https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-9617618308777656 Kiran Barde new tricks and update: आदिवासी दफन भूमी स्मशानभूमी चोरीला गेले भाग-12..

बुधवार, ४ ऑक्टोबर, २०२३

आदिवासी दफन भूमी स्मशानभूमी चोरीला गेले भाग-12..


 नमस्कार मित्रांनो दिनांक 29/ 9 /2023 रोजी आपण दफन भूमी स्मशानभूमी चोरीला गेली भाग 11 बघितला होता त्यानंतर आज दिनांक 4/ 10 /2023 रोजी आपण आदिवासी दफनभूमी चोरीला गेली भाग बारा बघणार आहोत त्यापूर्वी तुमची सर्वांची क्षमा मागतो मित्रांनो की 29 ते चार तारखेपर्यंत खूप काही कामत व्यस्त असल्यामुळे मी भाग 12 तयार करू शकलो नाही  या चार दिवसाच्या दरम्यान मला थोडा उशीर झाला त्यामध्येच आपले माझ्यावरती असलेले आशीर्वाद व प्रेम दिसून आले कारण मला खूप जणांनी पर्सनली माझ्या फोन नंबर वर फोन करून विचारपूस झाली सदर पुढचा भाग तुम्ही केव्हा तयार करणार आहोत आणि मी यासाठी केलेला संघर्ष व समाजासाठी दिलेला वेळ याचं देखील बऱ्यापैकी कौतुक करण्यात आलं त्याबद्दल मी आपला सर्वांचा मनापासून ऋणी आहे आपले सदैव असेच प्रेम माझ्यावरती राहू द्या यापेक्षा करतो 🙏चला तर मित्रांनो आदिवासी दफनभूमी चोरीला गेली भाग १२ सुरू करूयात आज दिनांक 4/ 10 /2023 रोजी भाग 11 मध्ये आपण बघितले होते की प्रतिवादी साहेबराव प्रधान यांनी स्वतः 2011 मध्ये वादी बनवून स्वतः न्यायालयात खटला दाखल केला होता दीड ते दोन वर्षे तो खटला न्यायालयामध्ये चालू होता परंतु न्यायालयात सबळ पुरावे सादर न झाल्यामुळे न्यायालयाने तो खटला खरीज केला होता म्हणजे अक्षरशः डोके चक्रावून टाकणारा प्रसंग आणि घटना दैनंदिन जीवनामध्ये घडत आहेत परंतु सर्वसामान्य जनतेला आपल्या दैनंदिन कामातून व कुटुंबातील जबाबदारीतून व कर्तव्यातून वेळ मिळत नाही म्हणून समाजात याचे बांडगुळे तयार होतात आणि गरीब लोकांना फसवण्याचे काम करतात कारण या प्रसंगावरून एक लक्षात येते की आपण जर शिकलं नाही तर आपण अधोगती कडे नक्की जाणार आणि याच लाजिरवाणी आणि दुबळ्या पानांचा फायदा हे लोक घेत असतात कारण यामध्ये बऱ्यापैकी लोक आदिवासी भील समाजाला सहकार्य सपोर्ट आणि मदत देखील करतात परंतु आमच्या इमामपूर गावामध्ये असे बोटावर मोजणे इतके महान व्यक्तिमत्व आहे किती त्यांचा संसार ग्रामपंचायत च्या जीवावर चालवण्यासाठी पंचायत मध्ये आणि इतर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात परंतु मित्रांनो एक विषय लक्षात येत  नाही की माणसाचे विचार एवढे कसे गडूळ असू शकतात माणसाची बुद्धी एवढी कशी शेण खाल्ल्या सारखी चालू शकते असो तो दुसरा प्रसंग आ हे तो मी सविस्तर चर्चा करणार आहे. आता मूळ मुद्याला येतो  आता पराग्राफ नंबर 7... हे की दावा मिळकतीवरील वादीच्या मालकी कब्जा हक्कास व उपभोगास प्रतिवादीचा असाच हरकत अडथळा चालू राहिल्यास दावा मिळकतीवरील वादीच्या मालकी उपभोगासारख्या मौल्यवान हक्कावर गदा येईल व त्यापासून वादी वंचित होईल परिणामी वादीचे अपरिमित असे नुकसान होईल ज्याची भरपाई प्रतीवादी करु शकणार नाही अशा परिस्थितीत दावा मिळकतीवरील वादीच्या कब्जा हक्कास व उपभोगास हरकत अडथळा होईल तसेच दावा मिळकतीमध्ये स्मशानभूमी निर्माण होईल असे कोणतेही कृत्य प्रतिवादीने करू नये असा वादीला प्रतिवादी विरुद्ध निरंतरचा मनाई हुकूम मिळणे न्याय व जरुरीचे आहे पॅरेग्राफ क्रमांक आठ हे की वादीचा दावा निरंतर मनाई हुकुम मिळणेबाबतचा असल्यामुळे वादीने त्यासाठी ठराविक कोर्ट फीज रुपये 200 दिले आहे जी योग्य व पुरेशी आहे मेहरबान कोर्टाच्या आर्थिक मर्यादेसाठी प्रोसेस व इत्यादीसाठी वादीने दाव्याची किंमत रुपये एक हजार रुपये केली आहे मेहरबान कोर्टात सदरचा दावा चालविण्याचा अधिकार आहे वादीचा दावा प्रतिवादी विरुद्ध खालील प्रमाणे खर्चासह डिग्री करण्यात यावा दाव्याचे कलम नंबर एक मध्ये वर्णन केलेल्या दावा मिळकतीवरील वादीच्या मालकी कब्जा हक्कास व उपभोगास हरकत अडथळा होईल तसेच दावा मिळकतीमध्ये स्मशानभूमी निर्माण होईल असे कोणतेही कृत्य प्रतिवादीने स्वतः अथवा त्यांचे हस्तक किंवा अन्य कोणाही मार्फत करू नये असा वादीला प्रतिवादीन विरुद्ध निरंतर चा मनाई हुकूम मिळावा ब... वादीला प्रतिवादीकडून या दाव्याचा खर्च व अन्य अनुषंगिक योग्य ती दात मिळण्याचा हुकूम व्हावा.... मित्रांनो हे होते साहेबराव प्रधान यांनी 2011 मध्ये वादी बनवून आदिवासी भिल समाजातील चार व्यक्तींवर खटला दाखल केला होता त्या दाव्याच्या संदर्भातले टोटल विवरण मी तुमच्यासमोर सादर केलेले आहे तसेच आता प्रश्न डोक्यात असा आला की यांना जर यांना जर खर्चासकट नुकसान भरपाई की दावा पाहिजे मग आता 68 च्या पूर्वीपासून आमचा आदिवासी भिल समाज सदरील ठिकाणी अंत्यविधी व दफन विधी करत आलेला आहे आता या दाव्यामध्ये असलेले 2021 च्या दाव्यात असलेले असलेले नमुने यांच्याकडून देखील आपण नुकसान भरपाई की दवा केला पाहिजे तसेच यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचारास प्रतिबंध कायदा 1889 तसेच सुधारणा आवृत्ती 2014 नुसार अट्रा सिटी चा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि यांच्या विरोधात मी न्यायालयामध्ये कोर्ट कमिशन देखील मागायची प्रोसेस केली पाहिजे मग या भाऊंना समजेल की कायदा आणि सुव्यवस्था  हे यांना कळेल चला भेटूया पुढच्या भागांमध्ये आदिवासी दफन  भूमी चोरीला गेली भाग 13 मध्ये निश्चितच पुढील विषयावर चर्चा करूयात तोपर्यंत सतर्क रहा सावध रहा तसेच आपले प्रियजनांची काळजी घ्या आजूबाजूच्या वातावरणावर लक्ष राहू द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी जय भिम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

👉 👉 पोलीस स्टेशनच्या बाबतीत सर्वांच्या जीवनात उपयोगि पडणारे अतिशय मोलाची माहिती 👍

👉👉 नमस्कार आज आपण पुन्हा ब्लॉगिंग चालू केलेले आहे या ब्लॉगिंग मध्ये आज अतिशय छान असा लेख घेऊन आलो आहे या लेखात असलेली माहिती सर्वांसाठीच ख...