https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-9617618308777656 Kiran Barde new tricks and update: शेतकरी मित्र एक छान कथा 🙏

गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०२५

शेतकरी मित्र एक छान कथा 🙏


 नमस्कार सर्वांना 🙏जय आदिवासी 🙏जय जोहार 🙏 जय बिरसा🙏 जय भीम🙏 आज परिचय नाही 🙏एक शेतकरी मित्र म्हणून  खूप छान लेख सादर करत आहे 🙏 चला तर बघूया सविस्तर लेख 🙏 ताई कितीला दिला हा फडा?"
" भाऊ हा ५० आणि हा ६० रुपा👉 याला"
त्यांनी उत्तर दिल्यानंतर मी परत प्रश्न केला 
"दोन्ही तर सारखेच दिसताहेत फरक काय ?" 
" भाऊ पानोळ्या,वजन सारखेच आहे फरक फक्त बांधण्यात असतो.दोरी गच्च कमी अधीक होते भाऊ म्हणून" 

👉 मी दोनही फडे हातात घेवून बघत होतो.अगदी दोनही बाजूने.
त्या मायमाऊलीचे हृदय खालीवर होत होते.एखाद्याने मोठ्या श्रमाने हताला घाव सहन करुन एखादी सुंदर कलाकृती बनवावी आणि माझ्या सारख्याने क्षणात तिच्या उनीवा काढुन नावे ठेवून निघून जावे काय वाटत असेल त्या पोटासाठी रस्त्याच्या कडेला बसलेल्या जीवाला. 

👉 " भाऊ दहाविस कमी द्या,एवढे काय पहायले" 
"अहो ताई मी किंमत कमी करणार नाही " 

त्या रखुमाईला वाटले, मी किंमत करणार नाही म्हणजे आता मी निघून जातो का काय की.शेवटचा उरला सुरला माल असल्याने कदाचित मी घेणार नाही असा तिचा समज. 

👉 परत ती म्हणाली "भाऊ मया स्वतः हाताने बनवलेले फडे हाइत. एक भी खराब नाही." 

"अहो मी त्या फड्याच्या पानोळ्या नाही बघत.त्या झिजूनच जाणार आहेत ना.मी बघत आहे मुठ मजबूत असावी."
 "भाऊ मी स्वता बळ लाऊन आवळल्यात मुठी.. " 

👉 " भाऊ कोणता घेता मग ? " 
"ताई दोनीबी" 
तिच्या चेहऱ्यावर हस्य उमलले. 
"हे घ्या एकशे दहा रुपये"  
भाव न करता फडे घेवून मी माझ्या घरी निघालो आणि ती तिचा पसारा आवरायला लागली .. घरी जाण्यासाठी ..

👉 मी विचार करत होतो. कुठल्यातरी डोंगराळ भागातुन डोक्यावर भारे आणा.मग त्या पानांचे बारिक बारिक पाते कट करा. त्याला एका गोलाकार पध्दतीने वीणा.ते कितीतरी वेळा हाताला टोचते. नखात टोचल्यावर जिभाळी लागते.कुठेच जीव लागत नाही इतकी आग होते.तळहाता वर ते सर्व विणायचे.मग मुठीला घट्टपणे दोरी बांधायची.यावेळी स्त्रीयांना सर्व जीव एकवटून ती मुठ बांधावी लागते. त्या मुठेला नायलॉनची दोरी.मुठ ढिली असेल तर गिर्हाइक निघून जाते. 
एवढ्या बेजारीतुन त्या फड्याची किंमत किती तर 
पंन्नाससाठ रुपये.. 
अन यांच्या मॉलमधला झाडु कितीला तर एकशे दहा पासुन बोली ... 

👉 एका दिवाळीत भाव न कमी करता तुम्ही सुद्धा एखाद्याच्या श्रमाचे मुल्य करु शकतात ... 

👉 फार सोपी कृती आहे. करुन बघा. 
थेट शेतात पिकवलेले माळवं भाजीपाला घेवून आलेले शेतकरी पहाटेच रोडच्या कडेला बसतात.भाव न करता घ्या बर .. काय बिघडत नाय.. 

👉 उन्हाळ्यात गरिबांचा फ्रिज घेवून बसलेले कुंभार... हंडा घेताना भाव कमी करु नका, काय बिघडत नाय .. 

👉 लोहाराकडुन विळा, कुऱ्हाड शेवटुन घेताना .. कुलपाची नवी चावी बनवुन घेताना भाव कमी करु नका काय बिघडत नाही ..

भाव कमी करायचा प्रयत्न मॉलमध्येकरुन बघा बरे .. 

👉 दोन रु सुट्टे नाहीत म्हणून चॉकलेट का घेतो आपण .. त्याला ते दोन रुपयेच दे म्हणावे .. 
वाटलेच तर घेतलेले सामान वापस करा ..
दुसरीकडे घ्या ..
पण हस्तश्रमाने राबणाऱ्यांच्या श्रमाचे मोल करा ..
एक शेतकरी मित्र
🙏 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

👉 👉 पोलीस स्टेशनच्या बाबतीत सर्वांच्या जीवनात उपयोगि पडणारे अतिशय मोलाची माहिती 👍

👉👉 नमस्कार आज आपण पुन्हा ब्लॉगिंग चालू केलेले आहे या ब्लॉगिंग मध्ये आज अतिशय छान असा लेख घेऊन आलो आहे या लेखात असलेली माहिती सर्वांसाठीच ख...