https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-9617618308777656 Kiran Barde new tricks and update: देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश मा.बी. आर. गवई यांच्यावर राकेश किशोर या वकिलाचा हल्ल्याचा प्रयत्न. या घटनेचा आदिवासी जमात विकास संस्था महाराष्ट्र राज्य यांच्याकडून तीव्र निषेध ❌❌❌❌

सोमवार, ६ ऑक्टोबर, २०२५

देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश मा.बी. आर. गवई यांच्यावर राकेश किशोर या वकिलाचा हल्ल्याचा प्रयत्न. या घटनेचा आदिवासी जमात विकास संस्था महाराष्ट्र राज्य यांच्याकडून तीव्र निषेध ❌❌❌❌


देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. बी. आर. गवई यांच्यावर राकेश किशोर या वकिलाने हल्ल्याचा प्रयत्न करण्याची घटना अत्यंत संतापजनक आहे. राकेश किशोर याने केलेला हा प्रकार थेट भारताच्या न्यायव्यवस्थेवर हल्ला आहे. या घृणास्पद कृत्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो!

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला हजारो वर्षांच्या मनुवादी, वर्णवर्चस्ववादी व्यवस्थेतून मुक्त केले. पण विषमतावादी, मनुवादी विचारांनी ग्रासलेल्या प्रवृत्ती अजूनही भारतात आहेत आणि आज त्याच प्रवृत्तीने थेट देशाच्या न्यायव्यवस्थेवर हल्ला केला आहे. 

आज एक दलित सरन्यायाधीश देशाच्या सर्वोच्च न्यायासनावर विराजमान आहेत, ही गोष्ट मनुवादी लोकांना पटत नाही, कारण त्यांना न्यायव्यवस्थेत, प्रशासनात, किंवा सत्ताकेंद्रात दलितांचे अस्तित्व सहन होत नाही. या संतापाच्या मुळाशी द्वेष नाही, तर दलितांच्या प्रगतीबद्दल असलेली असहिष्णुता आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीविरुद्ध अशा प्रकारची घटना झाल्यामुळे न्यायपालिकांच्या सुरक्षिततेवर देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकशाही विरोधी, जातीयवादी राकेश किशोर वर सरकारने तत्काळ कारवाई करावी आणि कठोरात कठोर शासन करावे.      🙏 ❌❌❌या घटनेचा आदिवासी जमात विकास संस्था महाराष्ट्र राज्य यांच्याकडून तीव्र निषेध ❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

👉 👉 पोलीस स्टेशनच्या बाबतीत सर्वांच्या जीवनात उपयोगि पडणारे अतिशय मोलाची माहिती 👍

👉👉 नमस्कार आज आपण पुन्हा ब्लॉगिंग चालू केलेले आहे या ब्लॉगिंग मध्ये आज अतिशय छान असा लेख घेऊन आलो आहे या लेखात असलेली माहिती सर्वांसाठीच ख...