🙏🙏नमस्कार मित्रांनो बऱ्याच खूप दिवसानंतर आपण पुन्हा 👉ब्लॉगिंग वर उपस्थित झालो आहे खूप दिवसांनी ही पोस्ट करतो त्याबद्दल मनापासून सर्वांचे माफी 🙏मागतो दिनांक 👉👉👉29/9/2023 रोजी आपण आदिवासी दफनभूमी चोरीला गेली भाग-12 बघितलेला होता त्यानंतर आदिवासी दफनभूमी चोरीला गेली भाग ✍️13 बघणार आहोत त्यापूर्वी पुन्हा एकदा सर्वांचे माफी मागतो की खूप दिवसानंतर भाग 13 आणण्यासाठी खूप वेळ लागला त्याबद्दल माफी असावी त्याचे कारण असं होतं की न्यायालयीन कामात येणारा अडथळा व काही🤷 कागदपत्राचे पडताळणी पूर्तता करण्यासाठी किंवा काही कागदपत्र जमा करण्यासाठी झालेला हा विलंब आहे आता सर्व काही सगळं व्यवस्थित करण्याचा व चालू करण्याचा प्रयत्न देखील चालू झालेला आहे त्यापूर्वी सर्व आदिवासी मित्रांना व मित्रांना एक गोष्ट आवर्जून सांगू वाटते की आपण सर्वांनी आपल्या गाव पातळीवर आपल्या समाजाने व इतर कुठलाही समाज असो त्यांनी सज्ज व सावधगिरी बाळगली पाहिजे कारण शक्यतो ज्या समाजामध्ये एक की नसते त्या समाजात गावात राजकारण खूप मोठ्या प्रमाणात चालतं व इतर काही समाजकंटक दूषित बुद्धीचे दूषित मेंदूचे जे लोक आहेत ते वारंवार गरिबांचा आदिवासींचा व गरीब कुटुंबाची आर्थिक पिळवणूक छळ करतात तर चला मित्रांनो आपण आदिवासी दफनभूमी चोरीला गेली भाग 13 सुरू करूयात न्यायालयीन कामकाजामध्ये आपल्या आदिवासी दफन भूमीच्या खटल्यामध्ये काही 🙅अमेंडमेंट होणं महत्त्वाचं होतं पण काही कालांतराने त्यामध्ये करेक्शन असल्यामुळे तो भाग पेंडिंग पडलेला आहे त्या पद्धतीने 🕵️🕵️🕵️वकील साहेबांची कार्यपद्धत चालू असून त्यामध्ये थोडा वेळ येत आहे तसेच आता दावा दुरुस्तीचे देखिल प्रोसिजर चालू करण्यात आलेला आहे त्या दरम्यान इमामपूर मध्ये आदिवासी समाजाची महिला लक्ष्मीबाई बाबुराव दळ वे यांचा अंत्यविधी दिनांक 😢😢1 ऑक्टोंबर 2024 रोजी पुन्हा त्या दफन भूमी मध्येच झालेला असून त्यांच्या दफन भूमी व अंतविधी झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी मातीसारखी एक घोर तयार करण्यात आली होती ती घोर तयार झाल्यानंतर दहा ते बारा दिवस सगळं सर्व व्यवस्थित होतं ज्या ठिकाणी आम्ही अंत्यविधी करण्यासाठी गेलो होतो त्या ठिकाणी कपाशी लावलेली होती मी व माझ्या सहकारी मित्रांनी आम्ही🥷🥷🥷🥷 👭👬👫पूर्ण दीड दोन गुंठा कपाशी तोडून त्या ठिकाणी अंत्यविधीसाठी जागा केली तसेच आम्हाला रस्त्याची देखील खूप मोठ्या प्रमाणावर अडचण येत होती त्यामुळे जुन्या रस्त्याच्या ठिकाणी नाली खांदून ठेवली होती जेसीबीच्या साह्याने आणि नवीन रस्ता आम्हाला लवकर काही सापडत नव्हता त्यामुळे खूप विचार करून आम्ही गावाच्या गावठाण रस्त्यातून रस्ता तयार करण्याचे ठरवले अक्षरशा मित्रांनो सांगायचा अनुभव असा की खूप वेड्याबाबळी गवत काटे काढून आम्ही पंधराशे ते सोळाशे मीटर रस्ता त्या ठिकाणी केला रस्ता झाल्याच्या नंतर काही दूषित मेंदूच्या लोक यामध्ये अडथळा अडचण आणण्याचा प्रयत्न चालू होता ते म्हणू लागले की अंत्यविधी हा चुकीच्या पद्धतीने होत आहे आणि अंत्यविधीसाठी प्रेत हे तुम्ही चुकीच्या रस्त्याने नेत आहे काही समजदार चांगला सल्ला देत होते तर काहींना त्या गोष्टी कुठेतरी रुजू होत नव्हत्या काही समाजकंटकांच्या बुडाखाली तर मोकार आग लागली होती कारण त्यांना त्या ठिकाणी अंत्यविधी होऊन द्यायचा नव्हता परंतु आम्ही देखील पूर्ण निश्चय केला होता की अंत्यविधी होणार तर आपल्या जुन्या दफन भूमी मध्येच आणि आम्हाला तो तिथेच करायचा होता आमचं पूर्ण फिक्स फायनल झालेलं होतं त्यामुळे त्या ठिकाणी रस्ता करून आम्ही लक्ष्मीबाई बाबुराव दळवी यांचा अंत्यविधी त्या ठिकाणी नेण्यास सुरुवात केली संध्याकाळच्या मला साडेआठ ते पावणे नऊ वाजले असतील अक्षर शाह इत की बिकट परिस्थिती होती की अंगावर काटे येण्यासारखं अनुभव होता तो माझ्यासाठी व माझ्या सहकाऱ्यांसाठी परंतु राज्यघटनेने दिलेल्या लोकशाही अधिकाराचा वापर करूनच आम्ही तो अंत्यविधी सुखरूप करू शकलो तसेच गावातील काही पंचकमिटी व मंडळी देखील खूप समजदार होते यांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य देखील केलं होतं उदाहरणार्थ आमचे गावातील तंटामुक्त अध्यक्ष तसेच ग्रामपंचायत मधील काही पंच आणि आपल्या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांनी देखील खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केले परंतु काही नास काय बुडाच्या लोकांच्या पोटात कळ येत होती त्यांना वारंवार वाटत होतं की त्या ठिकाणी अंत्यविधी होऊच नये त्यांनी खूप अडथळे आणण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी भांडण होईल अशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु अंत्यविधी हा यशस्वीरित्या पार पाडला त्या अंत्यविधीचे मी फोटोग्राफ देखील काढले आहेत मित्रांनो त्यातलाच एक फोटो आज टायटल मध्ये घेऊन मी तुम्हाला त्याच्या पोस्टमध्ये रूपांतर करून टाकत आहे तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचारास प्रतिबंध 1889 कायद्याअंतर्गत(ॲट्रॉसिटी 1889) नुसार सदरील लोकांवर गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न आणि प्रोसिजर सुद्धा सुरू आहे त्यामुळेच वातावरण पूर्ण शांत आणि सायलेंट करून घेतलेला आहे तसेच राष्ट्रीय सेवा विधी प्राधिकरण म्हणजे Nalsa. च्या सवलतीचा देखील आपण येथे आधार घेणार आहोत त्या अनुषंगाने त्यांच्या कार्यालयाशी संपर्क देखील झालेला आहे लवकरच या प्रकरणाला गती येईल आणि आपले प्रयत्न तर सदैव चालूच आहेत तसेच या प्रयत्नावरती आपण कायम असून आपण या प्रकरणावर पैठण तालुक्याचे उपविभागीय अधिकारी श्रीमती नीलम बाफना मॅडम यांच्याशी देखील चर्चा केलेली असून प्रोसिजर त्या अनुषंगाने चालू असून आपल्याला लवकरच सकारात्मक बदल यामध्ये घडून येताना दिसे ल चला तर मित्रांनो आज भाग 13 या ठिकाणी समाप्त करूया उद्या पुन्हा भाग 14 मध्ये भेटू यानंतर असा विलंब होणार नाही पुन्हा मनापासून सर्वांचे माफी मागतो✍️ जय आदिवासी✍️ जय भिम जय✍️ लहुजी जय शिवराय,🙏🙏🙏🙏🙏
नवीन योजना, नविन महिती, ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी कसे काम करावे आणि लेखी तक्रार अर्ज. आदिवासी क्रांतिकारक यांची महिती, समाज जनजागृती, ग्रामपंचायत मधील महिती घरकुल विभागातील कागद पत्रे, महिती आणि खेळ तसेच कायद्याची अमलबजावणीसाठी कसे काम करावे सर्व अर्ज प्रक्रिया, निवेदन तयार करणे संदर्भ आणि बरेच काही
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
👉 👉 पोलीस स्टेशनच्या बाबतीत सर्वांच्या जीवनात उपयोगि पडणारे अतिशय मोलाची माहिती 👍
👉👉 नमस्कार आज आपण पुन्हा ब्लॉगिंग चालू केलेले आहे या ब्लॉगिंग मध्ये आज अतिशय छान असा लेख घेऊन आलो आहे या लेखात असलेली माहिती सर्वांसाठीच ख...
-
नवरात्राच्या पार्श्वभूमीवर पारधी बांधवांचे रक्ताने लिहिलेले पत्र : गायरान जमिनीच्या मागणीसाठी सरन्यायाधीशांना आवाहन ✒️(समाज प्रतिनिधी :अनिल ...
-
👉 नमस्कार सर्व मित्रांना सर्वात प्रथम 🙏जय आदिवासी 🙏जय जोहार 🙏 क्रांतिकारी जय भिम🙏 जय लहुजी🙏 जय शिवराय🙏 चला तर मित्रांनो आज आपण घेऊन ...
-
खूप चांगला हा प्रश्न 🤔 “गावठाण”, “पांदण रस्ता”, “हद्द”, “रुंदी–लांबी” या संकल्पना सामान्य जनतेला समजावून सांगणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा