायत मधील संबंधित ग्रामसेवकांकडे आपण ते जमा करायचे आहे कागदपत्र व अर्ज जमा केल्याच्या नंतर संबंधित ग्रामसेवक यांची नैतिक जबाबदारी असते की त्यांनी संबंधित पंचायत समिती येथे पूर्ण शबरी घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांचा प्रस्ताव दाखल करायचा असतो पंचायत समिती येथे प्रस्ताव दाखल झाल्यानंतर पंचायत समिती येथे आपण दिलेल्या कागदपत्राची प्रस्तावाची पडताळणी होत असते म्हणजेच छाननी प्रक्रिया सुरू होत असते पडताळणी झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या विहित नमुन्यातील अर्ज म्हणजे पाहिली पुढील वरिष्ठ स्तरावरती पाठवण्यात येतात अशा पद्धतीने आपण शबरी घरकुल योजनेसाठी लागणारे कागदपत्रे आणि त्यासाठी कोणती पद्धत अवलंबायची आहे त्यानुसार याची सविस्तर माहिती बघितलेली आहे माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा…जय हिंद जय आदिवासी जय महाराष्ट्र जय शिवराय जय भिम……

बुधवार, ४ ऑक्टोबर, २०२३

आदिवासी दफन भूमी स्मशानभूमी चोरीला गेले भाग-12..


 नमस्कार मित्रांनो दिनांक 29/ 9 /2023 रोजी आपण दफन भूमी स्मशानभूमी चोरीला गेली भाग 11 बघितला होता त्यानंतर आज दिनांक 4/ 10 /2023 रोजी आपण आदिवासी दफनभूमी चोरीला गेली भाग बारा बघणार आहोत त्यापूर्वी तुमची सर्वांची क्षमा मागतो मित्रांनो की 29 ते चार तारखेपर्यंत खूप काही कामत व्यस्त असल्यामुळे मी भाग 12 तयार करू शकलो नाही  या चार दिवसाच्या दरम्यान मला थोडा उशीर झाला त्यामध्येच आपले माझ्यावरती असलेले आशीर्वाद व प्रेम दिसून आले कारण मला खूप जणांनी पर्सनली माझ्या फोन नंबर वर फोन करून विचारपूस झाली सदर पुढचा भाग तुम्ही केव्हा तयार करणार आहोत आणि मी यासाठी केलेला संघर्ष व समाजासाठी दिलेला वेळ याचं देखील बऱ्यापैकी कौतुक करण्यात आलं त्याबद्दल मी आपला सर्वांचा मनापासून ऋणी आहे आपले सदैव असेच प्रेम माझ्यावरती राहू द्या यापेक्षा करतो 🙏चला तर मित्रांनो आदिवासी दफनभूमी चोरीला गेली भाग १२ सुरू करूयात आज दिनांक 4/ 10 /2023 रोजी भाग 11 मध्ये आपण बघितले होते की प्रतिवादी साहेबराव प्रधान यांनी स्वतः 2011 मध्ये वादी बनवून स्वतः न्यायालयात खटला दाखल केला होता दीड ते दोन वर्षे तो खटला न्यायालयामध्ये चालू होता परंतु न्यायालयात सबळ पुरावे सादर न झाल्यामुळे न्यायालयाने तो खटला खरीज केला होता म्हणजे अक्षरशः डोके चक्रावून टाकणारा प्रसंग आणि घटना दैनंदिन जीवनामध्ये घडत आहेत परंतु सर्वसामान्य जनतेला आपल्या दैनंदिन कामातून व कुटुंबातील जबाबदारीतून व कर्तव्यातून वेळ मिळत नाही म्हणून समाजात याचे बांडगुळे तयार होतात आणि गरीब लोकांना फसवण्याचे काम करतात कारण या प्रसंगावरून एक लक्षात येते की आपण जर शिकलं नाही तर आपण अधोगती कडे नक्की जाणार आणि याच लाजिरवाणी आणि दुबळ्या पानांचा फायदा हे लोक घेत असतात कारण यामध्ये बऱ्यापैकी लोक आदिवासी भील समाजाला सहकार्य सपोर्ट आणि मदत देखील करतात परंतु आमच्या इमामपूर गावामध्ये असे बोटावर मोजणे इतके महान व्यक्तिमत्व आहे किती त्यांचा संसार ग्रामपंचायत च्या जीवावर चालवण्यासाठी पंचायत मध्ये आणि इतर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात परंतु मित्रांनो एक विषय लक्षात येत  नाही की माणसाचे विचार एवढे कसे गडूळ असू शकतात माणसाची बुद्धी एवढी कशी शेण खाल्ल्या सारखी चालू शकते असो तो दुसरा प्रसंग आ हे तो मी सविस्तर चर्चा करणार आहे. आता मूळ मुद्याला येतो  आता पराग्राफ नंबर 7... हे की दावा मिळकतीवरील वादीच्या मालकी कब्जा हक्कास व उपभोगास प्रतिवादीचा असाच हरकत अडथळा चालू राहिल्यास दावा मिळकतीवरील वादीच्या मालकी उपभोगासारख्या मौल्यवान हक्कावर गदा येईल व त्यापासून वादी वंचित होईल परिणामी वादीचे अपरिमित असे नुकसान होईल ज्याची भरपाई प्रतीवादी करु शकणार नाही अशा परिस्थितीत दावा मिळकतीवरील वादीच्या कब्जा हक्कास व उपभोगास हरकत अडथळा होईल तसेच दावा मिळकतीमध्ये स्मशानभूमी निर्माण होईल असे कोणतेही कृत्य प्रतिवादीने करू नये असा वादीला प्रतिवादी विरुद्ध निरंतरचा मनाई हुकूम मिळणे न्याय व जरुरीचे आहे पॅरेग्राफ क्रमांक आठ हे की वादीचा दावा निरंतर मनाई हुकुम मिळणेबाबतचा असल्यामुळे वादीने त्यासाठी ठराविक कोर्ट फीज रुपये 200 दिले आहे जी योग्य व पुरेशी आहे मेहरबान कोर्टाच्या आर्थिक मर्यादेसाठी प्रोसेस व इत्यादीसाठी वादीने दाव्याची किंमत रुपये एक हजार रुपये केली आहे मेहरबान कोर्टात सदरचा दावा चालविण्याचा अधिकार आहे वादीचा दावा प्रतिवादी विरुद्ध खालील प्रमाणे खर्चासह डिग्री करण्यात यावा दाव्याचे कलम नंबर एक मध्ये वर्णन केलेल्या दावा मिळकतीवरील वादीच्या मालकी कब्जा हक्कास व उपभोगास हरकत अडथळा होईल तसेच दावा मिळकतीमध्ये स्मशानभूमी निर्माण होईल असे कोणतेही कृत्य प्रतिवादीने स्वतः अथवा त्यांचे हस्तक किंवा अन्य कोणाही मार्फत करू नये असा वादीला प्रतिवादीन विरुद्ध निरंतर चा मनाई हुकूम मिळावा ब... वादीला प्रतिवादीकडून या दाव्याचा खर्च व अन्य अनुषंगिक योग्य ती दात मिळण्याचा हुकूम व्हावा.... मित्रांनो हे होते साहेबराव प्रधान यांनी 2011 मध्ये वादी बनवून आदिवासी भिल समाजातील चार व्यक्तींवर खटला दाखल केला होता त्या दाव्याच्या संदर्भातले टोटल विवरण मी तुमच्यासमोर सादर केलेले आहे तसेच आता प्रश्न डोक्यात असा आला की यांना जर यांना जर खर्चासकट नुकसान भरपाई की दावा पाहिजे मग आता 68 च्या पूर्वीपासून आमचा आदिवासी भिल समाज सदरील ठिकाणी अंत्यविधी व दफन विधी करत आलेला आहे आता या दाव्यामध्ये असलेले 2021 च्या दाव्यात असलेले असलेले नमुने यांच्याकडून देखील आपण नुकसान भरपाई की दवा केला पाहिजे तसेच यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचारास प्रतिबंध कायदा 1889 तसेच सुधारणा आवृत्ती 2014 नुसार अट्रा सिटी चा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि यांच्या विरोधात मी न्यायालयामध्ये कोर्ट कमिशन देखील मागायची प्रोसेस केली पाहिजे मग या भाऊंना समजेल की कायदा आणि सुव्यवस्था  हे यांना कळेल चला भेटूया पुढच्या भागांमध्ये आदिवासी दफन  भूमी चोरीला गेली भाग 13 मध्ये निश्चितच पुढील विषयावर चर्चा करूयात तोपर्यंत सतर्क रहा सावध रहा तसेच आपले प्रियजनांची काळजी घ्या आजूबाजूच्या वातावरणावर लक्ष राहू द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी जय भिम

👉 👉 पोलीस स्टेशनच्या बाबतीत सर्वांच्या जीवनात उपयोगि पडणारे अतिशय मोलाची माहिती 👍

👉👉 नमस्कार आज आपण पुन्हा ब्लॉगिंग चालू केलेले आहे या ब्लॉगिंग मध्ये आज अतिशय छान असा लेख घेऊन आलो आहे या लेखात असलेली माहिती सर्वांसाठीच ख...